तोंडपुजेपणा म्हणजे जसा निष्ठावंतपणा नव्हे, त्याचप्रमाणे निव्वळ देवाचा स्तुतिपाठ करणे ही काही भक्ती ठरत नाही. कोणत्याही आदर्शाचे गुण व्यक्तीत येण्याकरिता तिला तिच्या अंगी असलेले दुर्गुण दूर करावेच लागतात. आणि ते आपोआपच दूर होतील असे समजून आळशीपणाने आपण इंद्रियांच्या क्षुद्र सुखाकडेच स्वैर धावत राहिलो तर दुर्गुणांच्या झुंडी धाड घालून ती भक्ती समूळ नाहीशी करून तिला व्यापाराचे स्वरूप दिल्याशिवाय राहणार नाहीत, असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अमर विद्येच्या सिद्धांताचे महत्त्व सांगताना म्हणतात.

महाराज प्रश्न करतात की, अशी कोणती गोष्ट जगात आहे जी दृढनिश्चय न करताही मनुष्यास टिकविता येते? मला तरी ती माहीत नाही. होय एक गोष्ट आहे, ती म्हणजे मनुष्याच्या अंगवळणी पडलेला स्वभाव किंवा ज्या कार्यात तो पारंगत झाला असेल त्याची विद्या, ती लवकर नाहीशी होत नाही. पण असाही अनुभव आहे की, मन जेव्हा विरुद्ध परिस्थितीने भांबावून गेलेले असते तेव्हा असलेले गुणही मनुष्य विसरून जातो, नव्हे ते कार्य करण्याची प्रवृत्तीच मरते.

Shani Gocha 2024 saturn transit in kumbha Shani zodiac sign
शनी देणार बक्कळ पैसा; मूळ त्रिकोण राशीतील उपस्थिती ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना देणार पैसा, प्रतिष्ठा आणि भौतिक सुख
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
after facing lots of difficulties two come together and become one forever
वर्धा : तो अनाथ, ती दिव्यांग ! प्रेमाच्या आणाभाका आणि कुटुंबाचा विरोध झुगारून शुभमंगल.
Ganpati powerful stotram and mantras
Ganesh Chaturthi 2024 : फक्त मोदक आणि दूर्वाच नाही ‘हे’ प्रभावी स्तोत्र आणि मंत्रही आहेत बाप्पाला प्रिय; नियमित पठण केल्यास बाप्पा देईल भरपूर आशीर्वाद
Loksatta ulta chashma
उलटा चष्मा: बैलबुद्धी? नंदीबैल?
lokrang
पडसाद: तार्किक बुद्धी वापरावी
Indian society, Ramayana, Mahabharata, positive ideals, negative tendencies, Rama, Krishna, Ravana, Duryodhana, social consciousness, judicial system, cultural influence,
रावणाच्या मर्यादांची प्रतिष्ठापना आज आवश्यक आहे…
article about painless normal delivery method of painless childbirth
स्त्री आरोग्य : वेदनारहित बाळंतपणाचा पर्याय

आपण जिच्याकरिता निश्चय टिकवून असतो ती विद्या मरतेवेळीही मनुष्याला हसत हसत (सहज) येऊ शकते, असा बहुधा अनुभव येतो. मरणासारख्या दुर्धर प्रसंगी जी विद्या मनुष्य विसरू शकत नाही तीच खरी टिकणारी विद्या होय. पण जीवनात अशी कोणती विद्या संपादन करून टिकवून ठेवावी की जिच्या योगाने किंवा ज्या कार्याबरोबर जीवन कृतार्थ होऊन लोकांतही निष्ठावंतता राहू शकेल, असा प्रश्न करून महाराज म्हणतात, ज्या आचरणामुळे आपल्यावर अवलंबून असलेले लोकही भरवसा ठेवू शकत नाहीत त्यावर समाजसेवा कशी घडणार आणि असे दुर्गुण आपल्यात असताना काय फायदा होणार? कोणत्याही सत्कर्तव्याची पूर्वतयारी म्हणजे आपले वैयक्तिक शुद्धाचरण आणि धारणेत निश्चयाने टिकविलेली इंद्रियावरची एकनिष्ठ सत्ता होय.

पाय पुढे टाकावयाचा असेल तर प्रथम आपल्यात नियमितता अवश्य आणावी. आपली कामे करून वेळ आपल्या ताब्यात ठेवून मोकळा राहू शकत नाही, त्याने दुसऱ्याची सेवा करतो म्हणणे हे उगीच थट्टेसारखे असते. फार झाले तर करेल महिन्यातून एखाद वेळी, पण नित्यक्रमाने दुसऱ्याच्या उपयोगी पडावयाचे म्हणजे त्याने आपले नित्यकर्म नियमाने केलेच पाहिजे. ज्याच्या कार्यात करारीपणा नाही त्या थोर म्हणविणाऱ्या माणसावरही लोक भरवसा ठेवावयास तयार नसतात, हे लक्षात असलेच पाहिजे. काही लोकांत वरवर टापटीपपणा दाखविण्याची वृत्ती असते. त्यांना लोक ओळखून असतात. मला वाटते, त्यांच्या घरचेही लोक त्यांच्यावर भरवसा ठेवू शकत नाहीत, मग इतरांनी का ठेवावा? आणि ज्याच्यावर लोक भरवसा ठेवू इच्छित नाहीत, त्याने कितीही समाजसेवा दाखविली असली तरी तिचा काय उपयोग होणार?

राजेश बोबडे