राजेश बोबडे

उपासना मार्गाचे महत्त्व विशद करताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, ‘मला उपासना मार्गास महत्त्व द्यावयाचे आहे म्हणजे आजकाल भक्तीच्या नावाने सुरू असलेले तमाशे वाढवावयाचे आहेत, असा मात्र त्याचा अर्थ नाही. असे भक्ती (?) करणारे वाढवून मला बुवाबाजी नांदवावयाची नाही. मला देवावर विश्वास ठेवावयास लावावयाचा आहे, पण तो असा वेडगळपणाकरिता नव्हे. मला उपासना मार्ग सांगावयाचा आहे, परंतु तो व्यवहाराहून कमी दर्जाचा मात्र नव्हे. मला भाविक लोक तयार करावेसे वाटतात पण ते आळसी, चरित्रशून्य, सत्कर्माचरण न करणारे व सत्यधर्म न ओळखणारे असे नकोत, तर प्रपंचास साधन समजून ‘उपासना’ हा त्याच्या वरचा मार्ग प्रपंचातूनच प्राप्त करणारे हवे आहेत. खरे व्यवहारकौशल्य-व्यवहारात उत्तम दर्जा- साधल्याशिवाय, अर्थात शील व सत्कीर्ती संपादन केल्याशिवाय उपासनेच्या चौकटीत कोणीच बसू शकत नाही, असे मत व्यक्त करून महाराज ग्रामगीतेतून उपासना मार्ग दाखविताना म्हणतात –

decision making process in religious and social welfare
तर्कतीर्थ विचार : धर्मनिर्णय पद्धती व समाजहित
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
4th-century CE Sanskrit inscription unearthed in PoK's Gilgit
Shaivism in POK: पाकव्याप्त काश्मीरमध्ये सापडला शिव उपासनेचा प्राचीन पुरावा; का ठरतोय हा संस्कृत कोरीव लेख महत्त्वाचा?
L&T , Subramaniam, 90 Hours Work , Work Hours ,
स्त्रीद्वेष्टेपणा की कर्मचाऱ्यांच्या शोषणाची पूर्वतयारी? 
Maha Kumbh Mela World largest gathering begins in India
दीड कोटी भाविकांचे पवित्र स्नान; भक्तिमय वातावरणात महाकुंभाला सुरुवात
Article about large religious conference in marathi
तर्कतीर्थ विचार :  वेदांचे पावित्र्य माझ्या हृदयात
Special article on occasion of Swami Vivekanandas birth anniversary
धर्म, अस्मिता आणि हिंदू!
Image of Yogi Adityanath
Mandir-Masjid Debate: “वक्फ बोर्डाच्या नावाखाली घेतलेल्या प्रत्येक इंच जमिनीचा ताबा परत घेणार”, योगी आदित्यनाथ यांचा इशारा

ऐसी असावी उपासना।

उपासनी वाढवावे कर्तव्यगुणा।

कर्तव्यपूर्तीने मोठेपणा।

अंगी घ्यावा मिळवोनि।।

उगीच उपासनेच्या नावाने आपला आळस झाकणारे, आपले दुराचार लपवून ‘उपासकास काहीच पाप लागत नाही, कारण देव सर्व पाहून घेतो. तेव्हा आम्हास काय त्याचे?’ असे बडबडणारे व आपल्या आळसामुळे व्यवहारात पैसा मिळेना म्हणून द्रव्यलाभासाठी उपासनेत घुसणारे किंवा उपासनेने द्रव्यलाभ होतो असे मानणारे लोक उपासना मार्गात लायक ठरत नाहीत, असे माझे स्पष्ट मत आहे. देवभक्तीच्या नावावर अनेकांनी स्वार्थ साधावा व त्यामुळे ‘देवभक्ती म्हणजे अशी- लोकांना नशा चढवणारी, पापे करून कीर्ती वाढवण्यास कारण होणारी आणि देशाचा, धर्माचा व माणुसकीचा नाश करणारी आहे’ असे उद्गार लोकांच्या मुखातून बाहेर पडावेत ही स्थिती मला अत्यंत उद्वेगजनक वाटते. असले स्वार्थाध भक्त (?) मला मुळीच आवडत नाहीत, तसेच ‘धर्माची किंवा भक्तीची जरुरीच नाही’ असे म्हणणेही मला ठीक वाटत नाही असे सांगून देवभक्तीच्या नावावर उपासना मार्गात धुडगूस घालणाऱ्यांवरही प्रहार करताना महाराज ग्रामगीतेत म्हणतात –

लोक चमत्कारावरि भुलती।

मागाहुनि पश्चात्ताप करिती।

काही भुरळ पाडली म्हणती। आम्हावरी

वास्तविक संत नव्हे जादुगर।

करावया चमत्कार

हा तो चालत आहे व्यवहार। पोटभऱ्यांचा।।

Story img Loader