राजेश बोबडे

राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज प्रचारकांना विचारतात, सर्व माणसे सारखीच असताना त्यांच्या आत्मस्थितीत आपणाला भेद पाहायला मिळतो तो का? एखाद्याची स्थिती इतकी दुबळी असते की तो  स्वत:च्या कुटुंबाचाही भार उचलू शकत नाही. त्याची शक्ती त्याच्या एका कुटुंबाचा भार उचलण्यास अपुरी पडते, तर दुसरा मनुष्य साऱ्या विश्वाची काळजी वाहाण्यास समर्थ असतो. त्याची सर्वव्यापकता इतकी विशाल असते की साऱ्या विश्वाची सुखदु:खे तो आपली समजतो आणि त्यांच्या निवारणाची चिंता वाहतो. अशी अनेक उदाहरणे आपण रोज आपल्या सभोवताली पाहातो. यावरून प्रश्न निर्माण होतो की प्रत्येक माणसाच्या शरीरात पंचमहाभूतांचे एकचएक द्रव्य असताना असा फरक का? अशी कोणती विशेषता आहे की त्यामुळे एक मनुष्य आपल्या कुटुंबाच्या ओझ्याखालीच दबलेला असतो आणि दुसरा आपल्या कृपेच्या छत्राखाली साऱ्या विश्वाला घेऊ शकतो?

p chidambaram article analysis maharashtra economy
समोरच्या बाकावरून : अर्थव्यवस्था तारेल त्यालाच मत
eradication of caste book review
बुकमार्क : जातीय जनगणना की जातिव्यवस्थेचे निर्मूलन?
Tata Literature Live The Mumbai Litfest
बुकबातमी : इथं जाऊ की तिथं जाऊ?
review of ramachandra guha s speaking with nature book
दखल : मानवी भविष्यासाठी…
readers reaction on loksatta editorial
लोकमानस : हस्तक्षेपास एवढा विलंब का झाला?
Immigration policy of Donald Trump
अन्यथा : प्रगतीच्या प्रारूपाचा प्रश्न!
wall-painted calendar in the Roman Republic
भूगोलाचा इतिहास : एका खेळियाने…
central government decision on classical languages in october 2024
संविधानभान : अभिजात भाषा म्हणजे काय?
loksatta satire article on uddhav thackeray chopper checking
उलटा चष्मा : तपासण्यांची उड्डाणे

याची कारणमीमांसा करताना तुकडोजी महाराज म्हणतात, चित्ताची पवित्रता जसजशी वाढत जाते तसतशी त्याची विशालताही वाढत जाते. अशी चित्ताची शुद्धता, आचार, विचार आणि शुद्ध दिनचर्या यांतून निर्माण करावी लागते. मनुष्याला निरनिराळी व्यसने जडतात. तो कामक्रोधादी विकारांच्या आहारी जातो. त्यामुळे त्याची शक्ती आकुंचित होते. वास्तविक सर्वच मानवप्राण्यांत अशी स्थिती प्राप्त करून घेणारी शक्ती असतेच. याकरिता वय, लिंग किंवा धर्मभेद आडवे येत नाहीत. सर्वाना साध्य होऊ शकणारी ही गोष्ट आहे. पण जीव आपल्या कुकर्मामुळे स्वत:स लहान करून घेतो. यासाठी त्याला अशा अहितकारी बंधनातून सोडविणे आवश्यक असते. असे केल्याने त्याची सर्व व्यापक वृत्ती हळूहळू विकास पावत जाईल.

 विस्तवावर जोपर्यंत राख साचलेली असते तोपर्यंत विस्तवाचे तेजस्वी स्वरूप नजरेसमोर येत नाही. पण एकदा का ती राख उडवून लावली की मग विस्तवाचे मूळ स्वरूप दिसू लागते. त्याचप्रमाणे आत्म्यावर अज्ञान, आसक्ती, विषयवासना इत्यादींची आवरणे चढलेली असतात. त्यामुळे त्याचे मूळ स्वरूप अप्रगत राहून त्याचे आकुंचितपणच आपल्या नजरेस दिसते. त्यामुळे एका माणसाची शक्ती कुटुंबासाठीही अपुरी पडते तर दुसऱ्याची विश्वाला पुरून उरते. ‘हे विश्वचि माझे घर’ अशी त्याची मती स्थिर होते आणि शारीरिक सुखे न भोगताही त्याला अपार आनंदाचा लाभ होतो. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ‘ग्रामगीते’च्या जीवनकला अध्यायात म्हणतात,

ईश्वर-अंश सर्व जीव । यत्न तोचि जाणावा देव।

ऐसे वदती संत, ग्रंथ, मानव । सर्वाचि नित्य ।।

परंतु पाहता जगाकडे । दिसती प्रकृती-भेदाचे पोवाडे ।

व्यक्ति तितक्या प्रकृतीचे पाढे । ठायी ठायी ।।

या साऱ्याच प्रकृती-भेदांच्या माणसांना सोप्या शब्दांत सन्मार्ग दाखवण्याचे काम महाराजांनी केले. येत्या वर्षभरात आपण त्यांच्या विचार व कार्याची ओळख करून घेणार आहोत.

rajesh772@gmail.com