राजेश बोबडे

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना उपासकांच्या मनोवृत्तीचे विविधांगी दर्शन त्यांच्या दैनंदिन व्यवहारात घडले. महाराजांना आलेल्या अनुभवाबाबत सांगताना ते म्हणतात, जगात उपासकांच्या दोन मनोवृत्तींचे प्रवाह देवभक्तीशी संयुक्त झालेले आपणास दिसून येतात, एक भावना अशी असते की, ‘देवा! माझ्या नवसास पावून माझ्या मनोविकारानुसार व्यसनांना वाव दे म्हणजे मी तुझा दरसाल नवस देईल, त्यात तुझ्याकरिता आणि माझ्या जिभेच्या रुचीकरिता- हिंसा जरी झाली तरी मला त्यात आनंदच आहे’ असे म्हणून मनात येतील ती व्रते, जपतप, होमहवन, मंत्रतंत्रादी करू लागतात. अशा हजारो उपासकांतून (?) एखाद्याची मनोकामना अनायासे फळास आली की, तो बेसुमार पापे करण्यात वरचा नंबर पटकावतो आणि आपल्या इष्टमित्रास मोठय़ा खुशीने सांगतो की, ‘‘गडय़ांनो! ही सर्व कृपा माझ्या देवाची आहे. त्याने जर मला धनदौलत दिली नसती तर मी या जगातील मौजा कशा करू शकलो असतो? उदाहरणार्थ नाचतमाशात पाण्यासारखा पैसा उधळणे, द्रव्याची राखरांगोळी होईपर्यंत जुगार खेळणे, गटारात पडेपर्यंत दारू पिणे, आपल्या शक्तीने लोकांच्या घराचा विध्वंस करणे व मार खाण्यापर्यंत वेश्यादीकांवर प्रीती करणे इत्यादी मनास आवडेल ते खुशीने करण्याची पात्रता द्रव्याशिवाय व शरीर सुदृढ असल्याशिवाय कोठून येती? व हे सर्व मला देणारा देवाशिवाय कोण आहे? मित्रांनो! मी देवाचा फार आभारी आहे. याकरिता मला त्याची किती तरी भक्ती करावी लागली व नवस द्यावे लागले. शेवटी मी त्या भक्तीने व संतांच्या आशीर्वादाने या सर्व ऐश्वर्यास प्राप्त झालो. बस, मी कृतार्थ झालो, आता मला काय करावयाचे आहे? हीच स्थिती मी सर्वदा देवास मागत राहीन.’’ असे म्हणणारा एक उपासकांचा (?) थोरला वर्ग जगात धडधडीत दिसत आहे हे आपण पाहतोच आहोत.

Kavadi for lord importance of kavadi price of a kavadi
लोक-लौकिक : ‘कवडी’मोल!
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
decision making process in religious and social welfare
तर्कतीर्थ विचार : धर्मनिर्णय पद्धती व समाजहित
4th-century CE Sanskrit inscription unearthed in PoK's Gilgit
Shaivism in POK: पाकव्याप्त काश्मीरमध्ये सापडला शिव उपासनेचा प्राचीन पुरावा; का ठरतोय हा संस्कृत कोरीव लेख महत्त्वाचा?
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव कसा असतो?
Maha Kumbh Mela World largest gathering begins in India
दीड कोटी भाविकांचे पवित्र स्नान; भक्तिमय वातावरणात महाकुंभाला सुरुवात
Article about large religious conference in marathi
तर्कतीर्थ विचार :  वेदांचे पावित्र्य माझ्या हृदयात
Special article on occasion of Swami Vivekanandas birth anniversary
धर्म, अस्मिता आणि हिंदू!

याशिवाय दुसरा एक पक्ष आहे. त्याची भावना अशी की – ‘भगवंता! माझ्या खाण्यापिण्यात तूट पडली तरी माझ्या हातून कशाची चोरी घडवू नकोस. माझ्यात ताकद भरपूर असली तरी कुण्या जीवाची हानी मजकरवी होऊ देऊ नकोस! मजवर अशीच कृपा कर की, मी माझी सद्बुद्धी तुझ्या सत्कार्यात विलीन करीन. तुझे उदात्त धारिष्ट माझ्या मनोभावनेत उतरवून अनुभवास आणीन नि तुझ्या या अफाट पसरलेल्या निसर्गशक्तीस सुखविण्यात माझ्या देहाचा विनियोग करीन! या नरदेहात तुला आवडणारे सत्कर्तव्य मजकडून व्हावे एवढीच माझी तुजजवळ याचना आहे.’ उपासना मार्गाचा भोगासाठी गैरवापर करणाऱ्यांसाठी महाराज आपल्या भजनात म्हणतात-

कुठवरी भोगशिल मौजा?

    मग येति यमाच्या फौजा रे!

धन-दारा-सुत-साथी सगळे,

    राखतील दरवाजा।।

अंतकाळि देतील लोटुनी,

    काढूनी घेती बाजारे।

तुकडय़ादास म्हणे भय मोठे,

    भज-भज सद्गुरु-राजा रे।।

Story img Loader