अजि! संतकी पूरी तपस्या, संतके बाद है

जो भक्त उनके हैं सही,

Fire , Natasha Enclave Society, Kondhwa,
पुणे : कोंढव्यातील नताशा एनक्लेव्ह सोसायटीत आग, रहिवासी बाहेर पडल्याने बचावले
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
nashik nylon manja loksatta news
नाशिकमध्ये एक लाखाचा नायलाॅन मांजा जप्त
Important tips to help prevent car theft
‘या’ छोट्या टिप्स फॉलो केल्यास चोर तुमची कार कधीही चोरणार नाही
sonu sood on income tax raid
सोनू सूद आयकर विभागाने घरावर केलेल्या छापेमारीबद्दल झाला व्यक्त; म्हणाला, “माझ्या घरातील कपाटं आणि दरवाजांना…”
Raveena Tandon daughter Rasha Thadani Uyi Amma In Azaad watch video
Video: रवीना टंडनच्या १९ वर्षीय मुलीचं Uyi Amma गाणं प्रदर्शित; राशाच्या जबरदस्त डान्सने वेधलं लक्ष, नेटकरी म्हणाले, “आईचं नाव…”
Marathi actress Pooja Sawant parents visit their new home in Australia for the first time
Video: पूजा सावंतच्या आई-बाबांनी पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियातील नव्या घराला दिली भेट, लेकीचं प्रशस्त घर पाहून होती ‘ही’ प्रतिक्रिया
Image of Allahabad High Court
“पत्नीने अनैतिक संबंध न ठेवता इतरांना भेटणं म्हणजे…”, २३ वर्षांपासून वेगळं राहणार्‍या पती-पत्नीला घटस्फोट देताना न्यायालयाची महत्त्वपूर्ण टिप्पणी

वहि कर सकें आबाद है॥

आपल्या निर्वाणानंतर आपले कार्य कोणता सच्चा सेवक व प्रचारक पुढे नेऊ शकतो याचा सूचक इशारा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी वरील ओवीतून दिला. प्रचारकच क्रांतीचे अग्रदूत आहेत, हे जाणून महाराजांनी अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळाची स्थापना केली. सेवा मंडळातील प्रचारकांवर भारतात सेवा मंडळाच्या शाखांचा प्रचार, प्रसार व जगात सेवा मंडळाचे तत्त्वज्ञान जनसेवेतून पोहचविण्याची जबाबदारी महाराजांनी दिली. गुरुकुंज आश्रमातील १९६६च्या मध्यवर्ती सभेत महाराज म्हणतात, ‘‘आजीवन प्रचारकांची श्रेणी ही केवळ संस्थेचे सर्वाधिकारी होण्यासाठी नाही. गुरुदेव सेवामंडळाच्या आजीवन प्रचारकांवर सेवेचे तत्त्व लागते. ज्या आजीवन प्रचारकांत ते तत्त्व उतरत नाही त्यांनाही त्यात घेणे चूक आहे. सेवा मंडळाचा आजीवन प्रचारक कोठेही ठरविलेल्या ठिकाणी जाणारा असावा मग थोडेही प्रचारक टिकून राहिले तरी चालेल. पांडव पाचच होते की नाही? जगातील फार मोठी तत्त्वज्ञानी माणसं मंडळात आणून बसविता येतील, पण काम नसेल तर उपयोग नाही. आजीवन प्रचारक तत्त्वज्ञानी पाहिजे. सदाचरणी पाहिजे, त्याच्यात इमानदारी पाहिजे.

सेवापरायतणेचे उदाहरण देताना महाराज म्हणतात, ‘‘आम्ही मंडळात असे ठरविले आहे, की जो मंडळाचा सर्वाधिकारी असेल त्याने प्रसंगी जोडे सांभाळण्याचेही काम केले पाहिजे. सर्व प्रकारची माहिती त्याला असावी.’’ सर्वाधिकाऱ्याचे जीवन आदर्श असावे. आजीवन प्रचारकांची कल्पना अशी आहे की जो माणूस पूर्ण प्रचाराला वेळ देईल तोच खरा आजीवन प्रचारक! जगात सर्वाधिकाऱ्यांना सेवामंडळाचे तत्त्वज्ञान मांडायचे आहे. सेवामंडळाचा उद्याचा सर्वाधिकारी विद्यार्थीही राहणार आहे. असा हा बदलता काळ आहे. लायकी वाढता वाढता ग्रामसेवाधिकारी उद्या सर्वाधिकारी होऊ शकेल, पण ग्रामसेवाधिकारी हा सर्वाधिकारी होण्यासाठी पुढे येऊ पाहत असेल तर तो गावात ग्रामसेवाधिकारीही ठेवण्याच्या योग्यतेचा नाही. सेवा मंडळाचा आदर्श हा जगात दिसायला हवा.

लोक विचारतात की सेवा मंडळाच्या माणसाची ओळख काय आहे? जगातील कोणताही माणूस सेवा मार्गाने चालला तर तोही सेवा मंडळाचा होऊ शकतो पण जो प्रचारार्थ अधिक वेळ देत असेल त्याला आपण आजीवन प्रचारक म्हटला आहे. आपापल्या भावनेने वर न जाता तो गुणांनी कार्याने वर-वर जावे! व त्याला सर्वानी व एकमताने निवडून द्यावे असा आमचा दंडक आहे. मला मंडळाचा सर्वाधिकारी व्हायचे असेल, तर माझे काम मी इमानदारीने करीन! ही त्याची वृत्ती असावी. सेवा करणाऱ्या माणसांची मंडळात चढाओढ लागावी व त्यातून पुढे येणार तो आमचा अधिकारी व्हावा! उद्या संचालक मंडळ अलग पडावं व कार्यकारी मंडळ अलग पडावं असं होऊ नये. उद्या हंसात कावळा येऊन बसला, तर तोही आपणाला ओळखता आला पाहिजे.

राजेश बोबड

Story img Loader