राजेश बोबडे

निश्चयाचे बळ हे केवळ साधन नव्हे, तर ते प्रत्यक्ष फळच आहे, या तुकाराम महाराजांच्या वचनाचा उल्लेख करून मानवाला आत्मविश्वासाची आभा वाढविण्याचा मंत्र देताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, ‘‘निश्चय आपला आहे, तो करणारेही आपणच आहोत व त्याचे फळही आपणासच हवे आहे. ही बाजू विसरून आपण उगीच विसरभोळेपणाचे प्रदर्शन करतो, निराळय़ा संकल्पांची धारणा करतो आणि निराळय़ा फळांची अपेक्षा धरतो. उदाहरणार्थ, मी ध्यानाला बसावे पण ‘समोर मूर्ती गुरुदेवाची आणि मनात चिंता मात्र घराची’, असा प्रकार व्हावा, याला जबाबदार कोण? आपण जे काही करू इच्छितो त्याचा निश्चय आपल्या हृदयात दृढ झालेला नसतो, हेच त्याचे कारण. यामुळे आपल्या सर्व वृत्ती एका प्रवाहात समरस होत नाहीत आणि त्यामुळे आपल्या आतील सुप्त शक्ती जागृत न झाल्याने त्या कार्यात सफलताही प्राप्त होऊ शकत नाही. ज्या क्षणी आपल्या हृदयातील निश्चय दृढ होतो, त्या क्षणी आपल्या वृत्ती एकात्मतेने काम करू लागतात आणि त्या एकतानतेतून प्रकट होणारी शक्ती आपणास तेव्हाच सफल करू लागते, याचा प्रत्यय कोणासही येऊ शकेल.’’

Scientist Rahul Damale selected for Netaji Subhash ICAR International Fellowship
वडील तिसरी उत्तीर्ण तर आई निरक्षर, मुलगा शास्त्रज्ञ झाला, आता परदेशी शिक्षणासाठी निवड
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
decision making process in religious and social welfare
तर्कतीर्थ विचार : धर्मनिर्णय पद्धती व समाजहित
philosophers exploring the good life
तत्त्व-विवेक : सरधोपट जगण्याच्या अल्याडपल्याड…
Article about large religious conference in marathi
तर्कतीर्थ विचार :  वेदांचे पावित्र्य माझ्या हृदयात
Nagpur 3 idiot latest news in marathi,
नागपूर : ‘थ्री इडियट’ फेम सोनम वांगचुक म्हणाले, “विकास करतोय याचा अहंकार नको…”
shikaayla gelo ek marathi drama review
नाट्यरंग : शिकायला गेलो एक! व्यंकूची ‘आज’ची शिकवणी
Special article on occasion of Swami Vivekanandas birth anniversary
धर्म, अस्मिता आणि हिंदू!

आत्मविश्वाची आभा कशी वाढवायची याबाबत महाराज म्हणतात, ‘‘काही लोकांची वृत्ती तर इतकी बहिर्मुख असते, की त्यांना स्वत:ला आपण काय करतो, काय केले पाहिजे आणि ते का, हेच कळत नाही. दुसरीकडे जे दिसेल तेच त्यांना योग्य वाटते. जे जे बघतो तेच करू लागतो, जसे कोणी म्हणेल तसाच बोलू लागतो आणि आपले स्वत्व विसरून इंद्रिये वळवितील तसाच वळत राहतो. असा माणूस आत्मशक्ती कशी प्राप्त करू शकणार? निश्चित धारणा, निश्चय, संयम, तारतम्य व प्रयत्न यांच्या अभावी त्याचे संकल्प निरर्थक ठरतात. माणसाचे आत्मबल कसे वाढत जाते याची उदाहरणे आपण मोठय़ांच्या चरित्रांमधून पाहू शकतो. पण हे लक्षात ठेवले पाहिजे की, कुणाचेही पुस्तक किंवा कुणाचाही अभ्यास जसाच्या तसा आपल्या कामी पडत नसतो. इतरांच्या अनुभवाचा विचारपूर्वक फायदा करून घेता येणे शक्य आहे, पण त्या भांडवलावर विसंबून आपण उन्नत होऊ शकू असे खात्रीने म्हणता येणार नाही. घरातील आई-बाप किंवा इष्टमित्र यांची तपस्यादेखील आपल्या उपयोगाची नसते; मग परक्या थोर पुरुषाचा वा गुरूचा अभ्यास कामी कसा उपयोगी पडेल? ‘आपुली आपण करा सोडवण’ हे सूत्रच सत्य आहे!’’ असे सांगून महाराज ग्रामगीतेत लिहितात,

    जैसी श्रद्ध, जैसा संकल्प।

       जैसा यत्न, पुण्य, पापरूप।

    तैसाचि जीव होई आपोआप।

       अभ्यासाने तयार।।

Story img Loader