एका दिवाळीच्या अनौपचारिक भेटी प्रसंगी पं. जवाहरलाल नेहरू राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना म्हणाले की,‘‘दीनांच्या सेवेची वृत्ती ईसाई लोकांतच प्रकर्षांने दिसून येते आणि त्यासाठी ते आपले जीवनदेखील खर्ची घालतात; उलट हिंदुधर्मात मंदिरे अन् पूजा यांनाच प्राधान्य आहे’’. नेहरूंच्या या निरीक्षणाचा दाखला देऊन महाराज म्हणतात : हिंदुधर्माचा पाया सेवा हाच आहे, पण दुर्दैवाने लोक तेच नेमके विसरले आहेत नि त्यामुळेच भयंकर घोटाळा होत आहे! विशिष्ट वर्गाची चैन किंवा विवक्षित लोकांची चंगळ म्हणजे राष्ट्रातली दिवाळी नव्हे! एकीकडे हजारो लोक पीडित असताना, लोकांच्या प्राथमिक गरजाही भागत नसताना, दुसरीकडे लोकांनी चैनीत आणि फटाके उडविण्यात हजारो रुपयांचा चुराडा करावा ही गोष्ट माणुसकीला काळिमा फासणारी आहे. देशात आज एकराष्ट्रीयतेची म्हणजेच खऱ्या बंधुत्वाची भावना फार कमी झाली आहे; पंथपक्षांचे मतभेद माजविण्याचा आणि सत्तामोहाच्या भरीस पडून कामाचा विचका करण्याचा कार्यक्रम सर्वत्र बोकाळला आहे. धार्मिक म्हणविणाऱ्या लोकांतही आपल्या बांधवांची दैना पाहून सेवेसाठी पुढे येण्यास धजण्याची प्रवृत्ती दिसत नाही.

जो तो आपल्यातच खूश आहे आणि तिकडे शेकडो प्रश्न जनतेच्या गळय़ाला तात लावत आहेत. आमचे धार्मिक लोक, बुवामहात्मे, राजकीय पुढारी आणि समाजसुधारक खरोखरच हजारो पीडित, दलित, अशिक्षित, अर्धपोटी व आजारी अशा करोडो भारतीयांच्या उन्नतीचा व सुखशांतीचा प्रश्न हा सर्वात पहिला प्रश्न समजून सेवेसाठी कंबर कसायला हवी! देव पंढरपूरच्या मंदिरातच किंवा तिजोरीच्या पूजनातच नाही. आमच्या देशातील हजारो लोक झाडाखाली, रस्त्यांवर, भटक्या अवस्थेत व दारिद्र्याच्या खाईत पिचत पडले आहेत. ही जितीजागती ३३ कोटी देवांची मंदिरे आता आपण सजविली पाहिजेत; त्याऐवजी नवनवी गोटय़ामातीची मंदिरे बांधण्याचा हव्यास म्हणजे निव्वळ खुळेपणा आहे! या विशाल मानवसमुदायाचे जर आम्ही योग्य पोषण व संरक्षण केले; जर त्यांच्यातील सुप्त अशा शक्तीचा विकास घडवून आणला तर जगात आपले राष्ट्र सर्वतोपरी अजिंक्य व आदर्श ठरल्याशिवाय राहणार नाही. या दिशेने विचार केल्यास, तलवारीचा मुकाबला जशी ढाल करू शकते, त्याप्रमाणे अणुबॉम्बचा प्रतिकारदेखील ही सेवाच करू शकेल ! सेवेच्या प्रभावाने सर्व लोकात माणुसकी जागून मतभेद मिटल्यास जी अभेद्य शक्ती उत्पन्न होईल तीच शांतीचे जीवन जगणारा आदर्श मानवसमाज निर्माण करू शकेल! त्यासाठी सर्वानी आपल्यापुरतेच न पाहता घराघरांतून दीप उजळण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ही दिवाळी जर आपण राष्ट्रात साजरी न केली तर होळी पेटायला वेळ लागणार नाही हे लक्षात ठेवावे.

Naga Sadhus Enchant Devotees At Triveni Sangam on Makar Sankranti
संक्रातीच्या मुहूर्तावर ‘अमृत स्नान’; नागा साधूंना पहिला मान; त्रिवेणी संगमावर भाविकांचा महापूर
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Meta x gets rid of fact checkers
अग्रलेख : फेकुचंदांचा फाल्गुनोत्सव!
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : “श्रद्धा आणि सबुरीचा अर्थ समजला नाही, त्यांची हालत काय झाली? हे विधानसभेला…”, देवेंद्र फडणवीसांची विरोधकांवर टीका
devendr fadnavis sanjay raut
“होय, म्हणून फडणवीसांचे कौतुक”, संजय राऊत यांनी स्पष्टच सांगितले…
Prime Minister Narendra Modi  statement on the occasion of Pravasi Bharatiya Diwas
भविष्य हे युद्धाचे नसून, बुद्धांचे! प्रवासी भारतीय दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन
Ajit Pawar clarification on the Beed case pune news
पक्ष न पाहता दोषींना कठोर शिक्षा; बीड प्रकरणी अजित पवार यांची स्पष्टोक्ती
some bad decisions happened on eknath shinde tenure as chief minister says forest minister ganesh naik
एकनाथ शिंदे यांच्या कालखंडात काही चुकीच्या गोष्टी घडल्या; वनमंत्री गणेश नाईक यांचे विधान

महाराज ग्रामगीतेत लिहितात :

दिवाळीचा सण आला। सर्वानीच पाहिजे केला।

परि पाहावा कोण राहिला। भुकेला घरी॥

त्यास आमंत्रित करावे।  गोडधड भोजन द्यावे।

परस्परांनी मिळून चालवावें। वैभव सर्वाचे॥

राजेश बोबडे

Story img Loader