एका दिवाळीच्या अनौपचारिक भेटी प्रसंगी पं. जवाहरलाल नेहरू राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना म्हणाले की,‘‘दीनांच्या सेवेची वृत्ती ईसाई लोकांतच प्रकर्षांने दिसून येते आणि त्यासाठी ते आपले जीवनदेखील खर्ची घालतात; उलट हिंदुधर्मात मंदिरे अन् पूजा यांनाच प्राधान्य आहे’’. नेहरूंच्या या निरीक्षणाचा दाखला देऊन महाराज म्हणतात : हिंदुधर्माचा पाया सेवा हाच आहे, पण दुर्दैवाने लोक तेच नेमके विसरले आहेत नि त्यामुळेच भयंकर घोटाळा होत आहे! विशिष्ट वर्गाची चैन किंवा विवक्षित लोकांची चंगळ म्हणजे राष्ट्रातली दिवाळी नव्हे! एकीकडे हजारो लोक पीडित असताना, लोकांच्या प्राथमिक गरजाही भागत नसताना, दुसरीकडे लोकांनी चैनीत आणि फटाके उडविण्यात हजारो रुपयांचा चुराडा करावा ही गोष्ट माणुसकीला काळिमा फासणारी आहे. देशात आज एकराष्ट्रीयतेची म्हणजेच खऱ्या बंधुत्वाची भावना फार कमी झाली आहे; पंथपक्षांचे मतभेद माजविण्याचा आणि सत्तामोहाच्या भरीस पडून कामाचा विचका करण्याचा कार्यक्रम सर्वत्र बोकाळला आहे. धार्मिक म्हणविणाऱ्या लोकांतही आपल्या बांधवांची दैना पाहून सेवेसाठी पुढे येण्यास धजण्याची प्रवृत्ती दिसत नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा