गौतम बुद्धांनी मोक्षाची किंवा निर्वाणाची पर्वा न करता जनजागृतीसाठी धम्मचक्राचा आरंभ केला, तर बुद्धजयंतीदिनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी एक कोटी तासांच्या समयदान यज्ञातून देशातील दुभंगलेल्या श्रमशक्तीला क्रियाशील वळण देऊन आपले गावच तीर्थ होवू शकते हे आपल्या कृतीने दाखवून दिले!  समयदान  करण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव व कात्री येथे एकदा दौऱ्यावर असताना महाराज म्हणाले: आपल्या गावात माझे नुसते स्वागत उपयोगाचे नाही; काही कार्याचा संकल्प करा. कोणी सत्पुरुष गावी येत असेल तर तेवढय़ापुरते रस्ते साफ, दुसरे दिवशी जिकडे तिकडे घाणच; यात काय अर्थ? ‘महात्मा गांधी की जय’ म्हणायचे पण काळाबाजार करायचा, या विसंगतीने आपला आणि देशाचा उद्धार कधीतरी होऊ शकेल काय? हे आता बदलले पाहिजे. आपल्या बांधवासाठी समयदान करण्याचा निर्णय घेऊन सारी सृष्टी उभी करायची नसून फक्त आपले गावच दुरुस्त करा, देव पंढरपुरातच नाही; गावागावांत आहे. आपापले गाव आपणास तीर्थक्षेत्र बनविता आले पाहिजे. यातच भक्तीचे वैभव आहे!

समयदानाची संकल्पना मांडताना महाराज म्हणतात : समयदान म्हणजे दिवसाच्या २४ तासांपैकी फक्त एक – एक तास आपल्या बांधवांसाठी देणे. आपल्याच गावात, आपल्याच शेजारीपाजारी असणाऱ्या लोकांना ‘जे जे आपणासी ठावे’ असेल ते दररोज शिकवावे, कोणी व्यायाम शिकवावा, कोणी उद्योग शिकवावा, आपणास येत असलेली कोणती तरी कला कोणी शिकवावी. ज्याला काहीच येत नसेल त्याला काहीतरी शिकण्यासाठी वेळ देता येईल; गावासाठी तेवढा वेळ श्रमदान करता येईल. धनवान लोक गरिबांची घरे बांधून देऊ शकतील; सार्वजनिक सोयीच्या गोष्टी गावात निर्माण करू शकतील. अशा तऱ्हेने समयदान करून जनजागृतीची लाटच उठवून देता येईल. असे झाले तर आमच्या गावचा एकही मनुष्य अडाणी, बेकार, दुबळा, परावलंबी असा राहणार नाही. सारे गाव जागृतीने चमकून उठेल. देशाची फार मोठी समस्या हां- हां म्हणता सुटेल. गौतम बुद्धांनी आपल्या अमोल आयुष्याचे क्षण जगाला अर्पण केले. जात-पंथ, स्त्री-पुरुष, उंच-नीच असला कोणताही भेदभाव न ठेवता सर्वाना ज्ञानाची पर्वणी दिली. त्यांचे स्मरण म्हणूनच या समयदानयज्ञाशी मी जोडून घेतले आहे. वस्तुत: मी बुद्धसंप्रदायीच आहे असे नाही; मी सर्वच संप्रदायांचा आहे, जो कोणी आपल्या व्यक्तित्वात गुरफटून न राहता समाजाचे कार्य करतो, कल्याण करतो त्याचा संप्रदाय वा धर्म कोणताही असो, तो मला मान्य आहे. ‘बहुजनहिताय बहुजनसुखाय’ हे भगवान बुद्धांचे सूत्र कोण अमान्य करील? भगवान बुद्धांचे गौरवगीत किंवा चरित्र पुराणाप्रमाणे ऐकायचे, त्यावर फुले वाहायची पण त्यांच्या आदर्शाकडे डोळेझाक करायची या भक्तीला काही अर्थ उरत नाही. त्यांचा उपदेश व आदर्श डोळय़ापुढे ठेवून आपणा सर्वाना पुढचे पाऊल घेतले पाहिजे. त्यांचे स्मरण करून समाजात जनजागृतीची लाट उसळून दिली पाहिजे.

Maharashtra Public Holiday 2025 List in Marathi
Maharashtra Holiday List 2025 : सरकारी कर्मचाऱ्यांची सुट्ट्यांची यादी जाहीर! २४ सार्वजनिक सुट्ट्यांसह मिळेल ‘ही’ एक्स्ट्रा सुट्टी
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
aditi tatkare ladki bahin yojana
Ladki Bahin Yojana: आता ‘या’ महिलांनाही मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ, संख्या १२ लाखांच्या घरात!
Today is the shortest day and longest night of the year
आज वर्षातील सर्वात लहान दिवस व सर्वात मोठी रात्र, जाणून घ्या नेमकं असं का?
Mora port, Signature campaign, Mora port news,
मोरा बंदरातील गाळ काढण्याच्या मागणीसाठी स्वाक्षरी मोहीम
Venus jupiter combination Navpancham Rajayoga
आजपासून नुसती चांदी; नवपंचम राजयोग ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना देणार पैसा, प्रसिद्धी आणि प्रत्येक कामात यश
Power supply in Karanjade Colony interrupted for over nine hours on Monday
करंजाडेवासीय ९ तास विजेविना
Pankaj Bhoyar, Pankaj Bhoyar Minister,
वर्धा : विद्यार्थी नेता ते थेट मंत्री, संघटन कौशल्यावर राजमुद्रा उमटली

राजेश बोबडे

Story img Loader