गौतम बुद्धांनी मोक्षाची किंवा निर्वाणाची पर्वा न करता जनजागृतीसाठी धम्मचक्राचा आरंभ केला, तर बुद्धजयंतीदिनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी एक कोटी तासांच्या समयदान यज्ञातून देशातील दुभंगलेल्या श्रमशक्तीला क्रियाशील वळण देऊन आपले गावच तीर्थ होवू शकते हे आपल्या कृतीने दाखवून दिले! समयदान करण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव व कात्री येथे एकदा दौऱ्यावर असताना महाराज म्हणाले: आपल्या गावात माझे नुसते स्वागत उपयोगाचे नाही; काही कार्याचा संकल्प करा. कोणी सत्पुरुष गावी येत असेल तर तेवढय़ापुरते रस्ते साफ, दुसरे दिवशी जिकडे तिकडे घाणच; यात काय अर्थ? ‘महात्मा गांधी की जय’ म्हणायचे पण काळाबाजार करायचा, या विसंगतीने आपला आणि देशाचा उद्धार कधीतरी होऊ शकेल काय? हे आता बदलले पाहिजे. आपल्या बांधवासाठी समयदान करण्याचा निर्णय घेऊन सारी सृष्टी उभी करायची नसून फक्त आपले गावच दुरुस्त करा, देव पंढरपुरातच नाही; गावागावांत आहे. आपापले गाव आपणास तीर्थक्षेत्र बनविता आले पाहिजे. यातच भक्तीचे वैभव आहे!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा