सिक्कीम राज्यात अनेक वर्षे राजेशाही होती. नामग्याल कुळातील राजे सिक्कीमवर राज्य करत होते. भारताला १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले आणि त्यांनतर सिक्कीमच्या राजाने भारतासोबत करार केला. या करारानुसार सिक्कीम हे ‘संरक्षित राज्य’ झाले. संरक्षण, परराष्ट्र धोरण आणि संदेशवहन या बाबतीत भारत सरकार निर्णय घेईल. सिक्कीमला बाकी बाबतीत स्वायत्तता असेल, असा तो करार होता. संरक्षित राज्याची ही अट भारताने मान्य केली. सिक्कीमलगतच्या तिबेट आणि तिथून चीन यांच्या अस्तित्वामुळे सिक्कीमचे विशेष महत्त्व होते. चीनच्या आक्रमक कारवाया सुरूच होत्या. अशा अवस्थेत १९५९ साली १४ वे दलाई लामा पं. नेहरूंना भेटले. तिबेटमधील निर्वासितांचा प्रश्न त्यांनी मांडला. नेहरूंनी त्यांचं प्रेमानं स्वागत केलं. भारताने दिलेली ही वागणूक सिक्कीमच्या लोकांसाठी महत्त्वाची ठरली. भारत हा उदार, शांततापूर्ण देश आहे, हे लोकांच्या लक्षात आले. त्यामुळेच १९७४ साली जेव्हा भारतात सामील होण्याच्या अनुषंगाने सार्वमत घेतले तेव्हा ९७ टक्के लोकांनी भारतात सामील होण्याला कौल दिला. परिणामी १९७५ साली सिक्कीम भारताचे अधिकृतरीत्या २२ वे राज्य म्हणून संघराज्यास जोडले गेले. या राज्यासाठीच्या विशेष तरतुदी अनुच्छेद ३७१ (च) मध्ये आहेत. त्यानुसार विधानसभा आणि लोकसभेच्या जागा निर्धारित केलेल्या आहेत. सिक्कीममधील विविध समुदायांना प्रतिनिधित्व मिळेल, अशा तऱ्हेने या तरतुदी आखलेल्या आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा