आसाराम लोमटे
हानूश नावाचा एक कारागीर. तो कुलुपं तयार करायचा. त्याची कात्या नावाची बायको ही कुलुपं बाजारात नेऊन विकायची. त्यातून त्यांच्या संसाराची गुजराण व्हायची. या जोडप्याला यान्का नावाची एक मुलगी आणि हानूशला कुलुपं तयार करण्याच्या कामात मदत करणारा जेकब नावाचा एक तरुण. हे दररोजचं कुलूप तयार करण्याचं चाकोरीतलं काम सोडून आपण एक मोठं घड्याळ तयार करावं असं हानूशला वाटतं. तहानभूक हरपून तो या कामात स्वत:ला झोकून देतो. आधी काही कुलुपं विकल्यानंतर संसाराचा गाडा चालायचा, त्याची चाकं एकएकीच गाळात रुतली. कारण उत्पन्नाचं साधनच उरलं नाही. हळूहळू सगळ्या घरादाराला अवकळा येते. हानूशची बायको हतबल होते. काय मिळवलं या माणसाशी लग्न करून. असं वाटतं की याचं हे घड्याळ तयार करण्याचं सामान खिडकीतून फेकून द्यावं. जेव्हा पाहावं तेव्हा आपलं एकच घड्याळ… घड्याळ. समजा यानं ते नाहीच तयार केलं तर काय जगरहाटी थोडीच थांबणार आहे. कात्या प्रचंड वैतागलेली आहे. दिवसामागून दिवस जात असतात. एक दिवस असा उजाडतो की हानूशचं घड्याळ बनवण्याचं स्वप्न वास्तवात उतरलेलं असतं, पण त्यासाठी त्याच्या आयुष्यातली तब्बल सतरा वर्षे गेलेली असतात. मग हे घड्याळ लावायचं कुठं यावरूनही बराच काथ्याकूट होतो आणि शेवटी एका मिनारवर ते लावलं जातं. तिथल्या बादशहाला वाटतं की ही एक अपूर्व अशी चीज निर्माण झाली आहे. या कारागिराचा सन्मान झालाच पाहिजे. मग हानूशला बक्षिसी म्हणून बरीच संपत्ती मिळते, पण आपल्या राज्याखेरीज अन्यत्र कुठेही आता हे घड्याळ बनवलं जाऊ नये यासाठी या कारागिराचे हात तोडले पाहिजेत असं बादशहाला वाटतं… पण हात तोडून काय उपयोग? त्याचे डोळे तर शाबूत आहेत. तो अन्य कुणाला घड्याळ कसं तयार करायचं हे सांगू शकतो. हात नाहीत म्हणून काही अडणार नाही. मग विचारांती त्याचे डोळे काढण्याचं फर्मान सोडलं जातं. हानूश कायमचे डोळे गमावतो.

हेही वाचा : लोकमानस : त्यापेक्षा प्रशासन सुधारा!

Milind Bokil receives Social Awareness Award from Marwadi Foundation prabodhankar Thackeray
घरात धर्म आणि रस्त्यावर धम्म…
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
loksatta editorial Donald Trump 2024 presidential campaign
अग्रलेख: सुज्ञ की सैतान?
loksatta editorial Supreme court verdict on madrasa
अग्रलेख: मदरसे ‘कबूल’
the last book store
बुकमार्क : ‘ऑनलाइन’च्या महापुरातून वाचलेले लव्हाळे…
Loksatta editorial Donald Trump won US presidential election
अग्रलेख: तो परत आलाय…
loksatta editorial on aliens
अग्रलेख : ‘तारे’ तोडण्याचे तर्कट!
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…

एकदा हे घड्याळ बंद पडतं तेव्हा पुन्हा त्याला त्या मिनारजवळ बोलावलं जातं. बंद पडलेल्या घड्याळावर एकदाचं काहीतरी फेकून मारावं कारण त्यामुळेच आपण आपले डोळे गमावलेत असं हानूशला सुरुवातीला वाटू लागतं, पण जेव्हा घड्याळावरून त्याचा हात फिरू लागतो तेव्हा त्याचं शरीर झंकारलं जातं. तो नखशिखांत शहारतो. यातल्या कणा-कणाशी आपलं भावनिक नातं आहे अशी भावना त्याच्यात दाटून येते. आधीचा त्वेष गळून जातो, चाचपडत तो या दुरुस्तीच्या कामाला लागतो. खूप झटापट केल्यानंतर या बंद पडलेल्या घड्याळाची टिकटिक पुन्हा चालू करण्यात त्याला यश येतं. घड्याळ पुन्हा सुरू झालंय पण बादशहाच्या माणसांना आठवतं, हानूशचा जो सहकारी होता जेकब तो कुठंय. तोसुद्धा घड्याळ तयार करण्याची कला जाणतो. याचे जरी डोळे गेले तरी तो मात्र अजून जिवंत आहे. अन्य राज्यातही तो अशी घड्याळं तयार करील. या घड्याळाची प्रतिकृती अन्यत्र दिसायला नको. हे एकमेव राहावं. पण यादरम्यान जेकबने शहर सोडलेलं असतं. मग हानूशला पुन्हा ताब्यात घेतलं जातं. आता मात्र त्याच्या चेहऱ्यावर जराही काळजी नसते. त्याला वाटतं, बादशहाचा हुकूम आपल्याला शिरसावंद्या आहे. आता घड्याळ तयार केलं जाऊ शकतं. ते बंदही होऊ शकतं. घड्याळ तयार करणारा आंधळाही होऊ शकतो… पण ही काही फार मोठी गोष्ट नाही. जेकब शहराबाहेर निघून गेला. आता या घड्याळाचं रहस्य जिवंत राहिलं आहे आणि हीच सगळ्यात मोठी गोष्ट आहे.

भीष्म साहनी यांच्या ‘हानूश’ या नाटकाचं हे कथानक आहे. याला कितीतरी आयाम आहेत. म्हटलं तर हे सत्ता आणि सर्जन यांचं द्वंद्वही मानता येईल. उत्तमाच्या ध्यासाने झपाटलेल्या कलावंताच्या आयुष्यात काय घडू शकतं याचंही हे उदाहरण आहे. स्वत:च्या निर्मितीची प्राणपणानं किंमत चुकवण्याचं असाधारण धैर्यही यातून प्रतीत होतं. घड्याळ ही एक नवनिर्मिती झाली. अशी कुठलीही कलाकृती त्या त्या काळात जन्माला येते तेव्हा त्यामागे कितीतरी संदर्भ असतात. ती त्या काळाचेच प्रतिनिधित्व करत असते. काळ वाहत असतो आणि कोणताही कलावंत काळाला समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो. कितीतरी गोष्टी काळाच्या पोटातच जन्माला येतात. प्रत्येकाची काळाला समजून घेण्याची रीत निराळी असते. काळाला भिडणं निराळं असतं… आता ह्यहानूशह्णच्या घड्याळाचाच विषयच निघाला आहे तर असंही म्हणता येईल की सगळ्यांच्या घड्याळात एकावेळी विशिष्ट ठिकाणीच काटे असतील पण म्हणून सगळ्यांच्या वाट्याला आलेला काळ काही सारखा असत नाही. प्रत्येकाच्या पुढ्यात काळाने निर्माण करून ठेवलेले गुंते वेगवेगळे आहेत. काळ नावाची गोष्ट डोळ्यांना दिसत नाही. ती धरूनही ठेवता येत नाही. त्याचं एक विशिष्ट असं व्यक्तिमत्त्वही नाही. वास्तव हेच काळाला समजून घेण्याचं साधन आहे.

हेही वाचा : बुकबातमी : लेखकाच्या सर्व छटा…

साहित्य आणि समाज यांच्यातल्या अतूट नात्याची चर्चा वारंवार होते. साहित्यात काळाचं प्रतिबिंब उमटतं असं आपण म्हणतो पण काळाची तरी एकच एक रूपे कुठे असतात. एकाच काळात विभिन्न पातळ्यांवर माणसं जगत असतात. एकाच काळात चार- पाच पिढ्यांचे प्रतिनिधी लिहित असतात. प्रत्येकाची अनुभूती वेगळी असते. जगण्याचे स्तरही भिन्न असतात. तरीही आपण एका काळाने जोडलेल्यांना समकालीन असे म्हणू लागतो. घड्याळ असो की पुस्तकं, चित्र असो की शिल्प या सगळ्या कलाकृती एका अर्थाने काळालाच सामावून घेण्याचं आणि गोठवण्याचंही काम करतात. शिल्पात, पुस्तकात, चित्रात काळ थिजतो… गोठला जातो. त्या त्या काळात उच्चारले गेलेले शब्द दस्तावेज बनून राहतात. हा कालस्वरही बहुविध असतो. त्यात अनेकांचे आवाज मिसळलेले असतात. या उच्चाराची भाषा, तिचा पोत एकसारखा असत नाही. ही बहुविधता हेच साहित्याचे सौंदर्य आहे. जसा काळ एकसुरी असत नाही तसाच समाजही. काळ आव्हानात्मक, विराट आणि समाजाचा पटही विशाल. एकाच काळात अनेक गोष्टींचा संघर्ष चाललेला असतो आणि त्यातूनच नवे काही आकाराला येत असते. कालचा काळ साहित्यातून कळतो. आजच्या काळाचं आव्हान समजून घेण्यासाठी साहित्यच मदत करतं आणि उद्याचा काळ उमगण्याची दृष्टीही साहित्यातूनच मिळते. काळच अनेकांना निकाली काढतो. वर्तमानकाळातही अनेक जण कालबाह्य वाटू लागतात आणि गतकाळातला एखादा लेखक आजही समकालीन वाटू लागतो. काही पुस्तकं पुन्हा पुन्हा सर कराव्या वाटणाऱ्या डोंगरांसारखी असतात, प्रत्येक पुनर्वाचनात त्यांचे नवे अर्थ, नव्या जागा सापडू लागतात.

तुकोबारायांनी लिहून ठेवलंय ‘काळ सारावा चिंतने’!… यातली ‘सारावा’ ही क्रिया महत्त्वाची. खरंतर साहित्याचा धर्मही तोच आहे. जसं वर्तमान असेल तशी काळाची स्पंदनं असतील. वर्तमान दु:सह असेल तर ते शब्दातूनही तसंच उमटणार. ह्यकहत कबीर संत न सुरमा, काल निचोडके अमृत पी लेह्ण असं कबीर म्हणाले. इथे काळालाच पिळून टाकण्याच्या कृतीची अपेक्षा व्यक्त केली आहे. यातून अमृतच बाहेर येईल हा संतांचा आदर्शवाद असू शकतो. वर्तमानाला पिळून काढण्यातून जे बाहेर येईल ते अमृतच असतं असं नाही. त्याची चव कडवटही असू शकते, हे सुद्धा जगभरातल्या अनेक कलाकृतींनी दाखवून दिलंय… तर यानिमित्ताने समकालीनता, साहित्य, समाज यासंबंधी काही नोंदी इथे केल्या जातील. भारतीय साहित्याच्या उजेडात त्यांना निरखण्याचा प्रयत्न केला जाईल. संदर्भांसाठी तळटिपा नेहमीच महत्त्वाच्या. वर्तमानातल्याच तळटिपा पुस्तकांच्या पानात आढळत असतात. त्यासाठीच तर काळाचे तुकडे समजावून घ्यायचे.

लेखक साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त साहित्यिक आहेत.

aasaramlomte@gmail.com

Story img Loader