आसाराम लोमटे
हानूश नावाचा एक कारागीर. तो कुलुपं तयार करायचा. त्याची कात्या नावाची बायको ही कुलुपं बाजारात नेऊन विकायची. त्यातून त्यांच्या संसाराची गुजराण व्हायची. या जोडप्याला यान्का नावाची एक मुलगी आणि हानूशला कुलुपं तयार करण्याच्या कामात मदत करणारा जेकब नावाचा एक तरुण. हे दररोजचं कुलूप तयार करण्याचं चाकोरीतलं काम सोडून आपण एक मोठं घड्याळ तयार करावं असं हानूशला वाटतं. तहानभूक हरपून तो या कामात स्वत:ला झोकून देतो. आधी काही कुलुपं विकल्यानंतर संसाराचा गाडा चालायचा, त्याची चाकं एकएकीच गाळात रुतली. कारण उत्पन्नाचं साधनच उरलं नाही. हळूहळू सगळ्या घरादाराला अवकळा येते. हानूशची बायको हतबल होते. काय मिळवलं या माणसाशी लग्न करून. असं वाटतं की याचं हे घड्याळ तयार करण्याचं सामान खिडकीतून फेकून द्यावं. जेव्हा पाहावं तेव्हा आपलं एकच घड्याळ… घड्याळ. समजा यानं ते नाहीच तयार केलं तर काय जगरहाटी थोडीच थांबणार आहे. कात्या प्रचंड वैतागलेली आहे. दिवसामागून दिवस जात असतात. एक दिवस असा उजाडतो की हानूशचं घड्याळ बनवण्याचं स्वप्न वास्तवात उतरलेलं असतं, पण त्यासाठी त्याच्या आयुष्यातली तब्बल सतरा वर्षे गेलेली असतात. मग हे घड्याळ लावायचं कुठं यावरूनही बराच काथ्याकूट होतो आणि शेवटी एका मिनारवर ते लावलं जातं. तिथल्या बादशहाला वाटतं की ही एक अपूर्व अशी चीज निर्माण झाली आहे. या कारागिराचा सन्मान झालाच पाहिजे. मग हानूशला बक्षिसी म्हणून बरीच संपत्ती मिळते, पण आपल्या राज्याखेरीज अन्यत्र कुठेही आता हे घड्याळ बनवलं जाऊ नये यासाठी या कारागिराचे हात तोडले पाहिजेत असं बादशहाला वाटतं… पण हात तोडून काय उपयोग? त्याचे डोळे तर शाबूत आहेत. तो अन्य कुणाला घड्याळ कसं तयार करायचं हे सांगू शकतो. हात नाहीत म्हणून काही अडणार नाही. मग विचारांती त्याचे डोळे काढण्याचं फर्मान सोडलं जातं. हानूश कायमचे डोळे गमावतो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा