योगेंद्र यादव
मणिपूरबद्दल आवाज उठवणारे हिंसाचाराच्या इतर घटनांबद्दल का बोलत नाहीत, असा प्रश्न विचारणाऱ्यांना नागरिक म्हणून संवेदनशील आणि जागरूक असण्याबद्दलचे चार मुद्दे माहीत असायलाच हवेत..

‘मणिपूरमध्ये जे घडले ते खरोखरच लाजिरवाणे होते. पण हिंसाचार, खून आणि बलात्कार इतर ठिकाणीही होतात, तुम्ही त्या सगळय़ाबद्दल का बोलत नाही?’

pushpa 2 song controversy
चेंगराचेंगरीनंतर ‘पुष्पा २’बद्दल नवा वाद, निर्मात्यांना युट्युबवरून हटवावं लागलं ‘हे’ लोकप्रिय गाणं; कारण काय?
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
loksatta editorial on rupee getting weaker day by day against the dollar
अग्रलेख : बबड्या रुपया, कारटा डॉलर
Sharad Pawar
“राज्यात दहशतीचं वातावरण, कृपा करा अन्…”, शरद पवारांकडून मस्साजोगच्या ग्रामस्थांना धीर; म्हणाले, “आता आपण सगळ्यांनी…”
‘या’ अभिनेत्याची एक चूक मनोज बाजपेयी यांच्या जीवावर बेतली असती; स्वतः खुलासा करत म्हणाले, “आमची जीप एका मोठ्या…”
What Sunil Tatkare Said About Chhagan Bhujbal ?
Sunil Tatkare : “छगन भुजबळ यांच्याविषयी येवल्यात जाऊन कोण काय बोललं होतं ते…”; सुनील तटकरेंचं सुप्रिया सुळेंना उत्तर
Milind Gawali
“१२ वीमध्ये मी मराठी विषयामध्ये नापास झालो”; मिलिंद गवळी म्हणाले, “मी वर्गात जाताना…”
loksatta readers feedback
लोकमानस: मारकडवाडीतील दडपशाही असमर्थनीय

ही सगळी चर्चा कुठल्या दिशेने जाणार ते मला माहीत होतं, पण तरीही मी म्हणालो, ‘‘प्रत्येक खुनाबद्दल, प्रत्येक बलात्काराबद्दल प्रत्येकजण बोलू शकत नाही. तुम्हीही नाही. या देशात दररोज ८० खून होतात, ८५ बलात्कार नोंदवले जातात, आणखी किती होत असतील माहीत नाही. आपल्याला सगळय़ांना सगळय़ाबद्दल माहिती नाही किंवा बोलता येत नाही, किंवा बोलण्याची गरजही नसते. त्यामुळे आपण फक्त काही निवडक घटनांवर बोलू शकतो.’’
पण तो बोलणारा ही सगळी चर्चा सोडून देण्याच्या मन:स्थितीत नव्हता. तो म्हणाला ‘‘हो, निवडावे तर लागेलच. मग तुम्ही कोणत्या आधारावर निवडता, ते तरी सांगा. तुम्ही अत्याचाराच्या प्रत्येक घटनेवर का बोलत नाही?’’

खूप दिवसांपासून मी या प्रश्नाची वाट पाहत होतो, म्हणून मी लगेच समजावून सांगायला लागलो. ‘‘हे बघा, प्रत्येक हिंसा, प्रत्येक खून, प्रत्येक बलात्कार हा दु:खद, निषेधार्ह आहे. एखाद्या घटनेवर आपण कशी प्रतिक्रिया द्यायची हे चार गोष्टींवर अवलंबून आहे. सगळय़ात पहिली गोष्ट म्हणजे, ती घटना आपल्यासाठी किती जवळची आहे? माझ्यासमोर किंवा माझ्या शेजारी छेडछाडीची घटना घडली तर मी ती दूरच्या ठिकाणची हत्या आणि बलात्कार म्हणून आंधळेपणाने चर्चा करू शकत नाही. त्या घटनेवर प्रतिक्रिया देणे हे माझे प्रथम कर्तव्य आहे. दुसरी गोष्ट म्हणजे त्या घटनेचे स्वरूप. साहजिकच हिंसाचाराचे काही प्रकार त्यांच्यातील क्रौर्यामुळे मानवी संवेदनांना अधिक स्पर्श करतात. आपल्याकडून प्रतिक्रियेची अपेक्षा करतात. दिल्लीतील निर्भया किंवा जम्मूतील असिफा या अशा काही घटना होत्या. तिसरी गोष्ट आहे, त्या हिंसेचा संदर्भ. ही घटना एका व्यापक पॅटर्नचे उदाहरण आहे का? हा एका सामाजिक समूहाविरुद्ध अन्याय आणि हिंसेच्या व्यापक चक्राचा भाग आहे का? जिथे हे घडते तिथे आपला प्रतिसाद अधिक तात्काळ आणि तीव्र असायला हवा, म्हणून महिलांवरील हिंसा किंवा हिंसाचार, अमेरिकेतील कृष्णवर्णीयांविरोधातील हिंसा अधिक लक्ष वेधून घेतात. त्यामुळेच मुस्लिमांचे झुंडबळी होतात, त्यासंदर्भातील बातम्यांवर प्रत्येक भारतीयाने नैतिक प्रतिसाद देणे अपेक्षित असते. चौथी आणि सगळय़ात मोठी गोष्ट म्हणजे हिंसाचाराच्या घटनेत पोलीस, प्रशासन, सरकार आणि सत्तेत असलेल्यांची भूमिका. कारण अशा घटना रोखणे ही त्यांची जबाबदारी आहे, त्यामुळे साहजिकच ते आपली जबाबदारी पार पाडण्यात कमी पडतात किंवा पीडितेऐवजी गुन्हेगाराच्या पाठीशी उभे राहताना दिसतात, तेव्हा आवाज उठवणे ही आपली जबाबदारी आहे. १९८४ मधील शीखांची कत्तल असो किंवा मलायाणातील मुस्लिमांची सामूहिक हत्या असो किंवा २००२ मधील गुजरातमधील मुस्लिमांची हत्या असो. राज्य गुन्हेगारांच्या पाठीशी उभे असते, तिथे हिंसाचार पीडितांच्या पाठीशी उभे राहणे हा प्रत्येक नागरिकाचा पहिला धर्म आहे.’’

माझी भूमिका अधिक स्पष्ट करताना मी म्हणालो, ‘‘अशा प्रत्येक घटनेवर प्रतिक्रिया देणे कोणत्याही माणसासाठी शक्य नाही आणि उचितही नाही. परंतु मी माझा प्रतिसाद निवडताना या चार गोष्टी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करतो. माझ्याकडून दुटप्पीपणा होणार नाही, हे पाहतो.’’
माझ्या या एवढय़ा लांबलचक स्पष्टीकरणाने त्याला कंटाळा येऊ लागला होता, पण त्याने माझे शेवटचे वाक्य पकडले आणि म्हणाला, ‘‘मी कोणत्याही तत्त्वज्ञानाबद्दल बोलत नाहीये. माझा स्पष्ट प्रश्न असा आहे की तुम्ही मणिपूरवर बोलता पण बंगाल, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये झालेल्या हिंसाचारावर का बोलत नाही?’

आता मात्र मला एक खुलासा करणे भाग होते. ‘‘मला असे वाटत होते की मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर दिले आहे, परंतु तुम्हाला अधिक थेट आणि अधिक स्पष्ट शब्दांत हवे असेल तर ऐका. मणिपूरमधील हिंसाचाराची घटना वर सांगितलेले चारही निकष पूर्ण करते. सगळय़ात पहिली गोष्ट म्हणजे मणिपूर हा आपल्याच देशाचा अविभाज्य भाग आहे. ईशान्येतील लोकांचे नेहमीच असे म्हणणे असते की भारतात वावरताना त्यांना परकेपणाची जाणीव असते. तिथे सुरू असलेल्या अखंड हिंसाचाराबद्दल मौन बाळगणे हा खरे तर त्यांना दिल्या जाणाऱ्या या मानसिकतेचाच भाग झाला. देशाशी कसलीही बांधिलकी नसलेले आपल्याकडचे ढोंगी लोक टीव्हीवरच्या बातम्यांमध्ये फ्रान्समधल्या घटना दाखवतात, पण मणिपूरवर पांघरूण घालतात. दुसरी गोष्ट म्हणजे, मणिपूरमधील अत्याचाराची घटना आता त्या व्हिडीओच्या माध्यमातून आपल्यासमोर आली आहे, पण गेल्या दोन महिन्यांपासून डझनभर पुरावे आले आहेत. तिसरी गोष्ट म्हणजे, दृश्य चित्रण केलेली घटना ही अपवादात्मक नव्हती, की ती काही स्थानिकांमधल्या भांडणाची परिणती नव्हती. राज्यात अशा शेकडो घटना घडल्याचे खुद्द तेथील मुख्यमंत्र्यांनीच सांगितले आहे. आणि चौथी धक्कादायक बाब म्हणजे या घडामोडीत पोलीस प्रशासन आणि सरकार पूर्णपणे एकतर्फी वागत आहे. ही घटना पोलिसांसमोर घडली, पण त्यांनी ना ती थांबवली ना तिची माहिती नोंदवली. गुन्हा नोंदवल्यानंतर कोणतीही कारवाई झाली नाही. मुख्यमंत्री उघडपणे बहुसंख्य समाजाच्या प्रतिनिधींची भाषा बोलत आहेत. असा स्पष्ट पुरावा असलेली, वरचे चारही मुद्दे असलेली दुसरी घटना आहे का?’’

‘‘पश्चिम बंगालच्या बाबतीत बोलायचे तर तिथे अशा दोन घटना घडल्याचे आरोप पुढे आले आहेत. एका घटनेत एका महिलेला विवस्त्र करण्यात आले होते. असे करणे निषेधार्हच आहे, परंतु या घटनेचा कोणत्याही सामाजिक गटाशी किंवा राजकारणाशी संबंध असल्याचे दिसत नाही. असे असले तरी, पोलिसांनी या घटनेचा गुन्हा नोंदवून कारवाई केली आहे. भाजपच्या उमेदवारासोबत अशा गैरवर्तनाच्या दुसऱ्या आरोपाबाबत अद्याप कोणताही पुरावा मिळालेला नाही. राज्यपालांच्या कार्यालयातून आलेल्या या तक्रारींमध्ये संबंधित घटनेचा उल्लेख नाही, पीडितेनेदेखील त्याबाबत कोणतेही निवेदन दिलेले नाही, असे बंगालचे पोलीस महासंचालक म्हणतात. याचा अर्थ या प्रकरणात पश्चिम बंगाल सरकार निर्दोष आहे, असा नाही, पण ही घटना मणिपूरसारखीच आहे असे म्हणता येणार नाही. राजस्थानमध्ये दलित मुलीवर झालेल्या बलात्कारात जातीय हिंसाचाराचा मुद्दा आहे, त्यामुळे ही चिंतेची बाब आहे. मात्र येथे पोलीस प्रशासनाकडून गुन्हेगाराला आश्रय देण्याचा प्रश्नही निर्माण झाला नाही. खरे तर त्यातील एक आरोपी भाजप परिवारातील विद्यार्थी संघटनेशी संबंधित असल्याची माहिती पुढे आली आहे. छत्तीसगडबद्दल सांगायचे तर भाजपचे प्रवक्तेही अशी एखादी घटना तिथे अलीकडे घडली आहे, असे सांगू शकत नाहीत. या राज्यांची मणिपूरशी तुलना करणे फक्त हास्यास्पदच नाही तर क्रूरदेखील आहे.’’

जाता जाता मी त्याला आणखी एक मुद्दा सांगितला, ‘‘नैतिकतेच्या बाबतीत मी दुटप्पीपणाने वागत नाही. खरे तर इतर घटनांआड मणिपूरचा घृणास्पद गुन्हा लपवून ठेवणारेच दुटप्पीपणे वागत आहेत. मणिपूरचा उल्लेख करताना पंतप्रधान त्या घटनेची तुलना राजस्थान आणि छत्तीसगडशी करतात तेव्हा तेच दुटप्पी वागत असतात. मणिपूरममध्ये आपला पक्ष, त्याच्या सरकारची बेपर्वाई आणि हिंसाचारातील सहभाग झाकण्यासाठी अशा युक्तिवादांचा वापर करताना ते हे विसरतात की मणिपूरचे समर्थन करताना जे मुद्दे वापरले जात आहेत, ते उद्या आणखी कोणते गुन्हे झाकण्यासाठी वापरले जाणार आहेत, काय माहीत. नेतेच देशाला बुद्धिभ्रष्ट करायला सुरुवात करतात, तेव्हा पुढे जाऊन या सगळय़ाचा शेवट कुठे आणि कसा होणार, हे त्यांनाच माहीत नसते.’’

Story img Loader