‘धर्मकोशा’चे संपादन करताना धर्मवाङ्मयाची कालसंगत मांडणी करत धर्मेतिहासाचे बदलते स्वरूप अधोरेखित करण्याचा तर्कतीर्थांचा प्रयत्न होता. यातून त्यांना हिंदुधर्म परिवर्तनशील असल्याचे सिद्ध करावयाचे होते. देशकाल परिस्थितीनुसार युगपरत्वे धर्माचे स्वरूप बदलते. धर्माची मूलभूत तत्त्वे बदलत नसली, तरी आचार, नियम, संस्कार इत्यादींमध्ये परिस्थितीसापेक्ष बदल होत असतात. धर्माविषयीचा हा ऐतिहासिक दृष्टिकोन स्वीकारला की, धर्मातील परिवर्तनाचा मागोवा तुलनात्मक अभ्यासाने घेता येतो. आचारभ्रष्टांचे शुद्धीकरण ऐतिहासिक काळात होत आले आहे, हेही यातून स्पष्ट होत राहते. ब्राह्मण व शूद्र हे दोनच वर्ण अस्तित्वात आहेत, असे म्हणणे बरोबर नसून, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र चारही वर्ण गुणकर्म विभागाने अस्तित्वात आहेत, हे स्वीकारणे वस्तुस्थितीनिदर्शक ठरते, अशी भूमिका घेऊन धर्मकोश रचला गेल्याने त्याचे असाधारण महत्त्व आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा