क्रिकेट विश्वचषक १९९२मध्ये दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड या उपान्त्य फेरीच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेस विजयासाठी १२ चेंडूंमध्ये २२ धावा हे समीकरण पावसाच्या व्यत्ययानंतर १ चेंडूमध्ये २२ धावा असे एकाच वेळी हास्यास्पद आणि क्रूर बनले. अर्थातच दक्षिण आफ्रिकेने तो सामना गमावला. पण या निमित्ताने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये पावसाच्या व्यत्ययानंतर सुधारित लक्ष्य निर्धारणासाठी प्रमाणित गणिती पद्धतीच्या अभावाचा मुद्दा अधोरेखित झाला. ती स्पर्धा झाली ऑस्ट्रेलियात. त्याच वर्षी इंग्लंडमधील शेफील्ड येथे रॉयल स्टॅटिस्टिकल सोसायटीची एक परिषद झाली. तीत ‘खराब हवामानात समन्यायी निकाल’ या बिरुदाखाली एक लघु टिपण सादर झाले. त्या टिपणाचे लेखक होते फ्रँक डकवर्थ.

हेही वाचा >>> चांदनी चौकातून : गणंगभणंग गळाले!

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dls method co founder frank duckworth profile zws
First published on: 01-07-2024 at 01:03 IST