महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा, सिंचन घोटाळा, महाराष्ट्र सदन घोटाळा अशा साऱ्याच गाजलेल्या घोटाळय़ांमध्ये काहीही तथ्य नाही असे म्हणत सरकारी यंत्रणाच न्यायालयात एकापाठोपाठ अर्ज दाखल करीत असल्याने महाराष्ट्रात कायद्याचे राज्य ही संकल्पना पार पायदळी तुडवली जात आहे. याचे नवीन उदाहरण म्हणजे २५ हजार कोटींच्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार यांचा काहीही संबंध नाही, सबब हे प्रकरण बंद करण्यात यावे म्हणून आर्थिक गुन्हे शाखेने जानेवारी महिन्यातच न्यायालयात केलेला अर्ज. तेव्हा त्याची फारशी वाच्यता झाली नव्हती. मात्र अलीकडेच हा अहवाल खुला झाला. त्याचे कारणही स्पष्ट आहे. सुनेत्रा पवार या बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांच्या विरोधात निवडणूक लढवीत आहेत. नणंद – भावजयीमध्ये म्हणजे घरातच ही लढत असली तरी सुनेत्रा पवार यांच्यावर बँक घोटाळयातील आरोपी हा शिक्का असणे केव्हाही त्रासदायकच होते. यामुळेच पोलिसांचा अहवाल निवडणुकीच्या तोंडावर माध्यमांमध्ये आला हे उघडच दिसते. सुनेत्रा पवार यांना क्लीन चिट मिळाल्याने साखर कारखान्यांशी संबंधित प्रकरणांमध्ये राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांचे नातू आमदार रोहित पवार आणि जयंत पाटील यांचे भाचे आमदार प्राजक्त तनपुरे हेसुद्धा सहीसलामत या प्रकरणातून सुटले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा