महाराष्ट्र, झारखंड विधानसभा आणि काही राज्यांमध्ये पोटनिवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच गेल्या पाऊण महिन्यात निवडणूक आयोगाने जवळपास ६०० कोटींची रोख रक्कम, अमली पदार्थ, मद्या, साड्या व अन्य मौल्यवान वस्तू जप्त केल्या आहेत. महाराष्ट्रात जवळपास ३०० कोटींच्या आसपास रोख, दारू, अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. पालघर जिल्ह्यातील वाड्याजवळ एका वाहनातून तीन कोटींपेक्षा अधिक रोख रक्कम जप्त करण्यात आली. ही रोख एटीएममध्ये भरण्यासाठी नेण्यात येत होती, असा दावा वाहनमालकाने केला असला तरी त्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे त्याजवळ नव्हती. निवडणूक आयोगाने दोन दिवसांपूर्वी दिलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, राज्यात ७३ कोटींची रोख, ३८ कोटींची दारू, ३८ कोटींचे अमली पदार्थ, ९१ कोटींच्या मौल्यवान वस्तू, मोफत वाटण्यासाठी आणण्यात आलेल्या ४३ कोटींच्या वस्तू जप्त केल्या आहेत. यानंतर वाड्यात तीन कोटी तर दक्षिण मुंबईत दोन कोटींपेक्षा अधिक रोख रक्कम उघडकीला आली. एकट्या नाशिक परिक्षेत्रात ५० कोटींचा मुद्देमाल आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळात निवडणूक आयोगाने देशात सुमारे नऊ हजार कोटींची रोख, दारू, अमली पदार्थ, मौल्यवान वस्तू किंवा अन्य मुद्देमाल जप्त केला होता. तेव्हा महाराष्ट्रात सुमारे ७०० कोटींची रोकड व मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला होता. त्यात ७५ कोटींपेक्षा अधिक रोख रक्कम होती. विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा होताच पुण्याजवळ खेड शिवापूर टोल नाक्याजवळ एका इनोव्हा गाडीतून ५ कोटींची रोख जप्त करण्यात आली. हे वाहन सत्ताधारी पक्षाशी संबंधिताचे होते. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप झाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा