भारत-इस्रायल मैत्रीसंबंधांतून साकारलेल्या कामगार भरती योजनेअंतर्गत इस्रायलला गेलेल्या भारतीय कामगारांकडे किमान कौशल्यही नसल्याचे आढळून आल्याचा वृत्तलेख नुकताच ‘दि इंडियन एक्स्प्रेस’ने प्रसिद्ध केला. गाझातील कारवाईमुळे इस्रायलमधील पॅलेस्टिनी कामगारांच्या संख्येवर विपरीत परिणाम झाला आहे. इस्रायली बांधकाम प्रकल्पांना आज मोठ्या प्रमाणावर कौशल्यसिद्ध कामगारांची गरज भासत आहे. पॅलेस्टिनी कामगारांनी पाठ फिरवल्यामुळे किंवा त्यांना सरसकट नाकारले जात असल्यामुळे या क्षेत्रात तुटवडा मोठ्या प्रमाणावर जाणवू लागला आहे. बांधकाम क्षेत्राबरोबरच आरोग्य क्षेत्रात सेवक म्हणून भारतीयांना मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. सुमारे १० हजार बांधकाम कामगार आणि पाच हजार आरोग्यसेवक इस्रायलमध्ये पाठवण्याविषयी तेथील सरकारने भारताला पुन्हा एकदा विनंती केली आहे. परंतु आधीच्या भरतीतून आलेले अनुभव धक्कादायक आहेत. त्या वेळी उत्तर प्रदेश, हरयाणा आणि तेलंगणातून कौशल्य चाचणी घेऊन कामगार आणि सेवक पाठवण्यात आले. या बांधकाम कामगारांपैकी काहींच्या कहाण्या ‘दि इंडियन एक्स्प्रेस’ने प्रकाशात आणल्या. त्या भारतातील कामगारांच्या कौशल्य प्रशिक्षण आणि कौशल्य चाचणी प्रक्रियेविषयी शंका उपस्थित करणाऱ्या ठरतात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा