फ्रान्सचे  धडे – ४

गिरीश कुबेर

Economist Politics Delhi Elections Prime Minister
‘रेवडी’चे राजकीय वजन संपले ?
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
what 12 lakh exemption means and how tax is calculated
१२ लाख करमुक्त उत्पन्नाची सवलत नेमकी कुणासाठी?
Ananth Nageswaran
अग्रलेख: कसचे काय नि कसचे काय!
IT Company, IT , IT Company Jobs,
‘आयटी’तील बेरोजगारांचे लोंढे अन् त्यामागील अमानवीय चेहरा…
Loksatta editorial challenges before fm nirmala sitharaman in union budget 2025
अग्रलेख: सीतारामन ‘सिंग’ होतील?
ulta chashma
उलटा चष्मा: कोण म्हणतं गरीब जिल्हा?
Many people including businessman were cheated of Rs 2 crore by promising double profits
दुप्पट नफ्याचे आमिष दाखवत व्यापाऱ्यासह अनेकांना दोन कोटीचा गंडा

मोनॅकोची लोकसंख्या ४० हजारही नसेल. पण त्यातले निम्म्यापेक्षा अधिक लोक अब्जाधीश. या ‘देशात’ गरीबच नाहीत आणि बेरोजगारही तसे लखपतीच!

फ्रेंच रिव्हिएरातलं मोनॅको हे एक अजब प्रकरण आहे. हे एक मध्यम आकाराचं शहर. आहे ते फ्रान्समधे. पण फ्रान्सपासून स्वतंत्र. प्रिन्सिपॅलिटी अशी त्याची ओळख. म्हणजे एक राजपालिका. तीदेखील एका घराण्याच्या मालकीची. या घराण्यातला कर्ता या राजपालिकेचा अध्यक्ष. हिचकॉकच्या ‘डायल एम फॉर मर्डर’ वगैरे चित्रपटातली ग्रेस केली ही लावण्यवती आठवते? ती पुढे या मोनॅको राजघराण्याची सून झाली. या शहर-देशाला पंतप्रधानही आहे आणि भौगोलिकदृष्टय़ा फ्रान्सचाच भाग असलेल्या, एका शहरापुरत्या ‘देशासाठी’ स्वतंत्र राजदूतही आहे फ्रान्सचा. फ्रान्समधे असून फ्रान्समधे नाही आणि युरोपात असूनही मोनॅको ‘युरोप’चं नाही. एखाद्या जुन्या वाडय़ात बाकीचे सारे बिऱ्हाडकरू एकाच दर्जाचे आणि कोपऱ्यातल्या खोलीत सर्वापासून फटकून एकटीच राहणारी म्हातारी मात्र सतत दागदागिन्यांनी मढलेली असावी; तसं हे मोनॅको!

जगातल्या श्रीमंतीची आणि श्रीमंतांची परिसीमा ‘पाहायची’ (कारण ती अनुभवणं शक्यच नाही. ते परवडणारं नाही) असेल तर मोनॅकोसारखी दुसरी जागा नाही. लोकसंख्या ४० हजारही असेल-नसेल. पण त्यातले निम्म्यापेक्षा अधिक हे अब्जाधीश. या ‘देशात’ गरीबच नाहीत आणि बेरोजगारही तसे लखपतीच! दरडोई उत्पन्न सव्वा लाख डॉलर्सच्या आसपास. मोनॅकोत शिरताना चढ सुरू होतो. त्याआधी रस्ता लफ्फेबाज वळण घेतो आणि समोरचं दृश्य आपल्याला थक्क करतं. फिकट आकाशी रंगाची शाईच जणू असा समुद्र आणि त्यात अगदी रस्त्याच्या कडेला एकमेकांना खेटून जगभरातल्या श्रीमंतांच्या खासगी बोटी डोलतायत. इथे रशियन धनदांडग्यांचा पैसा खूप. येथील श्रीमंती बोटींमध्ये त्यांच्याही खूप बोटी असतात असं ऐकून होतो. म्हणून यातली कोणती बोट पुतिन किंवा त्यांच्या मित्राची असेल असं शोधण्याचा चाळा आपोआप लागला.  प्रत्येक बोट म्हणजे एक महालच. त्या महालाची मागची बाजू रस्त्याला टेकलेली. ती जिथे रस्त्याला लागते तिथला तो चौकोनही त्या बोटवाल्यांच्या मालकीचा असावा. कारण तिथं छान टेबलं-खुर्च्या मांडलेल्या आणि ती बोटवाली मंडळी तिथंही तरंगत बसलेली. कोणी पलीकडे वॉटर सर्फिग करतंय तर अन्य कोणी वॉटर बोटिंग. दृश्य अगदी जेम्स बाँडच्या चित्रपटातलं असावं तसं. आणि ती माणसंही तशीच. त्यातल्या त्यात दारिद्रय़ रेषेखालचे आम्हीच चौघं. भाडय़ानं घेतलेली फोक्सवॅगन शहराच्या पार्किंग लॉटमधे उभी करताना तर अंगावर काही नसल्यासारखंच वाटत होतं. कारण आसपास बाकीच्या गाडय़ा होत्या त्या बेंटले, बुगाती, लँबोर्गिर्नी, रोल्स रॉईस, रेंजरोव्हर, अ‍ॅस्टन मार्टिन वगैरे. त्यातल्या त्यात जे मध्यमवर्गीय होते त्या बिचाऱ्यांना मर्सिडीजवर भागवावं लागत होतं.

आम्ही मार्सेलहून पोचलो तेव्हा नुकतीच मध्यान्ह सरत होती. युरोपमधे असून मेडिटरेनियन हवामानाचं भाग्य लाभलेल्या मोनॅकोतली मंद हवा तिथं वावरणाऱ्यांच्या उंची पफ्र्युम्सचा दरवळ आसमंतात मिसळत होती. सारं शहरच्या शहर एखादा फॅशन शो असावं तसं नटलेलं. एक बाई सरळ चालताना दिसली असेल तर शपथ! सगळय़ाच जणू कॅटवॉक करतायत. दुकानं इतकी आकर्षक की िवडो शॉिपगचेही पैसे लावतील की काय अशी भीती. युक्रेन युद्ध, दरिद्री आफ्रिका खंड वगैरे काही विषयच नाहीत. मोनॅकोची वळणं कमालीची कमनीय. त्या वळणांवरच्या इमारती त्याहून प्रेक्षणीय. जगातली सर्वात महागडी रिअल इस्टेट ती. सगळी घरं भरलेली. सेवक, नोकर-चाकरही बो-लावून िहडणारे. वातावरणात एक लगबग. कारण दुसऱ्याच दिवशी ‘फॉम्र्युला वन’ होती.

मोटारींचं, मोटार उद्योगाचं एक विलोभनीय जग आहे. फारच कमी भारतीयांना त्याची ‘चव’ असते. आपल्याकडे जेवण म्हणजे जसं उदरभरण तसं मोटार म्हणजे केवळ वाहतुकीची सोय. यापेक्षा काही जास्त भावनाच नाहीत. या विषयावर वाचायला, पाहायला आवडत असल्यानं या वेळच्या फ्रान्स दौरा-यादीत मोनॅको होतं. आणि मुहूर्त नेमका ‘फॉम्र्युला वन’चा. वास्तविक ‘फॉम्र्युला वन’ जगात अनेक ठिकाणी होते. पण मोनॅकोसारखी अन्यत्र कुठेही नाही. मोनॅकोतलं ‘फॉम्र्युला वन’ एकमेव असं आहे की ते नेहमीच्या गावातनं होतं आणि त्या मोटारींसाठी कोणतेही वेगळे ट्रॅक तयार केलेले नाहीत. पैलवानाच्या छातीएवढे रुंद टायर असणाऱ्या त्या चपटय़ा मोटारी गावातल्या अरुंद रस्त्यांवरनंच भीतीदायक आवाज करत एकमेकांशी स्पर्धा करत असतात. ‘फॉम्र्युला वन’ ज्यांनी कोणी टीव्हीवर पाहिली असेल त्यांना यातलं वेगळेपण लक्षात येईल. सर्व ‘फॉम्र्युला वन’मधे सगळय़ात जास्त मानाची मोनॅको ‘फॉम्र्युला वन’.

पण या शहराची श्रीमंती इतकीच नाही. तिथला चढ चढून आपण वर आलो की माँटे कार्लो.  जगभरातल्या फॅशन विश्वात, बडय़ाबडय़ा ब्रँड्सच्या जगात ज्याचा उच्चार करताना कानाच्या पाळीला हात लावला जातो ती जागा म्हणजे माँटे कार्लो. हाही मोनॅकोचाच भाग. मोनॅको आणि माँटे कार्लो म्हणजे ऊर्वशी आणि रंभा. किंवा रंभा आणि ऊर्वशी. मुळात मोनॅकोत आपण असणं आणि त्यात फॉम्र्युला वन! या योगाचं वर्णन करणारा योग्य वाक्प्रचार मराठीच काय पण भारतीय भाषांतही नसावा! असो. त्यामुळे मोनॅको दर्शनानंतर ‘फॉम्र्युला वन’ गाडय़ांच्या पिटात (इंग्रजीत त्याला पीट असंच म्हणतात) जाणं ओघानंच आलं. यात आश्चर्याचा धक्का असा की या पिटांत सहज येऊ दिलं जात होतं. रेड बुल, मर्सिडिज, अ‍ॅस्टन मार्टिन, फेरारी, अल्पाईन, अल्फा रोमिओ अशा गाडय़ांच्या ‘टपऱ्या’. एकापाठोपाठ एक अशा. संबंधित कर्मचाऱ्यांची स्पर्धेच्या तयारीची लगबग सुरू होती. आम्ही आपलं लुईस हॅमिल्टन वगैरे कोणी दिसतंय का ते पाहात होतो. त्या क्षणी मायकेल शुमाकरची आठवण निघणं अपरिहार्य होतं. त्या मोटार कंपन्यांचे कर्मचारी उत्साही होते. अगदी सहज गप्पा मारत होते, फोटो काढून देत होते. तयारी कशी काय करतात वगैरे सांगत होते.

एकापाठोपाठ एक अवाढव्य, पडदा-नशीन ट्रक्समधून त्या मोटार-सुंदऱ्या सज्ज होऊन आलेल्या. एकेका मोटारीला दीडेक हजारांचे हात लागलेले असतात. तिला स्पर्धा-योग्य करण्यासाठी. वेगळाच अनुभव. मोनॅकोच्या पूर्णपणे विरुद्ध नीस शहर. मोनॅको म्हणजे नुसता झगझगाट. नीस अगदी घरंदाज आणि कलासक्त. मोनॅकोवर लक्ष्मीची बारमाही मुसळधार बरसात तर नीसचा डौल श्रीमंती मिरवणाऱ्या शौकिनास दाराबाहेर उभं करणाऱ्या खानदानी कलावतीचा. संपूर्ण नीस म्हणजे एक भव्य रंगमंचच जणू. अत्यंत कलात्मक नेपथ्याचा. शहराच्या मध्यवर्ती भागात एक अवाढव्य वर्तुळ. त्यात बागा, कारंजी, लहान-मोठय़ा मुला-मुलींच्या खेळण्याच्या जागा आणि या वर्तुळाच्या परिघावरनं वाहते रस्ते. असे आठेक रस्ते या वर्तुळाला येऊन मिळतात. त्या रस्त्यांत मध्यभागी ट्राम आणि कडेला मोटारींना येण्याजाण्याचा मोकळा भाग सोडून उरलेल्या मोकळय़ा जागेत टिपिकल युरोपियन काफे. इतकं आनंददायी नेपथ्य की वाहते रस्ते, तोतऱ्या ट्राम, पलीकडच्या वर्तुळातल्यांचं उत्साही जगङ्घनुसतं बघत बसायचं. या संपूर्ण नीसमधे कंटाळय़ाला प्रवेशच नसावा. 

या वर्तुळातनं समोर दिसणाऱ्या कोणत्याही रस्त्यावरनं गेलं की मरिन ड्राइव्हसारखा किनारी रस्ता. त्या रस्त्यावर मनोरंजनाची साधनं, बसायला खुर्च्या आणि काही स्थानिक कलावंतांची मांडणशिल्पं. इन्स्टॉलेशन्स. ही अशी कलात्मकता हे नीसचं वैशिष्टय़. नीसमधल्या अनेक संग्रहालयांत स्थानिकांच्या कलाकृती पाहायला झुंबड असते पर्यटकांची. आपल्या गावच्या कलाकारांचं इतकं कौतुक करणाऱ्या नीसचं मग आपल्याला खूप कौतुक वाटू लागतं. नीत्शे, चेकॉव्हसारखे लेखक या गावानं जोजवलेत. ‘फँटम ऑफ द ऑपेरा’ लिहिणारा गेस्टन लेरॉक्स इथलाच आणि लोकप्रिय ‘अ‍ॅस्टेरिक्स’ कॉमिककर्ता रेन गॉस्किनी हादेखील इथलाच. मुख्य म्हणजे हे दोघेही मूळचे पत्रकार. या सांस्कृतिक श्रीमंतीसाठी नीस हे अख्खंच्या अख्खं शहर ‘हेरिटेज’ दर्जाचं आहे. असं भाग्य फारच कमी शहरांच्या वाटय़ाला आलं असेल.

नीसच्या समुद्रकिनाऱ्याच्या एका बाजूला डोंगर आहे. वरून दूपर्यंतचा किनारा, रांगेतली छान रंगसंगतीची घरं, तळहातावरच्या रेषेसारखा मधून जाणारा वळणदार रस्ता आणि या सगळय़ाला सुखदतेच्या जाणिवेत लपेटणारी हवा. ते अनुभवताना जाणवतं.. कितीही कमावलं तरी सगळेच ‘श्रीमंत’ होऊ शकत नाहीत. काही श्रीमंत आतूनच असतात.

girish.kuber@expressindia.com @girishkuber

Story img Loader