‘शॅमेलिऑन’ – (सरड्यासारखा) रंग बदलणारा- हे त्याच्या आदरांजली-लेखात ‘न्यू यॉर्क टाइम्स’ने त्याचे केलेले वर्णन, किंवा ‘कधीही पठडीबाज भूमिका न करणारा’ ही अन्य अनेक प्रकाशनांनी त्याला दिलेली दाद कमीच पडावी, इतके डोनाल्ड सदरलॅण्ड यांचे भूमिका-वैविध्य होते. ‘ऑस्कर’ पुरस्कारासाठी कधी नामांकनदेखील मिळाले नसूनही २०१७ मध्ये ‘विशेष (मानद) ऑस्कर’चा मानकरी ठरलेला हा अभिनेता सर्वार्थाने समृद्ध होता… फ्रेडरिको फेलिनी, बर्नार्डो बर्तोलुची यांसारख्या दिग्दर्शकांकडे काम करण्याची मिळालेली संधी आणि १९६७ सालच्या ‘द डर्टी डझन’ पासून ते २०१३ ते १५ पर्यंत गाजलेल्या ‘द हंगर गेम्स’ पर्यंत आणि नंतरही अगदी आगामी ‘हार्ट लॅण्ड’पर्यंत अशा २०० भूमिका त्यांना मिळाल्या. त्यापैकी काही गाजल्या, पण प्रत्येक भूमिकेत ते शोभले.

हेही वाचा >>> समोरच्या बाकावरुन : आता सगळी मदार विरोधकांवर!

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
eknath shinde
Eknath Shinde: एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते? ‘दाल…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

सहा फूट चार इंचाची विचित्र उंची, लांब कान, उभट थोराड चेहरा, संजय दत्तची आठवण व्हावी अशा आकाराचे पण निळेघारे डोळे… अशी शरीरवैशिष्ट्ये असूनही शोभलेच! कॅनडातल्या इंग्रजीभाषक कुटुंबात १९३५ साली त्यांचा जन्म झाला. अभियांत्रिकीच्या पदवीखेरीज अभिनयाचीही पदवी त्यांनी मिळवली, पण त्याआधीच स्थानिक नभोवाणी केंद्रासाठी आवाजाचा वापर ते करू लागले होते. नाट्यशिक्षण पूर्ण झाल्यावर काही नाटकांतील भूमिका जमा होतातच, तशाही झाल्या. पण १९६२ ते ६५ पर्यंत, म्हणजे वयाच्या तिशीपर्यंत चित्रवाणी मालिका किंवा चित्रवाणीपटांमध्ये कामे मिळूनही, चित्रपटांनी त्यांना हुलकावण्याच दिल्या. भयपटांमधल्या भूमिका स्वीकाराव्या लागल्या. ‘याला कोण काम देणार’ छापाची नालस्ती उंचीमुळेच पचवावी लागूनही पुढे एका छापाचे यश डोनाल्ड सदरलँड यांनी टाळले. ‘डर्टी डझन’मधील त्यांची सैनिकी भूमिका काहीशी उग्र, तर ‘मॅश’ (१९७०) हा युद्धपट असूनही विनोदी, त्यातल्या लष्करी सर्जनची भूमिका निराळी. त्याआधी बर्तोलुची यांच्या ‘१९००’ मधल्या ॲटिला मेलान्चिनी या चिडखोर फॅसिस्ट अधिकाऱ्याची भूमिका प्रेक्षकांना राग येण्याऐवजी कीव वाटावी अशी. ‘नॅशनल लॅम्पून्स ॲनिमल हाऊस’ (१९७८) मध्ये अमली पदार्थांच्या आहारी गेलेला प्राध्यापक, ‘ऑर्डिनरी पीपल’ (१९८०) मधला पत्नी आणि मोठ्या भावाच्या मृत्यूला आपणच जबाबदार असल्याचे समजणारा मुलगा यांच्यात गुरफटलेला बाप, अशा भूमिका भावनांच्या आविष्काराला वाव देणाऱ्या; तर अलीकडच्या ‘हंगर गेम्स’ मधली प्रेसिडेण्ट स्नो ही सत्ताधीशाची भूमिका, ‘तो असं का वागतोय’ हा प्रेक्षकांचा प्रश्न विझू न देणारी! मनुष्यस्वभावाचे- विशेषत: पुरुषी भावनांचे- सारे कंगोरे दाखवणारा २०० भूमिकांचा ‘कॅलिडोस्कोप’ हॉलिवुडसाठी मागे सोडून या मूळच्या कॅनेडियन अभिनेत्याने २० जून रोजी अखेरचा श्वास घेतला.

Story img Loader