अख्ख्या १९७५ या सालाचे उत्खनन केल्यास काय सापडते? त्या वर्षाच्या २५ जूनपासून आणीबाणी लागल्याचा इतिहास जसा गोंदला गेला, तसा इतर अनेक सांस्कृतिक आणि सामाजिक संदर्भांचा गुंतासमुच्चय हाती लागतो. या सालाच्या आगेमागे हिंदी आणि मराठी प्रकाशनविश्वात लगदी साहित्याने व्यवसायाचा परमोच्चबिंदू गाठला होता. त्याचे तात्कालिक कारण म्हणजे, जेम्स हेडली चेस आणि इयन फ्लेमिंग यांच्या कादंबऱ्यांच्या मूळ आणि अनुवादित कादंबऱ्यांचा सुळसुळाट वाढला होता. हिंदीमध्ये ओमप्रकाश शर्मा, वेदप्रकाश कंबोज, परशुराम शर्मा, सुरेंद्र मोहन पाठक यांच्या वेगवान कथानकांची पॉकेट बुक्स देशभरातील रेल्वे स्थानकांवरल्या पुस्तक-ठेल्यांतून विक्रीचे विक्रम रचत होती. मराठीत गुरुनाथ नाईक (गरुड कथा), शरश्चंद्र वाळिंबे (इंद्रजीत), दिवाकर नेमाडे (आकिंचन), एस.एम. काशिकर (नाइटकिंग) असे नायक वाचकप्रिय होत होते… या काळातील इंग्रजी, हिंदी, मराठी पल्प फिक्शनमधील साम्य हे त्यांच्या ‘अँग्री यंग मॅन’ नायकांत होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा