गिरीश कुबेर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कतार येथे होणाऱ्या फुटबॉल विश्वचषकाच्या सामन्यांच्या प्रेक्षकांसाठी आयोजकांनी तयार केलेली नियमावली बघितली तर सगळी जिगर पणाला लावून खेळल्या जाणाऱ्या फुटबॉलच्या स्पर्धा होणार आहेत, की एखाद्या पंतोजींची शाळा भरणार आहे, असाच प्रश्न कुणालाही पडेल.

एखाद-दुसरा माणूस असो वा अनेक माणसांचा देश. त्याची भूक दुहेरी असते. म्हणजे आधी त्याला श्रीमंत व्हायचं असतं. ‘धट्टीकट्टी गरिबी, लुळी पांगळी श्रीमंती’ वगैरे कितीही वचनं फेकली तरी प्रत्येकाला श्रीमंत व्हायचं असतंच. आणि श्रीमंत म्हणजे तरी काय? आपणही आपल्या चार-पाच जणांच्या कुटुंबासाठी चांगला २८ मजली रंगमहाल उभारावा अशी काही अपेक्षा नसते प्रत्येकाची. तर आहोत त्यापेक्षा आपली परिस्थिती सुधारायला हवी इतकाच अनेकांच्या श्रीमंतीचा अर्थ. त्यात काही गैरही नाही. कारण सतत आपलं ‘ठेविले अनंते तैसेचि रहावे’ हेच प्रत्येकाचं जीवनतत्त्व बनलं तर कोणाची कसलीच भौतिक प्रगती कधीच होणार नाही. म्हणून श्रीमंतीची आस असणं काही चुकीचं आहे असं नाही. हा झाला पहिला भाग.

 दुसरा भाग अपेक्षित श्रीमंती साध्य झाली की सुरू होतो. नुसती श्रीमंती मग पुरत नाही. त्या श्रीमंतीनं बरंच काही विकत घेता येत असतं. एक गोष्ट तेवढी मिळतेच असं नाही. ती म्हणजे प्रतिष्ठा. मान-मरातब मिळेल, पुरस्कारांची, बक्षिसांची व्यवस्था करता येईल, हवा तितका स्वत:चा उदोउदो करून घेता येईल.. पण तरीही ही प्रतिष्ठा हुलकावणीच देत राहील. पैशानं सगळं काही मिळतं. पण अलीकडचा शब्द वापरायचा तर, ऐश्वर्य आलं म्हणून ‘क्लास’ येतोच असं नाही. अन्यथा मनगटात, गळय़ात, दोरखंडासारख्या भरदार ‘चैनी’ वगैरे घालणारे तसे श्रीमंत आपल्या आसपास भरपूर असतातच की! पण त्यांना प्रतिष्ठा नसते. म्हणजे श्रीमंत झाला म्हणून ‘क्लासी’ होता येत नाही. खरं तर श्रीमंती आणि हा क्लास यांचा काही संबंधच नसतो. जेआरडी म्हणाले होते एकदा.. ‘सायकल्स (गरिबी-श्रीमंती येणं/जाणं) आर टेंपररी, क्लास इज पर्मनंट’. 

हे सगळं आता सांगायचं कारण म्हणजे आणखी पंधरवडाभरात पश्चिम आखातातल्या वैराण वाळवंटात कतारला सुरू होणारा फुटबॉल वल्र्डकप. फुटबॉल हा खेळ म्हणजे उत्साह आणि ऊर्जा यांचा अनिर्बंध धबधबा. अवघ्या ९० मिनिटांत हे फुटबॉलपटू जणू पृथ्वीला गवसणी घालण्याइतकं अंतर कापतात. या ऊर्जेचा परात्पर परिणाम अर्थातच प्रेक्षकांवर होत असतो. त्यामुळे एरवी सभ्य वाटणारा गृहस्थ एखाद्या क्लब वा देशाच्या वतीने ‘प्रीमियर’ वा ‘चॅम्पियन्स’ वा ‘बुंडेस लीग’ वा ‘ला लिगा’ किंवा अन्य कोणा स्पर्धेत किंवा ‘फिफा’च्या वल्र्डकप स्पर्धेत साधा प्रेक्षक म्हणून उतरला तरी तो आमूलाग्र बदललेला असतो. एरवी दुर्मुखलेला, गंभीर असा एखादा सभ्य साहेब फुटबॉलच्या मैदानावर आला की त्याचं ‘माणसा’त रूपांतर होतं. तो गातो, ओरडतो, नाचतो, शिव्याशापात सहभागी होतो, चित्कारतो किंवा वेळप्रसंगी हताश होतो. फुटबॉल म्हणजे ‘शुभ्र काही जीवघेण्या’वस्त्रप्रावरणांत खेळलं आणि पाहिलं जाणारं विम्बल्डन नाही. ‘थँक यू’ म्हटलं की विम्बल्डनला सर्वाची हाताची घडी आणि तोंडावर बोट. फुटबॉलला याच्या बरोबर उलट. हाती बीअरचा ग्लास, अंगातल्या टीशर्टचं सुदर्शनचक्र, तोंडाचा उपयोग बीअरचा मग्गा तोंडाला लावण्यासाठी नाहीतर शिमगा करण्यासाठी. आणि सामन्याआधी शकीरा ‘वाका वाका’ करून गेली असेल तर बघायलाच नको..!

आणि आता या कतार फुटबॉल कपमध्ये ‘तसं’ बघण्यासारखं काही नाही. त्या देशाच्या सरकारनं भली मोठी नियमावलीच जारी केलीये प्रेक्षकांसाठी. ती पाहिली की आपण फुटबॉलचा उत्फुल्ल सामना पाहायला जाणार आहोत की ‘भारतीय अर्थव्यवस्थेत लोहगुणजन्य खनिजांचे योगदान’ अशा विषयावरच्या कार्यशाळेला जाणार आहोत, असा प्रश्न पडेल. करोना चाचणीचं ताजं प्रमाणपत्र कतारमध्ये पाऊल टाकण्यापूर्वी हवं.. हा यातला सगळय़ात सोपा आणि कोणीही अजिबात आक्षेप घेऊ नये, असा नियम. बाकी सगळे नियम म्हणजे..

उदाहरणार्थ ‘कोणत्याही महिलेकडे जास्त वेळ टक लावून पाहू नका’, हे असं सांगणं भयानक आहे. सर्वार्थानंच. ‘सार्वजनिक ठिकाणी जाताना आपले शरीर पूर्ण झाकलेले असेल’ याची काळजी घेण्याचा सल्ला हा असाच. यंदा खरं तर कधी नव्हे ते उष्णकटिबंधीय प्रदेशात फुटबॉल वल्र्डकप भरतोय. एरवी आहेच आपला थिजलेला थंडगार युरोप, अमेरिका नाहीतर रशिया. अशा वेळी कतारसारख्या सौरऊर्जाभारित प्रदेशातली ऊर्जा देहाचं सूर्यफूल करून सूर्यस्नानात शोषून घ्यावी असं वाटलं कोणास तर त्या देशाच्या सरकारचा हा नियम! पुन्हा अंगप्रत्यंगाचं दर्शन घडवणाऱ्या वस्त्रप्रावरणांना बंदी. म्हणजे, मोठय़ा हॉटेलांत दिवे लावून अंधार का करतात, असा प्रश्न पुलंनी विचारला होता त्या धर्तीवर.. कपडे चढवून उघडं करणाऱ्या कपडय़ांना मनाई. त्या वस्त्रपावरणकर्त्यांचा किती हा अवमान. सर्वानी पायघोळ झगे घालून पोहावं असं या अरबांना वाटत असणार. त्यांनी करावं तसं. पण इतरांनाही हा नियम.. हा त्या इतरांभोवतालच्या इतरांवर अन्यायच करणारा!

झालंच तर सार्वजनिक मद्यपानास बंदी. ठरलेल्या ठिकाणी ठरलेल्या वेळेनंतरच मद्य मिळणार. हा नियम बीअरसारख्या देह शुचिर्भूत करणाऱ्या पेयालाही लागू. खरं तर बीअरला मद्य म्हणणं हा मद्य आणि बीअर दोघांचाही अपमान. हे अन्नु मलिक किंवा तत्समाला संगीतकार म्हणण्यासारखंच की. बीअर ही बीअर. पण तीदेखील ठरलेल्या वेळी. आणि परत सायंकाळी ६.३० नंतर. याच्या बरोबरीनं दुसरी अट तर जीवघेणीच. ती म्हणजे प्रेक्षागृहात कोणीही आपल्या ऊध्र्वदेहाचं प्रदर्शन होईल असं काही करायचं नाही. म्हणजे अंगातला टीशर्ट वगैरे काढायचा नाही. ही अट अर्थातच पुरुषांनाच असणार. पण कतारला भरदुपारी वाळू ताप ताप तापणार. स्टेडियम भले कितीही वातानुकूलित असलं तरी वातावरण अशा फुफाटय़ात तापलेलंच असणार. पण अंगचा कपडा काढायचा नाही आणि बीअरही प्यायची नाही.

आणखीही काही अटी अशाच आहेत. उदाहरणार्थ कतारमध्ये असेपर्यंत हस्तांदोलनासाठी कोणासमोर हात पुढे करायचा नाही. नुसतंच नमस्ते. आणि दुसरं म्हणजे आनंद होऊ दे अथवा दु:ख. कोणीही कोणाच्या अंगचटीला यायचं नाही. म्हणजे मिठय़ा मारायच्या नाहीत, उचलून घ्यायचं नाही की उडी मारून खांद्याला खांदा लावायचा नाही. आनंद साजरा करायचा, पण तोही अस्पर्श असा. हे म्हणजे पोहायला जाताना अंग कोरडंच ठेवण्याची अट घालण्यासारखं. आणि कहर आहे तो लैंगिक संबंध या पडदानशीन मुद्दय़ाबाबत! एकतर शादीशुदा असल्याखेरीज त्या देशात भिन्निलगीयांना एकत्र राहायला बंदी आहे. पण ही बंदी निदान वल्र्डकपच्या कालावधीत शिथिल होईल, असं अनेकांना वाटतंय. या मुद्दय़ावर इतका आशावाद का हे कळायला मार्ग नाही. पण अमेरिका आणि  काही युरोपीय देशांनी आपापल्या नागरिकांना याबाबत सावधगिरी बाळगण्याचा शहाणपणाचा सल्ला देऊन ठेवलाय. काही देशांनी तर आपल्या गर्भार नागरिक महिलांना बजावलंय.. कतारला जाणार असाल तर गर्भावस्था सिद्ध करणारं (आधीच्या तारखेचं) वैद्यकीय प्रमाणपत्र सतत बरोबरच ठेवा..! नाहीतर उगाच नसत्या शंकाकुशंका घेतल्या जायच्या!! समिलगींची तर कतारमध्ये चांगलीच मुस्कटदाबी होणार आहे. पण त्याला काही इलाज नाही. आलीया भोगासी..

तेव्हा मुद्दा हा की श्रीमंतांची श्रीमंती आणि त्यांचे सोहळे आयात केले म्हणून लगेच काही त्यांच्यात गणता होत नाही. तो ‘क्लास’ येण्यासाठी प्रौढपणा असावा लागतो, मोकळेपणाची, खऱ्या सहिष्णुतेची सवय करावी लागते. आता अबुधाबीलाही पॅरिसच्या लुव्रची शाखा आहेच की. कलावस्तू असतीलही. पण पॅरिसची कलासक्तता असेल का तिकडे? कलाकार असण्याची मिजास मिरवता येईल का पॅरिससारखी? तात्पर्य : उंची कपडय़ालत्त्यांनी उंची वाढत नाही. 

कानपूरच्या शबीना अदीब यांचा एक अप्रतिम शेर आहे..

जो खानदानी रईस है वो मिजाज रखते है नर्म अपना, तुम्हारा लहजा बता रहा है तुम्हारी दौलत नई नई है..

कतारी वल्र्डकप हा अशा नई नई दौलतवाल्यांचा असेल.

girish.kuber@expressindia.com

      @girishkuber