गॅबी रीड्स नावाचे बरेच पाहिले जाणारे यूट्यूब चॅनल. अर्धी अमेरिकी आणि अर्धी स्पॅनिश असलेली त्याची यूट्यूबर गॅबी वर्षाला दीड-दोनशे पुस्तके सहज वाचते आणि त्यांच्याबद्दल इतरांना सजग करणारी माहिती देते. ‘जेन झी’ पिढीत दुर्मीळ ठरत चाललेल्या अनेक गोष्टी हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सापडल्यासारख्या वाटतीलच; पण इथल्या अनेक देशांतील इंग्रजीत भाषांतरित झालेली वाचावीत अशी पुस्तकनावे कळतील. रहस्य-भूत-थरार यांच्या तिथल्या जगाविषयीची ही खिडकी आहे. याच यूट्यूबरचे इतर पुस्तकांविषयीचे व्हिडीओदेखील निराश करणार नाहीत.
https:// tinyurl.com/6bpfn69u
एक संपूर्ण भूतकथा…
मारियाना एन्रीक्वेझ हे दक्षिण अमेरिकी साहित्यातून मोठ्या प्रमाणावर निर्यात झालेले अर्जेंटिनी नाव. ब्यूनोस आयरेसजवळील झोपडपट्ट्या, लहान घरांच्या वस्त्या, शहरांमधील अडनिडी घरे त्यांच्या कथांमध्ये येतात. काळी जादू आणि मृतात्म्यांना जागविण्याचे (प्लँचेटसारखे) खेळ करणाऱ्या मुलीदेखील. ‘बॅक व्हेन वी टॉक टू डेड’ ही पाच शाळकरी मुुलींची ‘ओ हेन्रीएटिक धक्का’ देणारी पूर्ण कथा. ‘द डेंजर्स ऑफ स्मोकिंग इन बेड’ या मारियाना यांच्या नव्या कोऱ्या पुस्तकातून इथे…
https://tinyurl.com/34b24cm5