लेखकाचे मोठेपण त्याच्या लिखाणातील आशयातून मोजायचे की लिखाणाच्या संख्येतून या प्रश्नाचे उत्तर प्रत्येकाच्या दृष्टिकोनानुसार वेगवेगळे येऊ शकते. पण गीता मेहता यांच्यासारख्या लेखिकेच्या आयुष्याची गोळाबेरीज मांडायची तर त्यांनी मांडलेला आशयच महत्त्वाचा ठरतो. गीता मेहता फक्त लेखिका नव्हत्या तर त्याआधी पत्रकार होत्या. १९७१ चे बांगलादेशमुक्तीचे युद्ध पत्रकार या नात्याने त्यांनी कव्हर केले होते. या युद्धावर बीबीसी आणि अमेरिकन नॅशनल ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनसाठी त्यांनी केलेला ‘डेटलाइन बांगलादेश’ हा लघुपट विशेष गाजला होता. त्या काळात तो भारतात तसेच परदेशात सिनेमागृहांमध्ये सिनेमा सुरू व्हायच्या आधी आवर्जून दाखवला जात असे. त्याव्यतिरिक्त युरोपीयन तसेच अमेरिकी टीव्ही वाहिन्यांसाठी त्यांनी अनेक लघुपट केले. त्यांनी ‘फक्त’ पाच पुस्तके लिहिली होती. पण त्यांची पुस्तके जगभरातल्या तब्बल २१ भाषांमध्ये अनुवादित झाली. युरोपात ही पुस्तके त्या काळात बेस्टसेलर पुस्तकांच्या यादीत असत. भारतीय वंशाच्या अमेरिकी लेखिका अशी त्यांची लेखनाच्या प्रांतामधली मुशाफिरी असली तरी प्रामुख्याने भारताची पाश्चात्त्य जगाला ओळख करून देणे या लेखकीय भूमिकेतून आयुष्यभर वावरल्या आणि ८० व्या वर्षी हे सगळे थांबले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा