‘मुद्दाम आयोजित केलेल्या या वार्षिक परिषदेत जमलेल्या सर्व अधिकाऱ्यांनो, सांकेतिक भाषेत किंवा इशाऱ्याने लाच मागणे हा भ्रष्टाचार नाही असा निकाल न्यायालयाने दिल्यापासून आनंदित झालेल्या सरकारी बाबूंनी नवनवे संकेत व इशारे शोधून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला हैराण केले आहे. त्यामुळे सापळा यशस्वितेचे प्रमाण कमालीचे घटले आहे. या सर्वात मोठ्या संकटांतून मार्ग काढण्यासाठी आपण आज येथे जमलो आहोत. त्याआधी हे संकेत व इशारे नेमके कोणते हेही समजून घेणे गरजेचे.

हेही वाचा : उलटा चष्मा : नेहरूच जबाबदार!

Jharkhand vidhan sabha election 2024
अन्वयार्थ : झारखंडी राजकारणास भाजपची ‘कलाटणी’
sureshchandra ogale
व्यक्तिवेध : प्रा. सतीशचंद्र ओगले
first national emergency in india
संविधानभान : भारतातील पहिली आणीबाणी
loksatta readers comments
लोकमानस : अपरिहार्य आहे, म्हणून निवडणुका
peoples representatives
चतु:सूत्र : प्रतिनिधित्वाचे प्रश्नोपनिषद
Bangladesh Pakistan trade relations
अन्वयार्थ : बांगलादेश-पाकिस्तानच्या मैत्रीपर्वाचा प्रारंभ?
mukund phansalkar
व्यक्तिवेध : मुकुंद फणसळकर
constitution article 352 loksatta news
संविधानभान : स्वातंत्र्य आणि आणीबाणी
loksatta readers comment
लोकमानस: स्वविकास होणे ओघाने आलेच!

पोलीस, महसूल व बांधकाम ही तीन खाती कायम आपल्या रडारवर असतात. यातल्या अनेक बाबूंनी कारवाई टाळण्यासाठी अनेक नवनवे संकेत व इशारे शिकून घेतले आहेत. ही सवय कायम राहावी म्हणून अनेकजण कामकाजातसुद्धा याचाच वापर करतात. एक अतिशय भ्रष्ट बाबू रोज कपाळावर वेगवेगळ्या रंगांचे टिळे लावून येतो. त्यातला केशरी ज्या दिवशी दिसेल त्याच दिवशी तो मंजूर कामाच्या दहा टक्के रक्कम स्वीकारतो. शंका आली की प्रसाधनगृहात जाऊन टिळा बदलतो. त्यामुळे तीनदा सापळे फसले. एक अधिकारी कानात बाळी घालून आला तरच लाच स्वीकारतो. त्याची वाट बघत तक्रारदार थकून गेले व शेवटी त्यांनी ‘रंगेहाथ’चा नाद सोडला. या निर्णयानंतर बहुतांश बाबू नेत्रपल्लवित अगदी माहीर झाले आहेत. एक डोळा मारला की अमुक रक्कम, दोन वेळा मारले की तमुक. दोन्ही डोळे मिचकावले की लाचेचा शेवटचा हप्ता, डोळ्याची एक भुवई उंचावली की इतके टक्के, दोन्ही उंचावल्या की तितके. दोन्ही डोळे मिटून दहा सेकंद बसले की दहा लाख, पंधरा सेकंद झाले की पंधरा असे नाना प्रयोग सर्वत्र सुरू झालेत. अंगठा वर ठेवून मूठ आवळणे, तो न दिसता मूठ घालणे, अंगठा उर्वरित चार बोटांवरून एकदा अथवा दोनदा फिरवणे, तर्जनी व अंगठा एकत्र आणणे, हाताची चार बोटे उघडणे व बंद करणे, मोबाइलमधील कॅल्क्युलेटर समोर धरून त्यात आकडा दाखवणे व नंतर तो लगेच डिलीट करणे, टेबलाच्या खणात असलेली लक्ष्मीची मूर्ती बाहेर काढली तर किती, गणपती बाहेर काढला तर किती अशा युक्त्या वापरून हैराण करून सोडले आहे. एकाने तर आमचा गणपती किती लिटर दूध पितो हे सांगत दोन, तीन, पाच अशा प्रमाणात लाखोंची लाच घेणे अगदी निडरपणे सुरू केल्याचे पाहणीत आढळले. लाच स्वीकारताना अजिबात बोलायचे नाही अशी जणू शपथच या बाबूंनी घेतलेली दिसते. तक्रारकर्ते व साक्षीदार समोरच्याने काहीतरी बोलावे म्हणून प्रयत्न करतात पण इशारा आधी ठरला असेल त्याचीच पुनरावृत्ती करतात. यावर उपाय म्हणून या निकालाला सर्वोच्च ठिकाणी आव्हान देत स्थगिती मिळवावी असा प्रस्ताव शासनाला दिला पण तिथे असलेल्या बाबूंनी तो अडवून धरला आहे. त्यामुळे हा विभागच आता बंद होण्याच्या मार्गावर आहे’ हे ऐकताच सर्वांनी अचानक टाळ्या वाजवल्या. त्या ऐकून प्रमुख चक्रावले. नंतर त्यांनी त्यामागच्या कारणाचा शोध घेतला असता ‘आता मूळ विभागात म्हणजे पोलीस दलात जायला मिळणार’ या आनंदातून त्या वाजवल्या गेल्याचे समजले. हे कळताच त्यांनी कपाळावर हात मारून घेतला.