जगातील पुस्तक कुतूहलोत्सुकांना नोबेल पुरस्कारासाठीच्या युरोपात चालणाऱ्या सट्टेबाजीने गुरुवारी सकाळपर्यंत बरेच गुंतवून ठेवले; ज्यामुळे यंदाचे साहित्यिक नोबेल पारितोषिक कॅन सुई या चिनी कादंबरी लेखिकेला मिळणार असल्याची धारदार चर्चा रंगली होती. गेले दशकभर जपानी लेखक हारुकी मुराकामी अशा प्रकारच्या सट्टेबाजीमुळे सर्वाधिक वेळा नोबेलने हुलकावणी दिलेला लेखक ठरला आहे. यंदा मार्गारेट अ‍ॅटवूड, सलमान रश्दी, वाचकांना अद्याप कोणत्याही प्रकारे दर्शन न घडलेला अमेरिकी लेखक थॉमस पिंचन आणि बहुप्रसवा खूपविक्या स्टीवन किंग हेही यंदा नोबेल मिळवू शकणाऱ्या संभाव्य साहित्यिकांच्या यादीत होते. मात्र अशा प्रकारच्या चर्चेतील बहाद्दरांपलीकडे असलेल्या साहित्यिकालाच पारितोषिकाने गौरविण्याचा शिरस्ता नोबेल समितीने पाळला. नॉर्वेच्या युआन फोस यांच्या नावाची घोषणा गुरुवारी संध्याकाळी झाली. त्यानंतर त्यांच्या इंग्रजी भाषिक पुस्तकांना, त्यांच्या लिखाणाला आणि त्यांच्यावरील लिखाणाला शोधण्यासाठी माध्यमांची घाईगर्दी होऊ लागली.

नाटक आणि गद्यलेखनासाठी ओळखल्या गेलेल्या युआन फोस यांनी सर्वमान्य लेखन नियमांना झुगारून देण्यात कायम आनंद मानला आहे. छोटी-छोटी वाक्ये हा सुंदर लेखनाचा गुण मानला जात असला, तरी त्यांच्या सप्तकादंबरीत म्हणजे तब्बल आठशे पानांच्या लेखनऐवजात एकच एक वाक्य आहे. जे सुरू होते आणि संपतच नाही. त्यामुळे परिच्छेद किंवा पूर्णविराम असण्याचा संबंधच राहात नाही.

semiconductor technology to china
चिप-चरित्र: चिनी धोरणसातत्याची फळे!
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
success story of utham gowda started his own startup owner of captain fresh company
जास्त पगाराची नोकरी सोडली अन् घेतली ‘ही’ जोखीम, आता आहेत कोटींचे मालक; वाचा उथम गौडा यांचा प्रेरणादायी प्रवास
Success Story Of Chitraang Murdia
Success Story Of Chitraang Murdia : एकेकाळी होता आयआयटी टॉपर, डॉक्टर होण्यासाठी सगळंच सोडलं; वाचा, चित्रांग मुरडियाची गोष्ट
Tula Shikvin Changlach Dhada
भुवनेश्वरी आणि चारुलताच्या गोंधळात अक्षराच वेडी ठरणार; नेटकरी म्हणाले, “शिक्षिका असून सुद्धा…”
Padmashri Physicist Dr Rohini Godbole Memoirs by Researcher Dr Radhika Vinze
विज्ञानव्रती
Two brothers from the village farmed saffron together Earn lakhs of rupees
Success Story: खेड्यातील दोन भावांनी मिळून केली केशरची शेती; वर्षाला कमावतात लाखो रुपये
IAS Ramesh Gholap Success Story
Success Story: वडिलांच्या निधनानंतर आईबरोबर विकल्या बांगड्या आणि मेहनतीच्या जोरावर झाले IAS अधिकारी

अर्थात ‘सीन्स फ्रॉम माय चाइल्डहूड’ या निबंधात किंवा त्यांच्या इतर कादंबऱ्यांच्या इंग्रजी अनुवादात छोटी वाक्ये सापडतात. वयाच्या सातव्या वर्षी मृत्यूच्या अगदी मुखात जाऊन परतलेल्या युआन यांच्या आयुष्यावर या घटनेचा मोठा पगडा आहे आणि लिखाणातून मृत्युसंदर्भ कायम उतरत राहिला आहे. मार्क्‍सवादी विचारसरणी असलेल्या या लेखकाने आपले संपूर्ण तारुण्य ‘हिप्पी’ संस्कृतीचे नॉर्वेमधील प्रतिनिधी असल्यासारखे अनुभवले. विद्यापीठीय जीवनात पहिली कादंबरी लिहिली आणि नाटकांमुळे इब्सेननंतरचा नॉर्वेमधील थोर नाटककार ही ओळखही निर्माण केली.

नाटक, कविता, कादंबरी, कथा आणि लहान मुलांसाठी पुस्तके असा तब्बल सत्तरहून अधिक ग्रंथांचा कर्ता असलेल्या युआन फोस यांच्या लेखनात जे सांगता न येण्यासारखे किंवा सांगता न येण्याइतपत अवघड आहे, त्याचाच पाठपुरावा झाला. त्यांच्या सप्तकादंबरीतही आल हा निवेदक-नायक आणि आल नावाचाच- त्याच्यासारखाच त्याचा शेजारी यांची सपक आयुष्ये येतात. निवेदक आल याची दीर्घ चिंतने हाच या कादंबरीचा महत्त्वाचा भाग. ‘आयुष्यातील अकथनीय भागाला कथनीय करण्याची कला त्यांना साधली असल्यामुळे’ स्वीडिश अकादमीने त्यांना नोबेल जाहीर केले. गेल्या दशकभरात तरी अमेरिकेसह सर्वच खंडांत नॉर्वेतील कार्ल ओव्ह कनौसगार्ड या एकाच लेखकाचे नाव गाजत असते. त्याने आपल्या आयुष्यावर लिहिलेल्या ‘मिन काम्प’ (इंग्रजीत ‘माय स्ट्रगल’) या सहा कादंबऱ्यांची देशोदेशी भाषांतरे झाली आहेत. नोबेल पारितोषिकामुळे येत्या काही दिवसांत युआन फोस यांच्या एका वाक्याच्या सप्तकादंबऱ्यांना आणि इंग्रजीत अनुवाद झालेल्या इतर पुस्तकांना नवा वाचक लाभणार आहे.