भारताचा विख्यात बुद्धिबळपटू, माजी जगज्जेता विश्वनाथन आनंद वयाच्या १७ व्या वर्षीपर्यंत ‘ग्रँडमास्टर’ बनला नव्हता. १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर आनंद ज्युनियर जगज्जेता बनला. गुकेश त्या वयाचा होईपर्यंत बहुधा बुद्धिबळातील सीनियर जगज्जेता बनलेला असेल. आनंदने बुद्धिबळात जे मिळवले, ते अतुलनीय खरेच. पण त्याची गादी चालवणारा भारतात कोणी तयार होईल का, या प्रश्नाचे उत्तर शोधण्याच्या फंदात आता भारतीय बुद्धिबळप्रेमी फारसे पडणार नाहीत. कारण गुकेशच्या रूपात त्या प्रश्नाचे खणखणीत उत्तर मिळाले आहे. १२व्या वर्षीच गुकेश ग्रँडमास्टर बनला. या खेळाच्या इतिहासातील सर्वात युवा ग्रँडमास्टर बनण्याचा त्याचा विक्रम अवघ्या १७ दिवसांनी हुकला! भारताच्या ताज्या दमाच्या युवा ग्रँडमास्टरांच्या गटामध्ये गुकेश सर्वात तरुण. सुरुवातीच्या वर्षांमध्ये त्याच्यापेक्षा आर. प्रज्ञानंद, निहाल सरीन, अर्जुन एरिगेसीसारख्या उदयोन्मुख बुद्धिबळपटूंनी अधिक चमक दाखवली होती. तरीदेखील प्रसिद्धीचा किंवा प्रतिकूल तुलनेचा जराही परिणाम खेळावर होऊ द्यायचा नाही, ही समज गुकेशमध्ये खूप आधीपासून दिसून येते. ही परिपक्वता, त्या जोडीला मानसिक कणखरपणा आणि एकाग्रता या गुकेशच्या जमेच्या बाजू. आनंद आणि प्रज्ञानंद यांच्याप्रमाणेच गुकेशही चेन्नईकर. त्या शहरात एकामागोमाग एक गुणवान बुद्धिबळपटू कसे निर्माण होतात हा स्वतंत्र अभ्यासाचाच विषय ठरेल.

हेही वाचा >>> पहिली बाजू : आचारसंहिता : रोखठोक तरीही मानवी!

IND vs AUS Boxing Day Test Sam Konstas hit six against Jasprit Bumrah after 4483 balls
IND vs AUS : १९ वर्षीय खेळाडूने जसप्रीत बुमराहविरुद्ध केला मोठा पराक्रम, ११४५ दिवसांनी मोडला खास विक्रम
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
IND vs AUS boxing day test 2024
IND vs AUS : रोहित शर्माने घेतला मोठा निर्णय! ‘या’ स्टार खेळाडूला प्लेइंग इलेव्हनमधून दाखवला बाहेरचा रस्ता
Manu Bhaker breaks silence on Khel Ratna row
अर्ज भरण्यात माझ्याकडूनच चूक! खेलरत्न पुरस्कार वादावरून मनूचे स्पष्टीकरण
Pankaja Munde and Dhananjay Munde vs Suresh Dhas new controversy on political stage after elections
मुंडे बहीण-भाऊ विरुद्ध सुरेश धस, निवडणुकीनंतर राजकीय पटलावर नवा वाद
Dommaraju Gukesh Ding Liren World Chess Championship Match Entertainment news
दक्षिणी दिग्विजयाचा अर्थ…
loksatta lokrang Andhra Pradesh and Telangana have a rich tradition of chess
आदर्श घ्यावा असा…
Ladki Bahin Yojana, Ladki Bahin Yojana advertisement ,
महायुतीला सत्ता मिळवून देणाऱ्या लाडकी बहीण योजनेच्या जाहिरातीवर किती कोटींचा खर्च झाला माहिती आहे का?

कँडिडेट्स स्पर्धेमध्ये यंदा खुल्या आणि महिला गटात मिळून विक्रमी पाच भारतीय बुद्धिबळपटू उतरले होते. एके काळी असा संख्यात्मक दबदबा पूर्वाश्रमीच्या सोव्हिएत महासंघाकडून दिसायचा. महाराष्ट्राचा विदित गुजराथी, गुकेश आणि प्रज्ञानंद; तसेच महिला गटात कोनेरु हम्पी आणि आर. वैशाली यांनी कँडिडेट्स स्पर्धेपर्यंत मजल मारली होती. गुकेशसह प्रत्येकाने या स्पर्धेत काही ना काही छाप पाडलीच. भारतीय बुद्धिबळपटूंना या स्पर्धेत फार संधी मिळणार नाही, असे भाकीत बहुतेक माजी बुद्धिबळपटू आणि विश्लेषकांनी व्यक्त केले होते. त्याचा फारसा परिणाम खेळावर होऊ न देता, प्रत्येकाने आपला सर्वोत्तम खेळ करण्याचा प्रयत्न केला. काही थक्क करणारे विजय नोंदवले, तसेच काही वेळा खंतावणारे पराभवही पाहिले. हम्पी वगळता साऱ्यांसाठी हा नवीन अनुभव होता. गुकेशच्या बाबतीत परिस्थिती बऱ्यापैकी प्रतिकूल होती. स्पर्धा सुरू होण्याच्या वेळी तो सर्वात युवा बुद्धिबळपटू होताच, शिवाय क्रमवारीमध्येही सहावा होता. किमान तीन खेळाडूंना सर्वाधिक संधी आहे यावर बहुतांचे एकमत होते. अमेरिकेचे फॅबियानो करुआना आणि हिकारु नाकामुरा आणि रशियाचा इयान नेपोम्नियाशी हे तिघेही यापूर्वी कँडिडेट्स खेळलेले आहेत. नेपोम्नियाशीने तर दोन वेळा ही स्पर्धा जिंकलेली आहे. या तिघांचे आव्हान मोडून गुकेश सर्वात युवा कँडिडेट्स विजेता बनला, हे नक्कीच कौतुकास्पद.

गुकेशच्या खेळातील आणि व्यक्तिमत्त्वामधील काही वैशिष्टये त्याला इतरांपेक्षा वेगळा ठरवतात. कारकीर्दीच्या विशिष्ट टप्प्यावर येईपर्यंत त्याने संगणकाची मदत खूपच कमी वेळा घेतली. सध्याच्या जमान्यात ही मोठी जोखीम ठरते. कारण इतर अनेक क्षेत्रांपेक्षा बुद्धिबळात कृत्रिम बुद्धिमत्तेचा शिरकाव आधी झाला आणि आता तर त्यावर आधारित शक्तिशाली सॉफ्टवेअरचा तयारीसाठी वापर हा अव्वल बुद्धिबळपटू बनण्याच्या मार्गातील एक निर्णायक घटक ठरतो. गुकेशच्या प्रशिक्षकांनी आणि पालकांनी त्याऐवजी त्याला स्वयंप्रज्ञेच्या जोरावर बुद्धिबळ पटावरील हालचाली करण्यास उद्युक्त केले. याशिवाय बुद्धिबळ जगतात सातत्याने खेळल्या जाणाऱ्या ऑनलाइन जलद आणि अतिजलद स्पर्धाकडेही गुकेश फारसा फिरकत नाही. त्याऐवजी पारंपरिक (क्लासिकल) प्रकाराला त्याची पहिली पसंती असते. त्यामुळेच इतक्या लहान वयातही पारंपरिक स्पर्धामध्ये खेळताना तो विचलित होत नसावा. गुकेशला कँडिडेट्स स्पर्धेत खेळण्यासाठी आवश्यक गुणांची कमाई करता यावी, यासाठी गतवर्षी चेन्नईत ऐनवेळी एका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या शहराने यापूर्वी बुद्धिबळ जगज्जेतेपद स्पर्धा आणि ऑलिम्पियाडचेही यशस्वी आयोजन करून दाखवले. या आयोजनामागे धडपड आणि प्रेरणा तेथे पक्षातीत असते. निव्वळ ‘आपल्या भूमीत’ महान खेळाडू जन्माला येतात यावर आनंद व्यक्त करून, जबाबदारी झटकून टाकणाऱ्यांमध्ये तमीळ राज्यकर्ते येत नाहीत. गुकेशच्या बुद्धिझेपेचे कौतुक करताना, बाकीच्या राज्यांतील राज्यकर्त्यांनी याकडेही लक्ष पुरवायला हरकत नाही.

Story img Loader