शिस्तप्रिय पक्ष अशी प्रतिमा भाजपने जपली, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याकडे पक्षाचे नेतृत्व आल्यापासून पक्षातील शिस्त अधिकच कडक झाली. नेतृत्वाच्या विरोधात बोलणे सोडा, खासगीतही मतप्रदर्शन करण्याची कोणाची टाप राहिली नाही. मुख्यमंत्री किंवा मंत्रीपदावरून रातोरात हटविण्यात आले तरी ‘हू’ की ‘चू’ करण्याची हिम्मत कोणी दाखवली नाही. मोदी-शहा यांच्या गुजरातमध्ये विजय रुपाणी यांच्यासह सर्व मंत्रिमंडळाला नारळ देण्यात आला, कोणत्याही मंत्र्याचा नवीन मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळात फेरसमावेश झाला नाही. नितीन पटेल यांच्यासारख्या ज्येष्ठ मंत्र्यालाही घरी बसविण्यात आले. पण कोणीही नेतृत्वाच्या निर्णयाच्या विरोधात प्रतिक्रिया व्यक्त करण्याचे धाडस केले नाही. जमिनीच्या कथित गैरव्यवहारावरून एकनाथ खडसे यांचा मंत्रीपदाचा राजीनामा घेण्यात आला. त्यानंतर खडसे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात तोफ डागली; पण त्याची किंमत खडसे यांना आजही चुकवावी लागत आहे. खडसेंचे जावई ‘ईडी’चा पाहुणचार घेऊन आले. उत्तराखंडमध्ये सहा महिन्यांत तीन मुख्यमंत्री बदलले पण कोणी काही विरोधी भूमिका घेतली नाही. राजस्थानमध्ये वसुंधराराजे यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला मुख्यमंत्रीपद नाकारले तरीही त्यांनीही केंद्रीय नेतृत्वाबद्दल उघडपणे नाराजी व्यक्त केली नव्हती. मोदी-शहा यांची जरबच तेवढी होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा