‘गुरुकुंजातील हा आश्रम माझा एकटय़ाचा नसून तुम्हा सर्वाचा आहे. ही आश्रमाची गंगा भारताच्या कानाकोपऱ्यांत पोहोचविणे हे तुमच्यावर अवलंबून आहे. हे स्फूर्तिकेंद्र आहे. याचे काशी-केदार बनायला नको.’ अशी इच्छा व्यक्त करणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रचारकांना सांगतात, ‘तुम्हाला माझ्यासोबत संबंध कायम ठेवायचा असेल तर, माझ्या विचारांशी संलग्न होता आले पाहिजे; माझ्या विचारांना तुमची साथ मिळाली पाहिजे ‘‘आपल्या बापाचा तुकडोजी बुवाशी संबंध होता म्हणून आपणही ठेवू’’ हे ठीक आहे. पण हा संबंध विचारांशी हवा, शरीराशी नव्हे! कारण, शरीर हे एक दिवस जाणारच आहे; तत्त्व मात्र अमर आहे! ‘‘गुरुकुंजात शेती किती वाढली, इमारती किती बांधल्या, पैसा किती जमविला,’’ हेच जर आपण पाहू तर ते सारे विकृत स्वरूप ठरेल. ते मला नको आहे. सेवामंडळाच्या शाखा भारतात वाढल्या पाहिजेत. गुरुकुंजात हायस्कूल चालते, दवाखाना चालतो. ते इतर ठिकाणासारखे चालू नये. इथे काहीतरी आदर्श दिसायला हवा. प्रचारकांनी गावागावांत प्रार्थनेचे वारे पसरविले पाहिजे. हेच सर्व विकासाचे मूळ ठरेल! भारतात श्रीगुरुदेव सेवामंडळ ही एक संस्था आहे आणि तिच्यात ५० कार्यकर्ते असले तरी ते भारताच्या कानाकोपऱ्यांत वातावरण निर्माण करू शकतात; असे श्रीगुरुदेव सेवा मंडळाद्वारे घडले पाहिजे.

 गुरुकुंज आश्रम हा सोन्याने वाढला पाहिजे असे मला वाटत नाही तर गावेच्या गावे आदर्श झाली पाहिजेत. अमृतसरला पाच मैलांच्या अंतरात एकच गुरुद्वारा आहे. लोक तेथे पाहायला जातात व गुरुनानकांची आठवण करतात. असे आपणाला गुरुकुंजात करायचे नाही. केवळ भगवी टोपी, निळी काच व आसन म्हणजे सेवामंडळ नव्हे! गुरुदेव सेवामंडळाचे कार्य आम्ही का करीत आहोत याचे ज्ञान प्रचारकांना असणे आवश्यक आहे. गुरुदेव सेवामंडळ म्हणजे गुरुतत्त्व आणि गुरुशक्ती मान्य असणाऱ्या सज्जन सेवकांचे मंडळ. ज्यांचा गुरुशक्तीवर विश्वास असेल आणि सेवा हेच ज्यांचे ध्येय असेल तेच या सेवामंडळाचे सेवक राहतील. कोणताही संप्रदाय केवळ बाह्य शिस्तीवरच जगण्याचा प्रयत्न करीत असेल, जीवनाच्या शुद्धतेकडे त्याचे लक्ष नसेल तर सांप्रदायाची सारी धडपड व्यर्थ आहे. या धोक्यातून आपणाला वाचायचे असेल तर श्रीगुरुदेव सेवामंडळाचे प्राणभूत तत्त्व, जिवंत ध्येय आपण आत्मसात करून जतन केले पाहिजे. लोकांना दाखविण्यासाठी दिनचर्या अमलात आणणे हे वेगळे आणि आत्मशुद्धीसाठी तसे आचरण करणे हे वेगळे. गुरुदेव सेवामंडळातील सरळपणा व सत्यता संपली तर आम्हाला कोणीही विचारणार नाही. लोक तुम्हाला जयगुरू करतात तो तुम्ही इमानदार आहात म्हणून; तुकडोजी बुवाचा शिष्य आहे म्हणून नव्हे. तुम्ही नेतेगिरी करू लागलात तर लोक इतके हुशार आहेत की, ते तुमची टोपी उडवून द्यायलाही मागेपुढे पाहाणार नाहीत. कोणी आपणाला राजकारणाचे निमंत्रण दिले तर ते स्वीकारू नये, कारण ते आपणाला कोणत्या मार्गी नेईल हे सांगता येत नाही.

who is sanjay verma
राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्त करण्यात आलेले संजय वर्मा कोण आहेत? जाणून घ्या…
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
brothers beaten up, Dombivli Kachore,
डोंबिवली कचोरे येथे पेटलेला सुतळी बॉम्ब अंगावर फेकण्याच्या वादातून दोन भावांना मारहाण
BJP worker Murder, Lonavla rural police,
हातऊसने दिलेल्या पैशांच्या वादातून भाजप कार्यकर्त्याचा खून, लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून मित्रासह तिघे गजाआड
Loksatta anvyarth Ten elephants died in the Bandhavgarh tiger project in Madhya Pradesh
अन्वयार्थ: हत्तीएवढ्या दुर्लक्षाचे बळी
Sanjay Bhoir and Meenakshi Shinde have withdrawn their rebellion after cm s orders
बंडोबा थंडावताच संजय केळकरांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, भेटीत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्याचा केळकरांचा दावा
end the Jayant Patils reckless politics says Sadabhau Khot
जयंत पाटलांच्या अविचारी राजकारणाला पूर्णविराम द्या – सदाभाऊ खोत
chief justice of India Dhananjay Y Chandrachud
संघराज्यवादाचे भारतीय संदर्भ

राजेश बोबडे