अमृत बंग

अनेक तरुणांना समाजासाठी काम करायची इच्छा असते. पण ते का करायचे याची स्पष्टता नसते. ती येणे गरजेचे आहे.

Gen Z and the Lost Art of Conversation
तब्बल पाच हजार वर्षांचा इतिहास असलेला थेट मानवी संवाद हरवतोय? नेमके काय घडते आहे?
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
IT Company, IT , IT Company Jobs,
‘आयटी’तील बेरोजगारांचे लोंढे अन् त्यामागील अमानवीय चेहरा…
How to relieve discomfort in generation
अस्वस्थता रिचवायची आहे…
Anand Anil Khode from Akola will lead commanding procession of All India NCC Parade in Delhi
अकोल्यातील आनंदचे दिल्लीमध्ये संचलनात नेतृत्व, सफाई कर्मचाऱ्याच्या मुलाचे नेत्रदिपक यश
Mahatma Gandhi death anniversary, smart prepaid meter, Protest , Nagpur,
नागपूर : स्मार्ट प्रीपेड मीटरविरोधात आंदोलन गांधी पुण्यतिथीच्या दिवशी
Arvind Kejriwal bjp
दिल्लीतील मध्यमवर्गासाठी आप-भाजपमध्ये चढाओढ
representative image
अन्यथा.. स्नेहचित्रे : नकोसा नैतिक!

सध्या सुरू असलेल्या आमच्या निर्माण उपकमाच्या पुढील बॅचच्या निवडप्रक्रियेसाठी भारतभरातून युवक-युवती अर्ज पाठवत आहेत. समाजपरिवर्तनासाठी सहभाग नोंदवण्याची, प्रसंगी झोकून द्यायची त्यांची भावनिक प्रेरणा अतिशय उत्तम आहे. मात्र या मार्गावर लांब पल्ल्यात टिकायचे असल्यास आणि तात्कालिक यशापयशाने भुलून वा खचून जायचे नसल्यास काही एक वैचारिक स्पष्टता व आधार आवश्यक आहे. ‘मी सध्या जे करतोय, त्याचा कंटाळा आलाय’, ‘मला सामाजिक कामात समाधान लाभते’, ‘याला एक ग्लॅमर आहे’ या किंवा अशा इतर केवळ वैयक्तिक कारणांच्या पलीकडे जाऊन मुळात सामाजिक कार्याची अथवा सामाजिक क्षेत्राची गरज काय यासंबंधी मूलभूत विचार करणे गरजेचे आहे. पुढे जाऊन याबाबत भ्रमनिरास व्हायचा नसेल आणि येणारी आव्हाने पेलायची असतील तर ही स्पष्टता मिळवणे भाग आहे.

हेही वाचा >>> उलटा चष्मा : ‘स्त्री रोबोट’ पाठवणारच!

सुप्रसिद्ध अमेरिकन व्यवस्थापनतज्ज्ञ पीटर ड्रकर यांचे ‘मॅनेजिंग द नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन’ हे एक अतिशय सुंदर पुस्तक आहे. त्यात ते असे म्हणतात की शासकीय क्षेत्राची प्रमुख भूमिका म्हणजे समाजाला सुरळीतपणे कार्य करण्यास सुकर व्हावे यासाठीचे विविध कायदेकानू, धोरणे व नियम बनवणे आणि त्यांची अंमलबजावणी करणे. खासगी क्षेत्राचे मुख्य काम म्हणजे लोकांना आवश्यक असलेल्या वेगवेगळय़ा वस्तू आणि सेवा उत्पादित व वितरित करणे. मग सामाजिक क्षेत्राचे मुख्य काम काय? पीटर ड्रकर असे म्हणतात की ‘चेंज्ड ह्य़ूूमन बीइंग्स’ म्हणजेच ‘माणसे घडवणे’ ही सामाजिक क्षेत्राची प्राथमिक भूमिका आहे. व्यक्तीचा विकास होतो आहे की नाही, त्या व्यक्तीच्या अंतरंगात व बाह्य जीवनात, वर्तनात बदल होत आहे की नाही यावरून सामाजिक कार्याचे आणि त्याच्या परिणामकारकतेचे मोजमाप केले जाईल, करायला हवे. यामुळे सामाजिक क्षेत्राची भूमिका एकाच वेळी अतिशय रोमांचक आणि आव्हानात्मक अशी बनते.

या व्यापक भूमिकेला अनुसरून मग प्रत्यक्ष कृतीच्या पातळीवर सामाजिक क्षेत्राची नेमकी व्याप्ती काय, कामाचे ठोस प्रकार व त्याचे विविध पैलू काय याविषयी मी एक सहामितीय रचना सुचवतो :- 

लोकसेवा : समाजातील सर्वात गरजू आणि राजकीय व आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांना जीवनावश्यक सेवा मिळवून देणे, प्रसंगी स्वत: ती सेवा देणे, कारण सहसा शासन व बाजार व्यवस्था त्यांच्यापर्यंत योग्य प्रमाणात पोहोचत नाही किंवा पोहोचू इच्छित नाही. ग्रामीण, आदिवासी भागात किंवा शहरी झोपडपट्टय़ांमधील वंचित लोकांसोबत काम करणारे अनेक सामाजिक उपक्रम या पैलूवर काम करत असतात. 

*  लोक सक्षमीकरण : सत्तेचा असमतोल आणि विषमता दूर करण्याच्या उद्देशाने व्यक्तींना सक्षम करणे आणि विकेंद्रीकरणाच्या व लोकशाहीकरणाच्या प्रक्रियेला बळकट करणे हे सामाजिक क्षेत्राचे अत्यावश्यक कार्य आहे. इंग्रजीतील ‘एम्पॉवर’ हा शब्द बघा, ‘पॉवर’पासून आलेला आहे. खासगी क्षेत्राकडे आर्थिक पॉवर आहे. शासकीय क्षेत्राकडे राजकीय, नोकरशाही, दंडशक्ती आणि संसाधन वाटपाची पॉवर आहे. सहसा असे दिसेल की ही दोन्ही क्षेत्रे त्या सत्तेला घट्ट पकडून ठेवतात. नागरिकांनी निव्वळ मतदार, योजनांचे लाभार्थी, ग्राहक किंवा नोकर बनून राहावे, बाकीची सत्ता अधिकाधिक प्रमाणात स्वत:च्या हातात केंद्रित व्हावी अशी मानसिकता सरकारी व खासगी क्षेत्रांत सहसा दिसते. हे शक्तीचे असंतुलन दूर करून लोकांना सक्षम करणे, जेणेकरून ते स्वत: त्यांचे प्रश्न सोडवू शकतील आणि स्वत:च्या जीवनाचे सुकाणू हातात घेऊ शकतील, असे काम हे सामाजिक क्षेत्राचा आत्मा आहे. नुसतीच सेवा केली पण लांब पल्ल्यातही समोरची व्यक्ती स्वत:च्या पायावर उभी राहण्यास स्वतंत्र झाली नाही तर ती सेवा तर निव्वळ सामाजिक क्षेत्राची ‘रोजगार हमी योजना’ होईल. लोकांना आत्मनिर्भर होण्यास मदत करणे, त्यांच्यातल्या अव्यक्त सामर्थ्यांला पूर्णत्वाने बहरता येणे, आणि याद्वारे विकसित, स्वायत्त आणि जागरूक ‘चेंज्ड ह्यूमन बीइंग’ घडवणे हे सामाजिक क्षेत्राच्या अस्तित्वाचा गाभा आहे.

हेही वाचा >>> अन्वयार्थ : सरकारच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह

* प्रश्न सोडविण्याचे पथदर्शी प्रयोग : सामाजिक समस्या सोडविण्यासाठी विविध प्रकारचे तांत्रिक, वैज्ञानिक, सांस्कृतिक व लोकसहभागाचे प्रयोग करणे आणि कल्पक व नावीन्यपूर्ण उपाय शोधणे. लोकांशी व त्यांच्या प्रश्नांशी जवळीक असणे, शासकीय नोकरशाहीतील लाल फितीचे बंधन नसणे आणि कॉर्पोरेट क्षेत्रामधील दर तिमाही नफा मिळवायचा दबाव नसणे ही सामाजिक क्षेत्राची काही वैशिष्टय़े आहेत जी या क्षेत्राला एक गतिशीलता आणि लवचीकता देतात. हे स्वातंत्र्य सामाजिक संस्थांनी नावीन्यपूर्ण प्रयोग करण्यासाठी आणि समस्या निवारणाचे सर्जनशील उपाय विकसित करण्यासाठी वापरले पाहिजे. ‘कुठलीही समस्या ज्या समजेतून निर्माण झाली त्याच पातळीवरून सोडवली जाऊ शकत नाही’ हे अल्बर्ट आईन्स्टाईन यांचे वाक्य प्रसिद्ध आहे. म्हणूनच ‘सोशल प्रॉब्लेम सॉल्व्हिंग’साठी सृजनात्मक उपाय, कृतिशील ज्ञाननिर्मिती व पुराव्यावर आधारित पद्धती विकसित करणे हे सामाजिक क्षेत्राचे तिसरे महत्त्वाचे काम. 

* व्हिसल ब्लोअर : समाजामध्ये जेव्हा कुठे अन्याय, अत्याचार किंवा भ्रष्टाचार होत असेल अशा प्रसंगी ‘‘जागल्या’’ म्हणून भूमिका पार पाडणे. राजकीय, सरकारी वा खासगी क्षेत्राचे हितसंबंध जिथे आड येतात तिथे अनेकदा व्यक्ती, समूह, प्राणी, पर्यावरण, इ.वर अन्याय होतो. अशा वेळेस त्या अन्यायाला वाचा फोडणे आणि पीडितांच्या हक्कांसाठी लढणे ही सामाजिक क्षेत्राची महत्त्वपूर्ण भूमिका आहे.

* योगदानाचे माध्यम व व्यासपीठ : समाजाच्या भल्यासाठी मदत करण्याच्या व आपला काही वाटा उचलण्याच्या अनेकविध लोकांच्या इच्छेसाठी एक अभिव्यक्तीचे माध्यम (चॅनेल ऑफ एक्स्प्रेशन) असणे हे सामाजिक क्षेत्राचे एक अंगभूत काम आहे. समाजामध्ये सुदैवाने अनेक लोकांना असे वाटते की मी इतरांसाठी काहीतरी मदत करायला पाहिजे. पण ते इतर कोण, त्यांच्यासाठी मी नेमकं काय करणार, कसे करणार हे शोधण्यात व ठरवण्यात बऱ्याचदा अडचणी जातात. म्हणूनच सामाजिक कार्यकर्ते, स्वयंसेवक, आर्थिक दाते, हितेच्छुक लोक, जागरूक नागरिक अशा विविध मंडळींना त्यांच्या समाजाप्रतीच्या उत्तरदायित्वाच्या पूर्तीसाठी मदतरूप असे एक माध्यम म्हणून, आणि लोकांमधील परोपकाराच्या भावनेला व्यक्त होण्यासाठी एक संघटित व्यासपीठ म्हणून सामाजिक क्षेत्र अतिशय उपयुक्त ठरते.

हेही वाचा >>> पहिली बाजू : ‘घराणेशाही क्विट इंडिया’, कशासाठी?

* मूल्यांची अभिव्यक्ती व प्रसार : सामाजिक क्षेत्राने कितीही वेगवेगळय़ा कृती केल्या तरी त्या कृतींच्या आवाक्याला शेवटी काहीतरी मर्यादा राहणारच. तर करत असलेल्या कृतींच्या माध्यमातून काय वृत्ती प्रसारित होतेय, कुठल्या मूल्यांची अभिव्यक्ती होतेय याकडे लक्ष देणे हे गरजेचे आहे. मानवी समाज आणि संस्कृती ज्या अनेक मूल्यांना महत्त्वाचे मानते त्यांची कायम जाण राहावी म्हणून व्यक्ती, संस्था आणि कृतींच्या रूपातील ‘रोल मॉडेल्स’ आवश्यक असतात, जे या मूल्यांचे दीप म्हणून काम करतात, या मूल्यांवर समाजाचा विश्वास कायम ठेवतात आणि व्यापक प्रमाणावर लोकांना नैतिकदृष्टय़ा उन्नत जगण्याची प्रेरणा देतात. म्हणूनच आपल्याला गांधी, नेल्सन मंडेला, मार्टिन ल्यूथर किंग किंवा ग्रेटा थनबर्ग हवे असतात. हा मूल्यात्मक प्रभाव समाजकार्याच्या इतर उपक्रमांच्या तात्कालिक फायद्यांपेक्षा खूप मोठा आणि दीर्घकालीन असतो.

या सहामितीय फ्रेमवर्कमुळे सामाजिक प्रश्नावर काम करू इच्छिणाऱ्या युवक-युवतींना त्यांच्या वैयक्तिक प्रेरणेसोबतच सामाजिक क्षेत्राच्या अस्तित्वाचा व्यापक संदर्भ व प्रयोजन काय याविषयी स्पष्टता व नेमका दृष्टिकोन विकसित करण्यास मदत होईल ही आशा! ‘का?’चे उत्तर मिळाल्यास पुढे ‘काय?’ आणि ‘कसे?’ ही उत्तरे मिळणे आपसूकच सोपे होईल.

लेखक ‘निर्माण’ युवा उपक्रमाचे प्रमुख आणि ‘सर्च’ या सामाजिक संस्थेचे सहसंचालक आहेत. 

amrutabang@gmail.com

Story img Loader