प्रत्येक वेळी भाषणांचा सूर शेतकरीकेंद्री ठेवायचा आणि हित जोपासण्याची वेळ आली की ग्राहकांचा विचार करायचा ही सगळ्याच सरकारांची नेहमीची सवय. याला केंद्रातले विद्यामान मोदी सरकारही अपवाद नाही. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची सध्याची परवड हेच दाखवून देते. कमी खर्चात होणारे व रोखीने पैसा देणारे पीक म्हणून अलीकडे शेतकरी सोयाबीनकडे वळले. गेल्या पाच वर्षांत या पिकाच्या लागवड क्षेत्रात सतत वाढ होताना दिसते. यंदा हे क्षेत्र पाच लाख हेक्टरने वाढले. हे पाहता केंद्र व राज्य सरकारांनी सोयाबीनवरील संशोधन, त्यावर आधारित प्रक्रिया उद्याोग यांना चालना देणे गरजेचे होते. तसे काहीच न झाल्याने सध्या हे उत्पादक गंभीर आर्थिक संकटात सापडले आहेत. भाजपला याचा जोरदार फटका अलीकडे झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात बसला. विदर्भ तसेच मराठवाडा या सोयाबीनच्या प्रदेशात ऐन प्रचाराच्या धामधुमीत शेतकऱ्यांचा आक्रोश अनुभवायला मिळाला. त्यापासून बोध घेण्याचे सौजन्य राज्य व केंद्र दाखवत नसल्याचे सध्याचे चित्र आहे. सध्या सोयाबीनचा बाजारभाव केवळ चार हजार रुपये प्रतिक्विंटल, म्हणजे सरकारने जाहीर केलेल्या हमीभावापेक्षा ८९२ रुपयांनी कमी आहे. अशा वेळी बाजारात हस्तक्षेप करण्याची धमक सरकार का दाखवत नाही? केवळ प्रोत्साहनपर मदत वा भरपाई जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा देता येणे शक्य नाही हे सरकारला ठाऊक नाही का? कुण्या एका आवडीच्या उद्याोगपतीला या मंदीचा फायदा घेऊन जास्तीत जास्त खाद्यातेल आयात करता यावे यासाठी सरकारचे हे दुर्लक्ष सुरू आहे का? जनधन, लखपती व करोडपती दीदी अशा आकर्षक योजनांकडे लक्ष वेधण्याबरोबरच शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा जास्त दर मिळेल याकडे लक्ष का दिले जात नाही, असे प्रश्न निर्माण होतात.
अन्वयार्थ: शेतकऱ्यांना आता सोयाबीन रडवणार?
देशात सोयाबीनची ८० टक्के लागवड महाराष्ट्र तसेच मध्य प्रदेशात होते. मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांनी लोकसभेत भाजपला साथ दिली.
Written by लोकसत्ता टीम
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 30-08-2024 at 02:20 IST
© The Indian Express (P) Ltd
© The Indian Express (P) Ltd
TOPICSमराठी बातम्याMarathi Newsमहाराष्ट्रातील शेतकरीMaharashtra Farmersविधानसभा निवडणूक २०२४Assembly Election 2024शेतकरीFarmers
मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In maharashtra farmers face crisis as soybean tur prices drop ahead of assembly polls css