काँग्रेस सरकारच्या काळात एनजीओ म्हणजेच बिगर सरकारी संस्थांचा प्रशासनामधला सहभाग जितका वाढला होता, तितकाच नंतरच्या काळात तो उखडून टाकला जातो आहे, असे २०१४ पासूनचे चित्र आहे. यासंदर्भातले अगदी ताजे उदाहरण आहे सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च म्हणजेच सीपीआर या दिल्लीस्थित बिगर सरकारी संस्थेचे. चारच महिन्यांपूर्वी या संस्थेचा परकीय देणग्या मिळवण्याचा परवाना रद्द करण्यात आला. त्यापाठोपाठ आता संस्थेची गेली ५० वर्षे सुरू असलेली करसवलत रद्द करण्यात आली आहे. ही संस्था वेगवेगळी राज्य सरकारे आणि वेगवेगळय़ा केंद्रीय मंत्रालयांबरोबर सार्वजनिक धोरणासंदर्भातील संशोधनकार्य करते. छत्तीसगडच्या जंगलातील कोळसा खाणकामाच्या विरोधात केल्या गेलेल्या हसदेव बचाओ आंदोलनातील सहभाग आणि नमती पर्यावरणीय न्याय कार्यक्रमासाठीच्या रु. १०.१९ कोटी (२०१६ पासून) च्या पावत्या हे करसवलत रद्द करण्याचे कारण आदेशात नमूद केले आहे. संस्थेला मिळणाऱ्या पैशांचा उपयोग संशोधनाऐवजी वेगवेगळे दावे आणि तक्रारी दाखल करण्यासाठी केला जातो, असा सरकारचा आरोप असून हे काही सेवाभावी काम नाही, असा आयटी विभागाचा युक्तिवाद आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा