चीनच्या शिनजियांग प्रांतामध्ये विघुर आणि इतर मुस्लीमधर्मीयांच्या मानवी हक्क उल्लंघनाविषयी संयुक्त राष्ट्रांमध्ये चर्चा घडवून आणण्याच्या ठरावाला चीन व त्याच्या मित्रराष्ट्रांनी १९ विरुद्ध १७ मतांनी हाणून पाडले. त्यामुळे या महत्त्वाच्या मुद्दय़ावर चर्चा होणार नाही. या संपूर्ण घडामोडीतील लक्षणीय बाब म्हणजे, ठरावावर तटस्थ राहिलेल्या ११ देशांमध्ये भारतही होता. ठरावाच्या बाजूने मतदान करणाऱ्या देशांमध्ये नॉर्वे, स्वीडन, फिनलँड, जर्मनी, नेदरलँड्स, जपान, ब्रिटन, अमेरिका असे देश होते. ठरावाला विरोध करणाऱ्यांमध्ये पाकिस्तान, कझाकस्तान, इंडोनेशिया, कतार आणि संयुक्त अरब अमिराती हे देश होते. भारतासह मलेशिया, युक्रेन अशा काही देशांनी तटस्थ राहणे पसंत केले. चीनच्या सुदूर पश्चिमेला, मध्य आशियाला खेटून असलेल्या प्रांतामध्ये मुस्लिमांचा विविध कारणांस्तव अनन्वित छळ होत असतानाही, मुस्लीमबहुल देशांनी त्याविषयीच्या ठरावावर चीनची तळी उचलून धरावी हे विलक्षणच. परंतु भारताची तटस्थता आणखी किती काळ आणि कुठवर जाणार, यावर चर्चेची गरज मात्र नक्कीच आहे. प्रस्तुत ठरावावर तटस्थ राहण्याविषयी परराष्ट्र मंत्रालयाने खुलाशादाखल सांगितले आहे की, राष्ट्रकेंद्री ठरावांवर (थोडक्यात एखाद्या देशाच्या अंतर्गत बाबीविषयी ठरावावर) तटस्थ राहण्याचे धोरण जुनेच आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा