देशातील वन क्षेत्रांत वाढ झाल्याची आकडेवारी राष्ट्रीय वन सर्वेक्षण अहवालात दिसली आणि उत्सवप्रिय देशांत आनंदोत्सवाला नवे निमित्त मिळाले. काहीच दिवसांपूर्वी वाघ वाढल्याच्या आनंदोत्सवाचा उत्तरार्ध साजरा करण्याची संधी या अहवालाने दिली. गेल्या काही वर्षांतील या अहवालानुसार देशाची अधोगती यंदा सर्वेक्षणाची पद्धतच बदलल्याने प्रगतीत परावर्तित झालेली दिसते आहे. गेल्या अहवालाच्या (२०२१) तुलनेत या अहवालात (२०२३) देशातील वनक्षेत्रांत १४४५.८१ चौरस किलोमीटर वाढ झाल्याची दिसते आहे. देशाच्या एकूण जमिनीपैकी ८ लाख २७ हजार ३५७ चौरस किलोमटर जंगल आहे. म्हणजेच जवळपास २५ टक्के वनक्षेत्र आहे. त्यातही घनदाट जंगलाचे प्रमाण हे ७० टक्क्यांनी वाढल्याचे दिसते आहे. या सर्व समृद्धी, विकासाच्या खुणा बारकाईने पाहिल्यास मात्र वन, निसर्ग, पर्यावरणप्रेमी आणि एकुणांत पुढील पिढ्यांच्या भविष्याची काळजी करणाऱ्यांच्या उत्साहाला विरजण लागू शकते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा