फुटबॉलच्याइतकेच हॉकीमध्येही गोलरक्षकाचे महत्त्व अनन्यसाधारण असते. पण फुटबॉलमधील गोलरक्षकाइतके वलय हॉकीतील गोलरक्षकाला मिळत नव्हते. पी. आर. श्रीजेशने हे अलिखित वास्तव बदलून टाकले हे नक्की. गेल्या दोन ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये पुरुष हॉकीत भारताला मिळालेल्या दोन कांस्यपदकांमध्ये श्रीजेशचा सिंहाचा वाटा आहे. दोन्ही स्पर्धांमध्ये मिळून भारतीय संघाने जितके गोल झळकवले, त्यापेक्षा कदाचित अधिक गोल श्रीजेशच्या चापल्य व चतुराईने रोखले. टोक्यो आणि पॅरिस या दोन्ही ऑलिम्पिक स्पर्धांत पदकांच्या स्पर्धेत राहिलेला भारताचा हॉकी संघ एकमेव होता. टोक्योमध्ये बेल्जियम आणि ऑस्ट्रेलिया अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदक विजेते होते. पॅरिसमध्ये त्यांना पदक जिंकता आले नाही, नेदरलँड्स आणि जर्मनी हे सुवर्ण व रौप्यपदक विजेते ठरले. दोन्ही वेळी भारत कांस्यपदक लढतींमध्ये जिंकला. हॉकीमध्ये सध्या पहिल्या सहा संघांच्या क्षमतेमध्ये फार फरक दिसून येत नाही. मोक्याच्या क्षणी खेळ उंचावणारा संघच जिंकतो. भारताने इतक्या वर्षांनंतर ही कामगिरी करून दाखवली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा