आज आपल्या हातात अत्यंत सहजपणे उपलब्ध असणाऱ्या अनेक गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्यांचे योगदान आपण अत्यंत सहजपणे गृहीत धरतो, तसेच काहीसे बी. के. सिनगल यांच्याबाबतीतही म्हणता येईल. प्रदीर्घ आजारपणाने वयाच्या ८२व्या वर्षी जगाचा निरोप घेणाऱ्या विदेश संचार निगम लिमिटेडच्या एके काळच्या या अध्यक्षाचे आयुष्य नवल वाटावे असे कुठे कुठे भिरभिरत गेले. अंबालामध्ये जन्म, आधी लाहोरमध्ये आणि फाळणीनंतर दिल्लीत शालेय शिक्षण, त्यानंतर खरगपूरच्या आयआयटीत इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग, त्यानंतर लंडन, बुडापेस्टमध्ये बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकऱ्या अशा पद्धतीने जगणारे सिनगल १९९१ मध्ये उठून मुंबईत आले आणि त्यांनी विदेश संचार निगमची जबाबदारी घेतली. ३० वर्षांपूर्वी विकसित देशांमधील स्थिरस्थावर आयुष्य सोडून अशा पद्धतीने भारतात येऊन ज्याची बाराखडीदेखील लोकांना माहीत नाही अशा इंटरनेटसारख्या क्षेत्राची उभारणी करण्याचे आव्हान स्वीकारणे ही अजिबातच सोपी गोष्ट नव्हती. परदेशात बहुराष्ट्रीय कंपनीत काम करणाऱ्या माणसाला व्हीएसएनएलसारख्या लाल फितीतील सरकारी आस्थापनेत काम करणे किती जड गेले असेल याची आज आपण कल्पना करू शकतो. पण तेव्हा तसे करणे हे खरे तर धाडस होते. तसे आपल्याकडे १९९१ मध्ये ईथरनेट वापरात आले होते. पण ते फक्त काही मोजक्या आस्थापनांसाठी होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा