राजेश बोबडे

अधिकारांचा दुरुपयोग केल्याने काही व्यक्तींना व राष्ट्राला कसे नुकसान सोसावे लागते किंवा परस्परासंबंधी त्यांच्या भावना कशा कडू रूप धारण करतात एवढेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना सांगायचे नव्हते, तर साऱ्या राष्ट्राच्या जीवनावर त्यांचा कसा दुष्परिणाम होतो हे गणिती पद्धतीने दाखवायचे होते. महाराज म्हणतात, ‘‘एका शेतात, एका गावात, एका कारखान्यात किंवा एका योजनेत अथवा मोहिमेत चुकारपणा अथवा हेळसांड झाल्याने एका ठिकाणीच धनधान्याची तूट व द्रव्याची हानी होणार असली तरी, ती उणीव भरून काढण्यासाठी सर्व गावांना व राष्ट्रालाच झटावे लागणार किंवा झीज सोसावी लागणार, हे उघड आहे. हेळसांडीच्या वा चैनीच्या मनोवृत्तीने जर कोणी या राष्ट्रीय संपत्तीला धक्का दिला तर तो आणि त्याला तशी संधी देणारा किंवा प्रवृत्त करणारा प्रत्येक थोर मनुष्य हा महान देशद्रोहीच समजावा लागणार नाही का? आणि अशी एखाद्या ठिकाणची स्थिती क्षणभर क्षम्यही समजता येईल, पण जिथे तिथे हाच प्रकार दिसला तर मग मनुष्यच मनुष्याचा शत्रू होईल.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

देशाचा नाश आपोआपच होईल, हे कोणी सांगायला थोडेच हवे?’’ असे सांगून महाराज म्हणतात इमानदारी कोणाजवळ नाही, मग ती आपण तरी का ठेवावी व या जगाच्या उलटय़ा हवेत इमानदारीचे बक्षीस म्हणून उपासमारीने का मरावे, हा प्रश्न आज सर्वाच्याच डोक्यात थैमान घालू लागलेला दिसतो. प्रत्येक जण मिळालेल्या संधीचा, सवलतीचा व सत्तेचा उपयोग याच दिशेने करू लागला तर या स्वतंत्र झालेल्या देशाचे अखेर काय होणार, या प्रश्नाने खऱ्या विचारी व दूरदर्शी लोकांना आज बेचैन केले आहे, हेही आपणास दिसून येते. ही गोष्ट अगदी खरीच आहे की, जर प्रत्येकाच्या डोक्यात असे बेइमानीचे भूत घुसले तर या देशाचे कसे होणार? त्यातील प्रत्येक गावाचे कसे होणार अर्थात प्रत्येक व्यक्तीचे म्हणजे पर्यायाने आपले स्वत:चे कसे होणार? याचा विचार जर आज प्रत्येकाने न केला तर ही भारताची नौका भयंकर वादळात सापडून कुणीकडे जाऊन पडेल याचा नेम नाही! त्यात आपापले खिसे भरू लागलेल्या प्रत्येक लहानथोरांचाच सर्वनाश होणार, याचा विचार जनतेने, सरकारने व पुढाऱ्यांनी करावयास नको का?’’ असा प्रश्न करून श्रमप्रतिष्ठा प्रस्थापित व्हावी म्हणून महाराज ग्रामगीतेत लिहितात..

ओळखोनि श्रमाची प्रतिष्ठा।

त्यांनी दावावी  कार्यनिष्ठा।

श्रमणारांच्या निवारावे कष्टा।

स्वत: श्रम करोनिया।।

सर्वानी सर्वासि पूरक व्हावे।

ऐसे धर्माचे सूत्र बरवे।।

हे काय तुम्हासि सांगावे?

शहाणे जनहो!

rajesh772@gmail.com

Story img Loader