हृदय-शल्यचिकित्सक म्हणून विख्यात असलेले डॉक्टर मार्तंडवर्मा शंकरन् वालिआथन हे कधीतरी १९८० च्या दशकात एका शेळीच्या मृत्यूने व्यथित झाले नसते, तर पुढे पद्माश्री (२००२) आणि पद्माविभूषण (२००५) किंवा अमेरिकेच्या जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाचा वैद्याकीय शिक्षणकार्यासाठीचा पुरस्कार (२००९), फ्रेंच सरकारचा ‘शवालिए’ किताब (१९९९) आदी अनेक सन्मानही त्यांच्याकडे फिरकले नसते. वालिआथन यांना व्यथित करणारी ती शेळी साधीसुधी नव्हती… तिच्या हृदयात डॉ. वालिआथन यांनीच, संपूर्णत: भारतीय बनावटीची कृत्रिम झडपे बसवली होती. त्याआधीच्या काही वर्षांतल्या बऱ्याच संशोधनानंतर दोनदा सुधारणा करून मगच ही झडपे त्या शेळी-हृदयात बसवली गेल्याने तिच्या जीवनमरणावर बरेच काही अवलंबून होते… चाळिशीतले हृदयरोगी पोराबाळांची शिक्षणे पूर्ण होईपर्यंत तरी जगणार की नाही, हेसुद्धा! पण ती शेळी तीन महिन्यांत गेली. मग डॉ. वालिआथन यांना आणखी पाच-सहा वर्षे प्रयोग करत राहावे लागले. अखेर १९९० मध्ये यश मिळाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा