डीआरडीओ, एम्सपासून आयआयटी, ललित कला अकादमीपर्यंतच्या सर्व संस्था संविधानातील मूल्यांचा सुरेख अनुवाद आहेत…

कोविड महासाथीने भारताला विळखा घातला तेव्हा प्रचंड लोकसंख्या असलेल्या आपल्या देशात अशा साथीला तोंड देणे सोपे नव्हते. अशा वेळी एका संस्थेने अहोरात्र राबून वैद्याकीय चाचण्या करून देशातल्या लाखो लोकांचे प्राण वाचवले. या संस्थेचे नाव ‘राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्था’ (एनआयव्ही). भारतीय वैद्याकीय संशोधन परिषदेच्या अंतर्गत असलेल्या या संस्थेची स्थापना पं. नेहरूंच्या पुढाकारातून १९५२ साली पुण्यात झाली. केवळ हीच नव्हे तर सुमारे शंभरहून अधिक संस्था नेहरूंनी स्थापन केल्या. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्व अग्रणी संस्था नेहरूंनी स्थापन केल्या. स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच नेहरूंनी आयसेन हॉवरची भेट घेऊन अणुऊर्जेबाबत चर्चा करून त्यासाठीचा आयोग १९४८ सालीच स्थापन केला. ‘सेंटर फॉर सायंटिफिक अॅण्ड इंडस्ट्रियल रिसर्च’ यासारखी संस्थाही तेव्हाच स्थापन केली आणि सहा वर्षांत या संस्थेने २२ प्रयोगशाळा उभारल्या. ‘संरक्षण संशोधन आणि विकास संघटना’ (डीआरडीओ) असो की इन्कोस्पार (नंतर इस्रा) या संस्थांमुळे देशाने शब्दश: गगनभरारी घेतली. ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ (आयआयटी), ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’, एम्स अशा अनेक संस्था नेहरूंच्या विचारांमधून स्थापन झाल्या. नेहरूंनी मुंबईतील आयआयटी रशियाच्या मदतीने तर कानपूरची आयआयटी अमेरिकेच्या मदतीने स्थापन केली. शास्त्रज्ञ नसलेले सायन्स काँग्रेसचे अध्यक्ष म्हणजे नेहरू. याला कारणीभूत होते नेहरूंचे विज्ञानप्रेम. शिवाय सोबतीला शांतिस्वरूप भटनागर, होमी भाभा, मेघनाद सहा, विक्रम साराभाई असे दिग्गज लोक.

Image Of Jitendra Awhad
“महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ‘स्कॅम”, राहुल गांधींच्या लोकसभेतील भाषणानंतर जितेंद्र आव्हाडांचा मोठा आरोप
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Devotee Angry on yogi adityanath and Narendra modi after stampede in maha kumbha mela
महाकुंभातील भक्त योगी-मोदींवर नाराज का?
loksatta article on constitutional ethics
घटनात्मक नैतिकता म्हणजे नेमके काय?
Prabowo Subianto and Narendra Modi
संचलनात संविधान केंद्रस्थानी; इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे
tarkteerth Lakshman shastri joshi
तर्कतीर्थ विचार : मानवतावादी मूल्यांचा साक्षात्कार
dharavi adani land loksatta
३१९ कोटी रुपयांत ५८ एकर भूखंड अदानींकडे, धारावीकर मुलुंडवासीयांचे शेजारी
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत आणि पंतप्रधान मोदी आपल्या भाषणातून राम मंदिराचा उल्लेख करीत आहेत. (फोटो सौजन्य पीटीआय)
पंतप्रधान मोदी आणि मोहन भागवत यांच्या भाषणात राम मंदिराचा उल्लेख सातत्याने का येतो?

हेही वाचा >>> संविधानभान : स्वायत्त संस्थांची भूमिका

शिक्षण हा तर नेहरूंच्या आस्थेचा विषय. त्यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाची १९५३ साली स्थापना केली. उच्च शिक्षणाच्या, संशोधनाच्या संस्था स्थापन केल्या जात असतानाच केंद्रीय विद्यालयेही ठिकठिकाणी स्थापन केली. पायाभूत सुविधांसाठी भाक्रा नानगल धरण, भिलाई स्टील कारखाना, बोकारो स्टील कारखाना असे कित्येक महत्त्वाकांक्षी प्रकल्प नेहरूंमुळे पार पडले. भारताला १९४७ मध्ये १०० टक्के यंत्रसामग्री आयात करावी लागे. १९७० च्या दशकात हे प्रमाण ९ टक्क्यांवर आले, यावरून देशाच्या औद्याोगिक विकासाची कल्पना येऊ शकते. उद्याोग आणि शेती यात द्वैत आहे, असे नेहरूंनी मानले नाही म्हणून तर ओरिसा, पंजाबमध्ये कृषी तंत्रज्ञानासाठीची विद्यापीठे त्यांनी स्थापन केली. एके काळी उपासमारीने लाखो लोक मरत होते असा देश अन्न उत्पादनात स्वयंपूर्ण तर झालाच आणि नंतर तर निर्यातही करू लागला. तसेच सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे नेहरूंनी आयुर्विमा महामंडळ (एलआयसी) आणि प्रोव्हिडंट फंड सोसायट्यांचे राष्ट्रीयीकरण केले. आयुर्विमा महामंडळ तर देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा झाली. शिक्षण, आरोग्य, कृषी, पायाभूत सुविधा अशा क्षेत्रांत मूलभूत संस्थात्मक उभारणी नेहरूंनी केली.

एका बाजूला ही सारी पायाभूत भौतिक उभारणी केली जात असताना मानवी मनाची मशागत करण्यासाठी साहित्य, कला, संस्कृती यांच्या विकासाची आवश्यकता नेहरूंना वाटत होती. त्यामुळेच ‘साहित्य अकादमी’, ‘संगीत अकादमी’, ‘ललित कला अकादमी’ यांसारख्या संस्था त्यांनी स्थापन केल्या. साहित्य अकादमी या संस्थेने वीसहून अधिक भाषांमधील साहित्याच्या समृद्धीमध्ये निर्णायक भूमिका बजावली. संगीत अकादमीच्या आधिपत्याखालीच ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’ या संस्थेचा जन्म झाला. या संस्थेने शेकडो प्रतिभावान कलाकार घडवले. फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन संस्थेचा इतिहासही असाच देदीप्यमान आहे. याशिवाय वाचनसंस्कृती वाढावी आणि समाज अधिक प्रगल्भ व्हावा, यासाठी नेहरूंनी ‘नॅशनल बुक ट्रस्ट’ या संस्थेची १९५७ साली स्थापना केली. या संस्थेने लहान मुलांसाठी उत्तम बालसाहित्याची मोठ्या प्रमाणावर निर्मिती केली. नेहरू आधुनिक भारताचे शिल्पकार ठरतात ते या अमूल्य कामगिरीमुळेच.

या सर्व संस्था संविधानातील मूल्यांचा आणि तरतुदींचा सुरेख अनुवाद होता. यातून आधुनिक भारत जन्माला आला. संस्थात्मक लोकशाही बळकट झाली. संविधानाने देशाला सांगाडा दिला. या संस्थांनी त्यात प्राण फुंकला. त्यामुळेच त्या प्राणपणाने जपल्या पाहिजेत.

poetshriranjan@gmail.com

Story img Loader