अमेरिकेतला वर्णभेद अखेर कायद्याने संपण्यासाठी १९६७ उजाडले, तोवर जेम्स अर्ल जोन्स हे रंगमंचावर आलेले होते. जॅक जॅक्सन या कृष्णवर्णीय मुष्टियोद्ध्याच्या जीवनकहाणीवर बेतलेल्या त्या नाटकात मुख्य भूमिका जोन्स यांची होती. तोवर जॅक्सन (मृत्यू १९४६) इतिहासकथा बनले होते, पण कॅशियस क्ले- अर्थात मोहम्मद अली- याचा उदय तेव्हा झालेला होता. जोन्स यांच्या भूमिकेने क्ले (अली) पछाडूनच गेला…‘हे नाटक माझे करा- त्यातले नायकाचे गौरवर्णीय मुलीशी प्रेमप्रकरण वगैरे काढून टाका आणि त्याचा काळ बदला- मला जोन्स यांना पाहताना मीच दिसतो आहे’ असे म्हणू लागला! ‘द ग्रेट व्हाइट होप’ या त्या नाटकावर त्याच नावाचा चित्रपट आला, तेव्हा नायक म्हणून जोन्स यांच्याखेरीज कुणाचाही विचारच होणे अशक्य होते. या भूमिकेसाठी त्यांना १९७१ मध्ये ‘ऑस्कर’ नामांकन देण्यात आले, पण पुरस्कार हुकला. तेव्हापासून ४० वर्षांच्या अभिनय-कारकीर्दीनंतर, २०११ मध्ये मात्र त्यांना कारकीर्दगौरवाचे विशेष ऑस्कर बहाल झाले… सत्यजित राय यांना देण्यात आले होते, तसे! इतक्या गुणी, ५० हून अधिक चित्रपट, ८० हून अधिक मालिकांत झळकलेल्या या हॉलीवूड नटाचे निधन सोमवारी- ९ सप्टेंबर रोजी- झाल्याच्या वार्तेने किती भारतीय हळहळले असतील?
व्यक्तिवेध : जेम्स अर्ल जोन्स
जॅक जॅक्सन या कृष्णवर्णीय मुष्टियोद्ध्याच्या जीवनकहाणीवर बेतलेल्या त्या नाटकात मुख्य भूमिका जोन्स यांची होती.
Written by लोकसत्ता टीम
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 11-09-2024 at 01:02 IST
© The Indian Express (P) Ltd
© The Indian Express (P) Ltd
मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: James earl jones biography remembering james earl jones zws