अमृतांशु नेरुरकर (‘चिप’-उद्योगात कार्यरत असलेले तज्ज्ञ)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

गणकयंत्र (कॅल्क्युलेटर) हातात खिशात मावेल इतका करण्याची संधी अमेरिकेआधी जपानी कंपन्यांनी साधली, ती कशी?

जपानचे चिपनिर्मिती व एकंदरीतच इलेक्ट्रॉनिक उपकरणनिर्मिती क्षेत्रातील पदार्पण जरी अमेरिकेच्या जपानसाठी अनुकूल ठरलेल्या परराष्ट्र धोरणांमुळे झालं असलं तरी पुढल्या किमान दोन दशकांतली जपानी कंपन्यांची या क्षेत्रातील घोडदौड व काही प्रमाणातली मक्तेदारी याचं बरंचसं श्रेय हे नि:संशयपणे जपानने शासकीय स्तरावर राबवलेली धोरणं, त्यांचा फायदा घेऊन जपानी कंपन्यांनी निर्मिलेली नावीन्यपूर्ण उत्पादनं यांना द्यावंच लागेल.

इथे एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की रशियाप्रमाणे जपाननं अमेरिकेकडून मिळवलेल्या सेमीकंडक्टर तंत्रज्ञानाची केवळ हुबेहूब नक्कल करण्यात समाधान मानलं नाही. कोणत्याही वस्तूच्या उत्पादन प्रक्रियेत जपानी कंपन्यांची कार्यक्षमता निर्विवादपणे अव्वल दर्जाची होती. जोडीला त्या काळात अमेरिकेच्या तुलनेत जपानी कर्मचाऱ्यांचं वेतन पुष्कळ कमी होतं. दुसऱ्या बाजूला जपानी कंपन्यांना चिपची संरचना तसेच निर्मितीचे परवाने (लायसन्स) अमेरिकी संशोधन संस्था किंवा कंपन्यांकडून (पैशांच्या मोबदल्यात) सहजपणे प्राप्त होत होते. चिपच्या क्षमता दिवसेंदिवस वृद्धिंगत होत चालल्या होत्या तर त्याच वेळेला चिपचा आकार आणि किंमतही कमी होत होती. या सर्व अनुकूल घटकांचा यथायोग्य वापर करून जपानी कंपन्यांनी आपली ऊर्जा चिपचा अंतर्भाव असलेल्या अशा नवनवीन ग्राहकाभिमुख इलेक्ट्रॉनिक उपकरणांची निर्मिती करण्यात खर्च केली.

हेही वाचा >>> समोरच्या बाकावरून : देशात गरीब आहेत? अरेच्या, कुठे आहेत?

जपानी इलेक्ट्रॉनिक उत्पादनं नावीन्यपूर्ण आणि अव्वल गुणवत्तेची होतीच; पण ती हाताळायला सोपी आणि ग्राहकांच्या खिशाला परवडणारी असतील याचीही काळजी घेण्यात आली होती. सोनी कंपनीनं सत्तरच्या दशकात सर्वप्रथम बाजारात आणलेले ‘वॉक-मन’ हे उपकरण याचं सर्वोत्तम उदाहरण ठरावं. वॉक-मनच्या आधी कितीतरी वर्षे विविध कंपन्यांचे कॅसेट प्लेयर बाजारात उपलब्ध होते. पण वॉक-मनचे वैशिष्ट्य म्हणजे त्याने एका अचल स्वरूपातील उपकरणाला आटोपशीर (कॉम्पॅक्ट या अर्थी), कोठेही जाताना जवळ बाळगायला सोप्या अशा ‘हॅण्डहेल्ड’ उपकरणाचे स्वरूप दिले. संगीत क्षेत्राचं डिजिटल परिवर्तन होण्याआधी (म्हणजेच विसाव्या शतकाच्या अंतापर्यंत), विशेषत: प्रवास करणाऱ्या सामान्य माणसाला संगीत ऐकण्यासाठी वॉक-मन हेच सर्वात लोकप्रिय उत्पादन होतं.

इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात जपाननं घेतलेली आघाडी हा आपल्या उत्पादनांच्या क्षमतांची पूर्ण जाणीव, बाजारपेठेचा तसंच ग्राहकांच्या आवडीनिवडींचा सखोल अभ्यास आणि जलद निर्णय घेऊन ते मार्गी लावण्याची शिस्त या सर्वांचा परिपाक होता. चिपनिर्मिती उद्याोगाची पायाभरणी अमेरिकेत होऊनही जपाननं इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात मारलेली मुसंडी (ज्या क्षेत्रातील प्रत्येक उपकरणाचं परिचालन चिपमुळेच होत असतं) नीट समजून घेण्यासाठी अमेरिकी उद्याोगासाठी हुकलेल्या पण जपानी इलेक्ट्रॉनिक क्षेत्रासाठी सुवर्णसंधी ठरलेल्या अशा एका उपकरण निर्मितीच्या प्रकल्पाचं विश्लेषण करावं लागेल.

चिपनिर्मिती आणि इलेक्ट्रॉनिक क्षेत्रांमध्ये १९६०- ७०च्या दशकांत एक तर प्रचंड मोठ्या प्रमाणात उलथापालथ होत होती. कंपन्यांमधली स्पर्धाही एवढी तीव्र होती की संशोधन किंवा उत्पादनासंदर्भातील थोडीशी दिरंगाईदेखील एखाद्या कंपनीला त्या स्पर्धेबाहेर फेकायला पुरेशी होती. त्या काळात संगणक हे केवळ विद्यापीठांतील प्रयोगशाळांमध्ये किंवा फारच थोड्या खासगी संस्थांमध्ये उपलब्ध असत. पर्सनल कॉम्प्युटरचं (पीसी) युग तोवर अवतरायचं असल्याने संगणक सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर होता. त्यामुळे रोजच्या व्यवहारातील गणनक्रियांसाठी, मोजमाप करण्यासाठी किंवा हिशेब ठेवण्यासाठी लोकांना पेन्सिल-पेपर, फूटपट्टी किंवा लॉग टेबल आदी किचकट, वेळकाढू साधनांचाच वापर करावा लागे. निर्वात नलिकांचा वापर करून इंग्लड, इटली किंवा अमेरिकेतील कंपन्यांनी कॅल्क्युलेटर बनवले होते, पण ते आकाराने बोजड स्वरूपाचे, देखभालीस खर्चीक आणि भरपूर ऊर्जा खाणारे असल्यानं फारसे लोकप्रिय झाले नाहीत.

हेही वाचा >>> चाँदनी चौकातून…: आघाड्यांचे शिल्पकार कोण?

साठच्या दशकाच्या पूर्वार्धात जेव्हा टेक्सास इन्स्ट्रुमेंट्स (टीआय) ही चिपनिर्मिती क्षेत्रातील अग्रणी कंपनी होती आणि अमेरिकी संरक्षण खात्यास आवश्यक असणाऱ्या जवळपास सर्व प्रकारच्या चिपचं उत्पादन करत होती, तेव्हा तिच्या तत्कालीन प्रमुख पॅट हॅगार्टीच्या डोक्यात एक कल्पना आली. सेमीकंडक्टर चिपचा वापर करून एक छोट्या आकाराचे, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार अशा मूलभूत गणनक्रिया करू शकणारे, कमी ऊर्जा खाणारे आणि सहज कुठेही नेता येण्यासारखे असे ‘पॉकेट कॅल्क्युलेटर’ बनवता येऊ शकेल, असं त्याला खात्रीनं वाटत होतं. ही कल्पना अमलात आणण्यासाठी त्यानं आपला सगळ्यात जवळचा सहकारी व इंटिग्रेटेड सर्किट अर्थात चिपचा उद्गाता जॅक किल्बीला पाचारण केलं.

ते साल होतं १९६७! किल्बीने लगेच या प्रकल्पावर काम सुरू करून, चिप-आधारित कॅल्क्युलेटरच्या संरचनेचा विस्तृत आराखडा बनवायला सुरुवात केली. काही आठवड्यांच्या आतच किल्बी व त्याच्या चमूनं पॉकेट कॅल्क्युलेटरचं संकल्पनाचित्र बनवून तयार केलं. पण या संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी त्यांना कंपनीच्या विपणन (मार्केटिंग) विभागाकडून मंजुरीची मोहोर मिळवणं अत्यावश्यक होतं. टीआयसाठी हे नवीन उत्पादन असल्यामुळे संभाव्य बाजारपेठीय गरजेचा अभ्यास करून त्यानुसार त्याच्या घाऊक उत्पादनातून मिळू शकणाऱ्या नफा-तोट्याच्या गणिताची पडताळणी करण्याची जबाबदारी विपणन विभागाकडे होती.

आणि इथेच माशी शिंकली. विपणन विभागप्रमुखाला या संकल्पनेत काही फार दम वाटला नाही. ‘विश्लेषणानुसार या उत्पादनाला विशेष ग्राहकवर्ग लाभणार नाही, सबब आपल्या कारखान्यांची क्षमता पॉकेट कॅल्क्युलेटरच्या उत्पादनासाठी वापरणे योग्य ठरणार नाही’- या शब्दांत त्यांनी या प्रस्तावावर लाल फुली मारली. त्याकाळात टीआयकडे अमेरिकी संरक्षण खात्याकडून चिपची मागणी एवढी भरमसाट प्रमाणात होत होती की आधीच कंपनीकडे उपलब्ध असलेली उत्पादनक्षमता पुरी पडत नव्हती. ती वाढवण्याकडे लक्ष केंद्रित करण्याऐवजी या नव्या उत्पादनाच्या मृगजळामागे धावण्यात काही हशील नाही असं कंपनीच्या सर्व विभागांचं मत पडलं. हॅगार्टीनंही पुढे मग या संकल्पनेचा फारसा पाठपुरावा केला नाही. टीआयकडून पॉकेट कॅल्क्युलेटर निर्मितीचा प्रकल्प थंड बस्त्यात टाकण्यात आला.

हॅगार्टीप्रमाणेच जपानी कंपन्यांनादेखील तत्कालीन कॅल्क्युलेटरच्या मर्यादांची जाणीव होतीच. यात आघाडी घेतली ‘शार्प कॉर्पोरेशन’ या ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक उपकरणांची निर्मिती करणाऱ्या कंपनीनं! भारतात आजही शार्पनिर्मित टेलिव्हिजन, एअर कंडिशनरसारख्या उत्पादनांना मागणी आहे. कॅल्क्युलेटर निर्मितीच्या प्रस्तावावर निर्णय घेताना शार्पच्या नेतृत्वाने असा विचार केला की जर सेमीकंडक्टर चिपचा वापर करून छोट्या आकाराचा आणि ग्राहकाच्या खिशाला परवडेल असा कॅल्क्युलेटर बनवता आला तर केवळ जपानचीच नव्हे तर जगभरातील बाजारपेठ आपल्याला काबीज करता येईल, तसंच कमी किमतीमुळे अगदी विद्यार्थ्यांपासून व्यावसायिक आस्थापनांपर्यंत याचा ग्राहकवर्गही तयार होईल.

शार्पचा हा निर्णय किती दूरदृष्टीचा होता हे समजायला फार काळ जावा लागला नाही. १९७० साल संपता संपता शार्पनं ‘क्यू टी- ८बी मायक्रो कॉम्पेट’ नावाचा, सेमीकंडक्टर चिपच्या आधारे गणनक्रिया करू शकणारा, बॅटरीवर चालणारा असा जगातला पहिला ‘हॅण्डहेल्ड पॉकेट कॅल्क्युलेटर’ बाजारात आणला. गंमत म्हणजे यात वापरलेल्या चिपची निर्मिती ही रॉकवेल ऑटोमेशन या अमेरिकी चिपउत्पादक कंपनीनं केली होती. शार्पचा पॉकेट कॅल्क्युलेटर अल्पावधीतच इतका लोकप्रिय झाला की शार्पला त्याची उत्पादन क्षमता अपुरी पडू लागली. पुढे एक दोन वर्षांतच कॅनन, निपॉन, हिताची, तोशिबा, कॅसिओ, सोनी, सॅन्यो अशा जपानी कंपन्या कॅल्क्युलेटर निर्मितीक्षेत्रात उतरल्या आणि ७०च्या दशकाच्या अंतापर्यंत ‘पॉकेट कॅल्क्युलेटर’ ही जपानी कंपन्यांची मक्तेदारी बनली, ती पुष्कळ प्रमाणात आजही टिकून आहे.

‘शार्प’चं यश पाहून ‘टीआय’ला आपल्या हुकलेल्या संधीची प्रकर्षानं जाणीव झाली. १९७२-७३ मध्ये टीआयनंदेखील या क्षेत्रात पाऊल ठेवण्याचा निर्णय घेतला आणि ‘टीआय- २५०० डेटामॅथ’ नावाचा कॅल्क्युलेटर बाजारात आणला. याला, तसंच पुढं १९७७ मध्ये याची सुधारित आवृत्ती असलेल्या ‘टीआय-३०’ला मर्यादित प्रमाणातच यश मिळालं. जपानचा इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील रेटा एवढा जोरदार होता की पॉकेट कॅल्क्युलेटरच्या संदर्भात तरी जपानी कंपन्यांसमोर टीआय किंवा इतर कोणत्याही अमेरिकी-युरोपीय कंपन्यांचा विशेष प्रभाव पडू शकला नाही. ‘संधी दार ठोठावत असताना तिच्याकडे पाठ फिरवल्यानं ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक उपकरण निर्मिती क्षेत्रात टीआय कधीही हिताची किंवा सोनीची जागाघेऊ शकली नाही,’- हे पुढल्या काळातलं हॅगार्टीचं विधान या ‘केस-स्टडी’चा सारांश सांगणारंच आहे!

amrutaunshu@gmail.com