आकाराने दक्षिण अमेरिकेत ब्राझीलपाठोपाठ दुसऱ्या मोठय़ा क्रमांकाचा आणि बऱ्यापैकी मोठी अर्थव्यवस्था असलेला अर्जेटिना गेल्या काही दिवसांमध्ये माध्यमे आणि विश्लेषकांच्या चर्चेमध्ये झळकत आहे. निमित्त आहे तेथील अध्यक्षीय निवडणुकीचे. काही आठवडय़ांपूर्वीच्या निर्धारित अध्यक्षीय निवडणुकीत कोणत्याच उमेदवाराला निर्णायक बहुमत न मिळाल्यामुळे फेरमतदान घेण्यात आले. यात हावियेर मिलेई हे ५४ टक्के मते मिळवून विजयी ठरले. त्यांच्यासमोर विरोधी उमेदवार म्हणून सर्गियो मासा हे विद्यमान सरकारमधील अर्थमंत्री होते. ४६ टक्के मते मिळाल्यामुळे मासा यांनी पराभव मान्य केला. मूळ अध्यक्षीय निवडणुकीत विलक्षण चुरस दिसून आली होती. फेरमतदानाच्या आधी घेण्यात आलेल्या जनमत चाचणीतही मिलेई यांना किरकोळ आघाडीच मिळाल्याचे आढळून आले होते. या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष फेरमतदानात दोन्ही उमेदवारांना मिळालेल्या पसंतीमधील तफावत ११ टक्के इतकी मोठी दिसून आली, जी केवळ विद्यमान सत्ताधीशांसाठीच नव्हे, तर राजकीय विश्लेषकांसाठीही धक्कादायक ठरली. मिलेई हे मुळात राजकारणातच नवखे आहेत. ते अर्थतज्ज्ञ आणि चित्रवाणी सादरकर्ते म्हणून परिचित होते. त्यांना राज्यकारभाराचा कोणताही अनुभव नाही. तरीदेखील अर्जेटिनाच्या जनतेने त्यांना थेट अध्यक्षपदावर बसवले, हे कसे? याचे एक उत्तर अर्जेटिनाच्या सध्याच्या आर्थिक परिस्थितीमध्ये मिळू शकते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा