कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ‘नंदिनी’ विरुद्ध ‘अमूल’ अशा लढाईने वेगळेच वळण घेतले आहे. नंदिनी हा कर्नाटकमधील दूध महासंघाचा, तर अमूल हा गुजरात सहकारी दूध खरेदी विक्री संघाचा ब्रॅण्ड. अमूलने ५ एप्रिल रोजी एका जाहिरातीतून, बेंगळूरुमध्ये अमूल दूध उपलब्ध होणार असल्याची घोषणा केली आणि त्याला जनता दल (सेक्युलर)चे नेते एच. डी. देवेगौडा व विरोधी पक्षनेते सिद्दरामय्या यांनी थेट विरोध करून हा निवडणुकीचा मुद्दा बनवला. त्याची परिणती कर्नाटकमधील हॉटेल व्यावसायिकांच्या संघटनेने अमूलवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात झाली. देशातल्या अगदी मोजक्या राज्यांत सरकारतर्फे दूध उत्पादकांना प्रति लिटर काही रक्कम अनुदान म्हणून देण्यात येते. कर्नाटक, गुजरात आणि राजस्थान ही असे अनुदान देणारी राज्ये. अमूलने कर्नाटकच्या बाजारपेठेत यापूर्वीच प्रवेश केला असला तरी अमूलला दूध विक्रीपेक्षा दुग्धजन्य पदार्थाच्या विक्रीत नेहमीच अधिक रस राहिला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा