तृतीयपंथीयांना पोलीस भरतीमध्ये आरक्षण देण्याचा कर्नाटक सरकारचा निर्णय स्वागतार्ह आणि अनुकरणीय आहे. देशातील सगळय़ाच राज्यांनी तृतीयपंथीयांसाठी पुढाकार घेऊन, त्यांचे हलाखीचे जगणे दूर होऊन माणूस म्हणून जगण्याचा त्यांचा हक्क त्यांना मिळवून देण्यासाठी निर्णय घ्यायला हवेत. कर्नाटकातील राज्य सशस्त्र दलांमध्ये पोलीस हवालदाराच्या साडेतीन हजार पदांच्या भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून प्रथमच तृतीयपंथीयांसाठी ७९ पदे आरक्षित करण्यात आली आहेत. मात्र, असे करताना कर्नाटक सरकारने ‘पुरुष तृतीयपंथीय’ असा उल्लेख केल्यामुळे त्याबद्दल या प्रश्नावर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. असा कोणताही समुदाय नसून सरकारने त्याबाबत संभ्रम निर्माण केल्याचेही या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. मुळात भारतातील तृतीयपंथीयांची तपशीलवार माहिती अद्याप गोळा होऊ शकलेली नाही. केवळ ४८ लाख तृतीयपंथी असल्याची माहिती २०११ मध्ये जनगणनेद्वारे गोळा करण्यात आली होती. तरीही ती अपुरी असावी. केंद्र सरकारने तृतीयपंथीयांसाठी विशेष स्वच्छतागृहे तयार करण्याची केलेली सूचनाही फार मोठय़ा प्रमाणात स्वीकारली गेली नाही.
अन्वयार्थ : तृतीयपंथीयांच्या स्वाभिमानासाठी..
समाजातील अशा व्यक्तींसाठी केवळ सहानुभूती आणि करुणा असण्यापेक्षा त्यांना अधिकार मिळणे हे अधिक महत्त्वाचे असायला हवे.
Written by लोकसत्ता टीम
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 16-09-2022 at 02:42 IST
मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Karnataka government announces reservation for transgenders in police zws