कर्नाटकातील काँग्रेस सरकारने तेथील खासगी आस्थापनांमध्ये स्थानिक नागरिकांसाठी व्यवस्थापन पातळीवरील नोकऱ्यांमध्ये ५० टक्के तर अन्य नोकऱ्यांमध्ये ७५ टक्के आरक्षण ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कर्नाटक मंत्रिमंडळाने या कायद्याच्या मसुद्याला मान्यता दिली असून, सध्या सुरू असलेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनात तो मंजूर करण्यात येणार आहे. कर्नाटक, तमिळनाडू, आंध्र प्रदेश या दक्षिणेकडील राज्यांचे एक वैशिष्ट म्हणजे एरवी राजकीय पक्ष परस्परांच्या विरोधात टोकाची भूमिका घेतील पण प्रादेशिक अस्मितेचा प्रश्न असो वा कावेरीच्या पाण्याचा, सगळे मतभेद विसरून ते राज्यासाठी एकत्र येताना दिसतात. या आधी हरयाणा, झारखंड आणि आंध्र प्रदेश या राज्यांनी अशाच प्रकारे खासगी नोकऱ्यांमध्ये स्थानिकांसाठी आरक्षण लागू करण्याचा निर्णय घेतला होता. हरयाणा सरकारने खासगी नोकऱ्यांमध्ये स्थानिकांसाठी ७५ टक्के आरक्षण ठेवण्याचा कायदाच केला होता. हरयाणामधील स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात म्हणून हा कायदा करण्यात आला होता. पण पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाने खासगी नोकऱ्यांमध्ये आरक्षण लागू करण्याचा कायदा घटनेतील समानतेच्या तरतुदीच्या विरोधात असल्याने रद्दबातल ठरविला. आंध्र प्रदेश सरकारचा कायदा हा घटनेच्या तरतुदींच्या विरोधात असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले होते. हरयाणा सरकारने केलेला खासगी नोकऱ्यांमध्ये आरक्षण लागू करण्याचा कायदा न्यायालयात कायद्याच्या कसोटीवर टिकला नव्हता तरीही कर्नाटक सरकारने हे पाऊल उचलले आहे. पुढच्याला ठेच लागूनही कर्नाटक सरकारने त्याचा धडा घेतलेला दिसत नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा