केशव उपाध्ये -मुख्य प्रवक्ते,  महाराष्ट्र प्रदेश भाजप

मोदींच्या विवाहाचा अवमानास्पद उल्लेख लालूप्रसाद यादव यांनी करण्यातून लालूंची जी वृत्ती दिसते, ती भ्रष्टाचाराच्याच संस्कृतीला पोसणारी असल्याचे पुरावे आता सीबीआय व ईडीच्या तपासातून कसे बाहेर येत आहेत, याची यादीच देणारे टिपण…

Ajit Pawar And Amol Mitkari.
Ajit Pawar : “…तर सरकारलाही अर्थ नाही”, अजित पवार आणि अर्थ खात्यावरून अमोल मिटकरींचा महायुतीलाच टोला
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
State Congress president Nana Patole demanded those who desecrate constitution should punished
“संविधानाची विटंबना करण्याचे धाडस होतेच कसे,” नाना पटोले यांची टीका; म्हणाले…
Nana Patole
Nana Patole : “आमचे सर्व खासदार…”, महाराष्ट्रात ‘ऑपरेशन लोटस’च्या चर्चांवर नाना पटोलेंची प्रतिक्रिया
Rahul Gandhi Protest against modi shah
मोदी-अदाणीविरोधात काँग्रेस आक्रमक; राहुल गांधींच्या अनोख्य आंदोलनाने वेधले लक्ष
Rahul Narvekar
Rahul Narvekar : शिवसेना, राष्ट्रवादी व्हाया भाजपा, सर्वात कमी वयाचे विधानसभाध्यक्ष; राहुल नार्वेकरांची राजकीय कारकीर्द कशी आहे?
Jayant Patil, Islampur Jayant Patil, Jayant Patil Sharad Pawar Group, Jayant Patil latest news,
राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्यासमोर मतदारसंघात कडवे आव्हान
ravi rana resign
अमरावती : नवनीत राणा म्‍हणतात, “…तर रवी राणा देखील राजीनामा देतील”

लोकसभा निवडणूक मुहूर्त काही घटिकांवर येऊन ठेपला आहे. मुरलेल्या राजकारण्यांना निवडणुकीत काय होऊ शकते याचा अंदाज येत असतो. जाहीर सभा, पक्षाचे मेळावे व अन्य सार्वजनिक ठिकाणी वावरताना सामान्य माणसाच्या वागण्या-बोलण्यातून वारे कुठे वाहत आहेत याची पुसटशी कल्पना राजकारणात अनेक वर्षे घालवल्यावर येते. भले ही मंडळी आपल्या संघटनेचे मनोबल वाढविण्यासाठी ‘आपलाच पक्ष जिंकणार’ असे म्हणत असली तरी आपली डाळ या वेळी शिजणार नाही याची मनोमन कल्पना या मुरब्बी नेते मंडळींना आलेली असते. प्रतिस्पर्ध्याचा विजय होणार हे एकदा ठाऊक झाल्यावर मतदान ते प्रत्यक्ष निकालापर्यंतचा कालावधी यादरम्यान परिस्थितीला कसे सामोरे जायचे, निवडणुकीच्या प्रचारात कोणती रणनीती अवलंबायची, जनमताच्या कलाचा अंदाज शांतपणे स्वीकारून त्यापुढील लढाईच्या तयारीला लागायचे की तो कल न पचवता आल्याने असभ्य भाषेचा आधार घेत प्रतिस्पर्ध्यावर राळ उडवायची आणि त्यातून मानसिक समाधान मानायचे हा ज्याच्या त्याच्या वृत्तीचा भाग असतो.

हेही वाचा >>> लालकिल्ला : महायुतीची भाजपला डोकेदुखीच फार!

समाजवादी परंपरेतील एक ज्येष्ठ नेते लालूप्रसाद यादव यांनी अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कुटुंब, मोदी यांचा विवाह या अनुषंगाने असभ्य भाषेचा आधार घेत टिप्पणी केली. काँग्रेसचे युवराज राहुल गांधी यांनी त्यापेक्षाही खालच्या पातळीला जात मुक्ताफळे उधळली. ‘‘रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात अभिनेत्री ऐश्वर्या राय हिच्यासारख्या ‘नाचणारी’ला नरेंद्र मोदींनी बोलावले पण गोरगरिबांना, दलितांना बोलावले नाही’’, अशी राहुल गांधी यांची टिप्पणी होती. वास्तविक ऐश्वर्या राय त्या सोहळ्याला उपस्थित नव्हती. तिचा पती अभिषेक आणि सासरे अमिताभ बच्चन हे त्या सोहळ्याला उपस्थित होते. आपल्या भारत जोडो यात्रेत राहुल गांधींनी किमान चार वेळेला ऐश्वर्या राय हिचा उल्लेख ‘ती नाचणारी’ अशा अत्यंत अपमानास्पद स्वरात केला. नरेंद्र मोदी, भारतीय जनता पार्टी यांच्यावर टीका करणे राहुल गांधींचा घटनादत्त अधिकार आहे. पण नरेंद्र मोदींवर टीका करण्याच्या नादात ऐश्वर्या राय हिच्याबाबत सातत्याने ‘ती नाचणारी’ असा उल्लेख करून राहुल गांधी यांनी पराभवाच्या खात्रीने आपली बौद्धिक पातळी किती घसरू शकते, याचा प्रत्यय आणून दिला. लालूप्रसाद यादव यांनी नरेंद्र मोदींवर टीका करताना, ‘त्यांना कुठं कुटुंब आहे?,’ असं म्हणत मोदींच्या विवाहासंदर्भात कमालीची अभद्र भाषा वापरली. ‘नरेंद्र मोदींना कुठं कुटुंब आहे’ असे विचारताना आपल्या भल्या मोठ्या कुटुंबावर अनेक गैरव्यवहारांचे आरोप आहेत आणि मोदींच्या कुटुंबीयांवर एकही डाग नाही याचा लालूंना विसर पडला. गेल्या १० वर्षांत नरेंद्र मोदी यांनी आपल्या वयोवृद्ध आईला फक्त एक दिवस पंतप्रधानांच्या निवासस्थानात नेले होते. याखेरीज नरेंद्र मोदींच्या कुटुंबीयांपैकी एकही सदस्य गेल्या १० वर्षांत पंतप्रधानांच्या निवासस्थानी गेला नाही. आपले भाऊ, बहीण यांना सत्तेच्या वर्तुळापासून कटाक्षाने दूर ठेवणारे नरेंद्र मोदी एकीकडे आणि रेल्वेच्या नोकरीच्या बदल्यात कवडीमोलात जमिनी घेतल्याचा आरोप असलेले राबडीदेवी यादव, रागिणी यादव, हेमा यादव, तेजस्वी यादव दुसरीकडे, असा हा मामला आहे.

सोनिया गांधींच्या अप्रत्यक्ष पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात २००४ ते २०१४ या दहा वर्षांत त्यांचे जावई रॉबर्ट वढेरा यांना हरियाणा आणि अन्य ठिकाणी सरकारी कृपेने मिळालेल्या जमिनींच्या नजराण्याची कहाणी नव्याने सांगण्याची गरज नाही. ‘मेव्हणे मेव्हणे, मेव्हण्यांचे पाव्हणे’ असे म्हणत वढेरा यांच्यावर सरकारी कृपा करणे असाच कुटुंबाचा अर्थ असतो हे लालूंनीही दाखवले आहे.

हेही वाचा >>> अन्वयार्थ : ‘नोटा’ला वैधतेची धार हवीच..

लालू केंद्रीय रेल्वेमंत्री असताना (मे २००४ ते मे २००९) त्यांनी रेल्वेमध्ये नोकरी लावून देण्याच्या बदल्यात भूखंड स्वीकारले, असा आरोप सीबीआयकडून मार्च २०२३ पासून ठेवण्यात आला आहे. सीबीआयच्या माहितीनुसार, लालूप्रसाद रेल्वेमंत्री असताना पाटण्यातील १२ लोकांना रेल्वेच्या गट ‘ड’ पदांवर नियुक्ती देण्यात आली होती. या नियुक्त्यांच्या बदल्यात लालूप्रसाद कुटुंबीयांना पाटणा आणि आसपासच्या परिसरातील सात भूखंड अतिशय कमी दरात मिळाले. हे भूखंड ज्या १२ लोकांना रेल्वेत नोकरी मिळाली त्यांच्या कुटुंबांचे होते, अशी माहिती सीबीआयने दिली आहे. सीबीआयने असाही आरोप केला आहे की, लालूप्रसाद यांना या काळात एक लाख चौरस फुटांची जमीन केवळ २६ लाखांत मिळाली. त्यावेळच्या बाजारभावानुसार या जमिनीचे एकत्रित मूल्य हे ४.३९ कोटींहून अधिक असल्याचे सांगितले जाते. या सात भूखंडांच्या विक्री करारानुसार तीन भूखंड राबडीदेवींच्या नावे आहेत, तर एक मिसा भारती, एका भूखंडाचा करार मे. एके इन्फोसिस्टीम्सच्या नावाने आहे. या कंपनीचे बहुसंख्य शेअर्स राबडीदेवी यांनी २०१४ मध्ये विकत घेतले आहेत. तर दोन भूखंड हेमा यादव यांना भेट म्हणून दिलेले आहेत. सीबीआयने दाखल केलेल्या तक्रारीमध्ये १६ लोकांना आरोपी करण्यात आले आहे. लालूप्रसाद यादव, त्यांचे कुटुंबीय आणि ज्या १२ जणांना मुंबई, जबलपूर, कोलकाता, जयपूर आणि हाजीपूर या रेल्वे झोनमध्ये नोकऱ्या मिळाल्या त्यांनाही आरोपी करण्यात आले आहे. सीबीआयने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, रेल्वेमध्ये पर्यायी जागा म्हणून या उमेदवारांना भरती केले गेले. आश्चर्य म्हणजे उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाल्यानंतर तीन दिवसांच्या आत सर्व प्रक्रिया पार पडली आणि त्यांची नेमणूकही झाली. रेल्वेच्या पश्चिम मध्य झोनमध्ये जबलपूर आणि पश्चिम झोनमध्ये मुंबई या ठिकाणी अर्जदारांचा पत्ता उपलब्ध नसतानाही अर्जदारांचा अर्ज स्वीकारून त्यांना नियुक्त केले गेले.

सीबीआयने भ्रष्टाचाराचा खटला दाखल करताच लालूप्रसाद आणि कुटुंबीयांशी संबंधित १६ ठिकाणांवर छापे टाकले. रागिणी यादवसह लालू यांच्या दोन्ही मुलींच्या घरी ७० लाख रुपये रोकड आणि सोने मिळाले. दिल्लीतल्या न्यू फ्रेंड्स कॉलनी येथे डी-१०८८ हा चार मजली बंगला आहे. तो एबी एक्स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या नावे आहे. या कंपनीची मालकी आणि ताबा तेजस्वी प्रसाद यादव आणि त्यांच्या परिवाराकडे आहे. ही मालमत्ता केवळ चार लाख रुपयांत घेतल्याचे दाखवण्यात आलेले आहे. ज्याचा आजचा बाजारभाव १५० कोटी रुपये इतका आहे. ही मालमत्ता खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर रोकड आणि गैरमार्गाने जमवलेल्या संपत्तीचा वापर केला गेला असल्याचे सांगण्यात येत आहे.

ईडीने लालूप्रसाद यांच्याशी संबंधित तब्बल २४ ठिकाणी तपासणी केली आहे. यामध्ये १ कोटी रुपयांची बेहिशेबी संपत्ती, १९०० अमेरिकी डॉलरसह परदेशी नाणी, ५४० ग्रॅम सोन्याची बिस्किटे आणि दीड किलोपेक्षा अधिक सोन्याचे अलंकार जप्त करण्यात आलेले आहेत. पाटण्यातील अनेक रहिवाशांनी किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांमार्फत लालूप्रसाद यांच्या कुटुंबीयांच्या नावे आणि माजी मुख्यमंत्री आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या नियंत्रणाखाली असलेल्या एका खासगी कंपनीच्या नावे राज्याच्या राजधानीतील त्यांच्या जमिनी विकल्या किंवा भेट दिल्याचा आरोप आहे. या बदल्यात त्या राबडीदेवी आणि मुली मिसा भारती आणि हेमा यादव यांच्या नावावर करण्यात आल्याचा आरोप आहे.

सत्ता असताना कुटुंबीयांना सरकारी कृपेने मालामाल करणारे लालूप्रसाद, सोनिया गांधी एकीकडे आणि दुसरीकडे आपल्या भाऊ, बहिणींना आणि अन्य नातलगांना सत्तेच्या वर्तुळापासून कटाक्षाने दूर ठेवणारे नरेंद्र मोदी हा दोन संस्कृतींमधील फरक आहे. म्हणूनच मोदी म्हणतात, ‘मेरा भारत, मेरा परिवार.’ समस्त देश त्यांच्या संस्कृतीचा अनुभव घेतो आहे.

Story img Loader