‘टाटा लिटफेस्ट’ हा गेली १३ वर्षं मुंबईच्या ‘एनसीपीए’मध्ये (अर्थात राष्ट्रीय संगीत नाट्य केंद्रात) वाढत गेलेला साहित्योत्सव. दिवंगत लेखक अनिल धारकर यांच्या जिद्दीतून हा ‘लिटफेस्ट’ सुरू झाला आणि वाढू लागला. जयपूर लिटफेस्टसारखं टुरिस्ट आकर्षण किंवा इव्हेन्ट-वलय मुंबईच्या या लिटफेस्टला नसूनही त्यानं हातपाय रोवले आणि गेल्या काही वर्षांत तर महत्त्वाच्या उद्योगसमूहाचं प्रायोजकत्वही मिळवलं. यंदाचा ‘टाटा लिटफेस्ट’ ऑनलाइन स्वरूपात तर २५ ऑक्टोबरपासूनच सुरू झाला आणि सलमान रश्दी, एलीफ शफाक यांच्या झालेल्या मुलाखतींचं ध्वनिचित्रमुद्रण आता पाहाता येईल. रश्दी यांच्या मुलाखतीत ‘लेखक मिथकं बनवतोच, पण या मिथकीकरणाची सुरुवात स्वत:पासून होते’ असं (कबुलीवजा?) वाक्य आहे. मात्र शुक्रवारी, २७ ऑक्टोबरपासून हा लिटफेस्ट प्रत्यक्ष स्वरूपातही सुरू झाला. पहिला दिवस शशी थरूर यांचा होता. उद्घाटनपर भाषण त्यांनी दुपारी केलं आणि संध्याकाळी कृत्रिम बुद्धिमत्तेचा – ‘एआय’चा – साहित्य व्यवहारावर होऊ शकणारा परिणाम काय, याबद्दलच्या परिसंवादातही भाग घेतला. शनिवार आणि रविवार (२८, २९ ऑक्टोबर) हे मुंबईच्या या लिटफेस्टचे अधिक गजबजलेले दिवस असणार आहेत. एकट्या एनसीपीएमध्येच या दोन दिवसांत ३३ निरनिराळे कार्यक्रम ‘लिटफेस्ट’चा भाग म्हणून होत असतील, तेव्हा कुठं जाऊ आणि कुठं नको असं होऊ नये, म्हणून ही ठळक वैशिष्ट्यांची बुकबातमी.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा