अतुल सुलाखे

ज़ें ज़ें आचरितो श्रेष्ठ तें तें चि दुसरे जन

Prahlad Joshi statement that the plan of Congress in Karnataka is on the verge of closure Kolhapur news
काँग्रेसच्या कर्नाटकातील योजना बंद पडण्याच्या मार्गावर; प्रल्हाद जोशी
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Soybean Price, Vidarbha, Ladki Bahin Yojana,
विरोधकांचे ‘सोयाबीन अस्त्र’ ‘लाडक्या बहीण’चा प्रभाव रोखणार ?
Jaipur railway track incident thar stuck in drunken misadventure shocking video goes viral
VIDEO: रील बनवण्यासाठी दारुड्यानं थेट रेल्वे ट्रॅकवर नेली थार; तितक्यात पाठीमागून मालगाडी आली अन्…थरारक शेवट
attention deficit hyperactivity disorder
उनाड मुलेच नव्हे, तर प्रौढांमध्येही जगभर वाढतेय अतिचंचलता? काय आहे ADHD? लक्षणे कोणती? आव्हाने कोणती?
Govt Issues New Rules To Stop Misleading Ads By Coaching classes
विश्लेषण : शिकवणी वर्गांच्या जाहिरातींना चाप?
Bhosari Constituency, Mahesh Landge, Ajit Gavhane,
भोसरीत दुरंगी; पण तुल्यबळ लढत

तो मान्य करितो ज़ें ज़ें लोक च़ालवितात तें

– गीताई ३-२१

सर्वोदयी विकासनीती ही प्राय: भूतकाळात रमणारी, आर्थिकदृष्टय़ा जुनाट आणि विज्ञान तंत्रज्ञानाच्या विरोधात अशी आहे. जगाबरोबर राहायचे आणि बरे जगायचे तर हे तत्त्वज्ञान म्हणजे निव्वळ दारिद्रय़पूजा आहे अशी टोकाची टीका झाली. अगदी आजही होते. सर्वोदयी विकास म्हणजे दारिद्रय़ पूजा आहे की तो समग्र भान ठेवत शाश्वत विकासाचा मार्ग आहे?

विनोबा, बेबंद विकासाच्या विरोधात होते. या देशाला चैनीचे आणि उधळपट्टीचे आयुष्य परवडणार नाही ही त्यांची धारणा अगदी वाईच्या वास्तव्यापासून दिसते. पुढे गीता प्रवचनांच्या निमित्ताने विनोबांनी जे आसुरी संपत्तीचे वर्णन केले आहे ते वैश्विक वर्तमानाला आजही लागू पडते. ही चिंतेची बाब आहे. विनोबा म्हणतात ‘दैवी संपत्ती’चा विकास करावयाचा व आसुरी संपत्तीपासून दूर राहावयाचे. दूर राहण्यासाठी या आसुरी संपत्तीचे वर्णन भगवान करून राहिले आहेत. या आसुरी वर्णनात तीनच मुख्य गोष्टी आहेत. असुरांच्या चरित्राचे सार ‘सत्ता, संस्कृति व संपत्ति’ या तीन वस्तूंत आहे. आपलीच संस्कृती काय ती उत्कृष्ट व तीच साऱ्या जगावर लादली जावी, ही महत्त्वाकांक्षा. आपलीच संस्कृती का लादली जावी? तर ती म्हणे चांगली आहे. ती चांगली का? तर ती आपली आहे म्हणून. आसुरी व्यक्ती काय किंवा अशा व्यक्तींनी बनलेली साम्राज्ये काय, त्यांना या तीन गोष्टी पाहिजे असतात.

ब्राह्मणांना वाटते ना की आपली संस्कृती सर्वश्रेष्ठ. सारे ज्ञान आपल्या वेदात आहे. वैदिक संस्कृतीचा विजय सर्व जगभर व्हावा. ‘अग्रतश्चतुरो वेदान् पृष्ठत: सशरं धनु:’ असे होऊन सर्व पृथ्वीवर आपल्या संस्कृतीचे झेंडे नाचवावेत. परंतु पाठीमागे ‘सशरं धनु:’ असले की पुढच्या बिचाऱ्या वेदांचा निकालच लागतो. मुसलमानांस असेच वाटते की कुराणात जे काही आहे तेवढेच खरे. ख्रिस्ताच्या अनुयायांना तसेच वाटते. इतर धर्मातील मनुष्य कितीही वर गेलेला असो, त्याचा जर ख्रिस्तावर विश्वास नसेल तर त्याला स्वर्ग मिळणार नाही! देवाच्या घराला त्यांनी एकच दरवाजा ठेवला आहे व तो म्हणजे ख्रिस्ताचा! लोक आपल्या घरांना तर खूप दरवाजे व खिडक्या लावतात. परंतु बिचाऱ्या देवाच्या घराला एकच दरवाजा राखतात.’

विनोबांनी केलेल्या दोष दिग्दर्शनाचा आरंभ स्वत:पासून होतो हा त्यांच्या विवेचनाचा विशेष आहे. जे दोष जगात ते प्रथम माझ्यामधे आहेत ही त्यांची धारणा आहे. सुधारणेचा आरंभ स्वत:पासून करायचा. त्या बाबतीत अत्यंत प्रखर राहायचे आणि जगात बदल करताना अंगात सोशिकता आणि नम्रता धारण धरायची ही त्यांची भूमिका आहे. त्यांनी ही जबाबदारी समाजातील धुरीणांवर टाकली आहे.

नवीन समाज घडवायचा तर त्या समाजाची व्यापक जाण हवी. ही जाण गीता प्रवचनांमधे दिसते.

jayjagat24@gmail.com