‘आत्मनिर्भरतेआधीचे आत्मभान’ हा अग्रलेख (१७ फेब्रुवारी) वाचला. बंगळूरू येथील प्रदर्शन ही नव्या व भविष्यातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाची झलक होती, असे म्हणावे लागेल.इंदिरा गांधींनी पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात परदेशस्थ भारतीयांना विशेषत: विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांना भारतात येण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाला होता. पण आता मात्र परिस्थिती बदलली आहे. ग्रामीण भारतातील अनेक तरुण दिल्ली, हैदराबाद, चेन्नई, मुंबई, पुण्यात येऊन शिक्षण घेतात आणि संधी मिळताच सधन देशांत स्थलांतर करतात. शिक्षणासाठी त्यांनी लाखो रुपये खर्च केलेले असतात. त्यामुळे त्यांनी अर्थार्जनाला प्राधान्य देणेही स्वाभाविकच आहे. त्यांनी इथेच राहून त्यांच्या बुद्धिमत्ता आणि कौशल्यांचा लाभ स्वदेशाला मिळवून द्यावा असे वाटत असेल, तर त्यांना योग्य संधी आणि त्यांच्या योग्यतेनुसार वेतन देणे गरजेचे आहे.- सुनील समडोळीकर, कोल्हापूर

सत्ताधाऱ्यांचे उद्योगसमूहांशी संबंध असतातच!
‘मित्राने मित्रासाठी चालवलेले सरकार?’ हा ‘देशकाल’ सदरातील लेख वाचला. हा लेख पूर्णपणे ‘मोदानी’ला वाहिलेला असल्याने खूपच गंमत वाटली. सत्ताधाऱ्यांचे उद्योगसमूहांशी प्रेमाचे नाते असणे भारताला काही नवीन नाही. असे असताना मोदी आणि अदानी यांच्यातील मैत्रीवर एवढी चर्चा का केली जात आहे? केंद्रातील आजवरच्या सर्वच सत्ताधाऱ्यांचे उद्योगपतींशी सुमधुर संबंध होतेच. त्यांची व त्यांच्या नातेवाईकांची झालेली धन, स्विस खातीही जगजाहीर झाली. पंतप्रधान मोदी यांचे कुटुंबीय सर्व प्रकारच्या प्रसिद्धीपासून लांब सर्वसामान्य जीवन जगत आहेत आणि त्यांनी कुठल्याही प्रकारे मोदींच्या स्थानाचा गैरवापर केल्याचे ऐकिवात नाही. अशा फकीर माणसाची उद्योगपती अदानींशी मैत्री असली तरी त्यात वैयक्तिक स्वार्थ नाही.-माया हेमंत भाटकर, चारकोप गाव (मुंबई)

mpsc preparation strategy
MPSC ची तयारी : पर्यावरण भूगोल, अवकाशीय तंत्रज्ञान आणि सुदूर संवेदन    
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
Audit Provisions in the Income Tax Act
प्राप्तिकर कायद्यानुसार लेखापरीक्षण म्हणजे काय? नवीन तरतुदी कुणाला लागू?
beggars Nagpur, beggars luxury bus,
नागपुरात भिकारी गोळा केले… आलिशान गाडीत बसवले आणि थेट…
Support for science and development through two new policies
दोन नव्या धोरणांतून विज्ञानाची साथ आणि विकासाची वाट…
loksatta Girish kuber article about maharashtra losing investment and start up
अन्यथा: घागर उताणी रे…!
order of CIDCO Deputy Registrar to submit Building Hazardous Certificate navi Mumbai
पुनर्विकासातील घोळांना चाप; इमारत धोकादायक प्रमाणपत्र सादर करण्याचे उपनिबंधकांचे आदेश
Addiction, Abuse, Womens Commission, Akola,
“व्यसनाधीनतेतून शोषणासारख्या गैरकृत्यात वाढ,” महिला आयोगाच्या माजी सदस्यांचा निष्कर्ष

जनता दुधखुळी नाही!
‘मित्राने मित्रासाठी चालवलेले सरकार’ हा योगेंद्र यादव यांचा लेख (१७ फेब्रुवारी) वाचला. कोणत्याही पक्षाचे राज्यकर्ते असोत ते जनतेसाठी किती काम करतात आणि मित्र परिवारासहित आपल्या आप्तेष्टांसाठी किती काम करतात, याचा अनुभव जनता पदोपदी घेत आहे. राजकारण हे निस्वार्थीपणे, सेवाभावी वृत्तीने करण्याचे व्रत आहे, ही भावना केव्हाच हद्दपार झाली आहे. राजकारणी, वरिष्ठ नोकरशहा, उद्योगपती यांची घट्ट युती झाली आहे. सेवेत असताना राजकारण्यांची मर्जी राखून काम केले जाते आणि निवृत्तीनंतरची सोय राजकारणी लावून देतात. हा मोह न्यायव्यवस्थेतील देखील काहींना आवरता आला नाही, म्हणून कोणी राज्यसभेत जाते तर कोणी राज्यपाल होते.
राज्यकर्त्यांना, नोकरशहांना हाताशी धरून उद्योगपतीने संपत्ती वाढविल्याचे हे काही एकमेव उदाहरण नाही, मात्र अदानींबाबत ते अधिक तीव्रतेने जनतेसमोर आले आहे. वास्तविक देशाचे प्रमुख म्हणून नरेंद्र मोदी यांनी पुढे येऊन याबाबत भूमिका मांडली असती तर फार चांगले झाले असते, मात्र अडचणीच्या मुद्दय़ांवर मोदी नेहमीच नरो वा कुंजरोवा भूमिका घेतात आणि प्राथमिकता नसलेल्या विषयावर मोठय़ा अभिमानाने बोलतात. गुजरात दंगलीवर प्रकाश टाकणारा माहितीपट प्रसारित झाल्यानंतर लगेचच बीबीसीच्या कार्यालयांचे सर्वेक्षण सुरू झाले. जनता दुधखुळी नक्कीच नाही. मोदी सरकार राजधर्माचे पालन करत आहे का, असा प्रश्न जनतेला पडू लागला आहे. निवडणूक रोख्यांचा लेखाजोखा जनतेसमोर आला, तर अनेक गोष्टी स्पष्ट होतील, पण तसे काही होण्याची शक्यता नाही. –अनंत बोरसे, शहापूर (ठाणे)

हा प्रचाराचा अतिरेक
‘कसब्याची सूत्रे फडणवीसांकडे’ हे वृत्त लोकसत्ता (१७ फेब्रुवारी) वाचले. भाजपने कसब्यातील विधानसभेची पोटनिवडणूक अतिशय गांभीर्याने घेतली आहे, हे सत्यच आहे. उपमुख्यमंत्र्यांनी ही जागा जिंकण्यासाठी कसब पणाला लावले आहे. एकूण ज्या प्रकारे प्रयत्न सुरू आहेत ते पाहता, भाजपला पराभवाची चाहूल लागली असावी, असे दिसते. गिरीश बापट सध्या आजारी आहेत. त्यांना ऑक्सिजनची नळी लावलेल्या अवस्थेत चाकांच्या खुर्चीतून केसरीवाडय़ात मेळावा घेताना पाहून मात्र वाईटच वाटले. बापट कार्यकर्त्यांशी समाजमाध्यमांतून व्हिडीओद्वारे संपर्क साधू शकले असते. आजारी अवस्थेत त्यांना प्रचारासाठी आणणे हा प्रचाराचा अतिरेक तर आहेच, शिवाय असे करणे अविचाराचेसुद्धा वाटते. –प्रशांत कुळकर्णी, कांदिवली (मुंबई)

निवडणुका ‘पाताळा’त घ्याव्या लागतील
प्रकृती खालावली असतानाही गिरीश बापट भाजपच्या प्रचारात सहभागी झाल्याचे वृत्त (लोकसत्ता- १७ फेब्रुवारी) वाचून राजकारण-समाजकारणाची पातळी खालावल्याची जाणीव पुन्हा एकदा झाली. कोविड काळात जनता ऑक्सिजनअभावी तडफडत होती, तेव्हा राज्यांकडून आलेल्या माहितीची दखल न घेता, चौकशी न करता देशात ऑक्सिजनअभावी एकही मृत्यू न झाल्याचे संसदेत सांगितले गेले. आता विधानसभेच्या एका अवघड पोटनिवडणुकीसाठी गंभीर आजारी असलेल्या खासदाराला व्हीलचेअरवरून, ऑक्सिजन सिलेंडर व नाकात नळय़ा लावलेल्या अवस्थेत प्रचारात उतरवले गेले. या घटना सामाजिक-राजकीय स्वास्थ्य ऑक्सिजन सिलेंडरवर असल्याची जाणीव करून देतात. एकुणातच राजकारण व निवडणूक प्रचाराची पातळी (सर्वपक्षीय) इतकी घसरत चालली आहे की लवकरच निवडणुका पाताळात घ्याव्या लागतील, अशी परिस्थिती आहे.- प्रवीण नेरुरकर, माहीम (मुंबई)

इतर कार्यकर्त्यांनी बोध घ्यावा
गंभीर आजाराशी सामना करणाऱ्या गिरीश बापट यांना व्हीलचेअरवरून प्रचारात सहभागी करून घेतल्यामुळे भाजपवर टीका केली जात आहे. यामागे राजकीय स्वार्थ साधणे हा हेतू आहे. कोणत्याही पक्षात किंवा संघटनेत अखेरच्या श्वासापर्यंत पक्षासाठी किंवा संघटनेसाठी स्वत:ला वाहून घेणाऱ्या कार्यकर्ते आणि नेत्यांची उदाहरणे आहेत. इतर कार्यकर्त्यांनी, आरोप-प्रत्यारोप करण्यापेक्षा यातून काही बोध घ्यावा. -मोहन गद्रे, कांदिवली

आम्ही असू लाडके..
‘बंदीच बरी!’ हा अग्रलेख (१६ फेब्रुवारी) वाचला. कोण कुठले बीबीसी? ते विश्वगुरू होऊ पाहणाऱ्यांच्या मार्गात अडथळे आणण्याचे धारिष्टय़ कसे दाखवू शकतात, असा प्रश्न समस्त भक्तगणांस पडल्याने अशा वृत्तसेवेच्या खरे तर मुसक्याच आवळायला हव्यात. केशवसुतांच्या ‘आम्ही कोण?’ या कवितेच्या शब्दांत थोडा बदल करून ‘आम्ही कोण म्हणूनी काय पुससी? आम्ही असू लाडके भक्तांचे, दिधला असे देश आम्हास चालवावया’ असे म्हणावे लागेल. –डॉ. किरण गायतोंडे, चेंबूर (मुंबई)

राजकीय संस्कृती लयाला
‘प्रफुल पटेल-देवेंद्र फडणवीस यांनी परस्परांवर स्तुतिसुमने उधळल्याने तर्कवितर्क’ हे वृत्त (१८ फेब्रुवारी) वाचले. राजकीय पटलावर याकडे कदाचित वेगळय़ा दृष्टिकोनातून पाहिले जाईल. पण सत्ताधारी आणि विरोधकांत जी सुंदोपसुंदी सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर ही घटना नक्कीच वेगळी आहे. एके काळी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात खरोखरच जिव्हाळा होता. विरोध होता तो फक्त तात्त्विक.
वसंतदादा पाटील आणि मधु दंडवते यांची गाढ मैत्री होती. वसंतदादा पाटील यांचे कृषीविषयक आणि सहकार क्षेत्राचे ज्ञान आणि संघटनकौशल्य याविषयी मधु दंडवतेंना आस्था होती, तर दंडवतेंच्या अभ्यासू वृत्तीचे वसंतदादांना कौतुक होते. चंद्रशेखर आणि अटलजी यांचे जवळचे संबंध होते. पंडित नेहरूंनी अटलबिहारी वाजपेयी यांचे अनेदा जाहीर कौतुक केले होते. संसदेतील त्यांच्या भाषणांना नेहरू उत्स्फूर्त दाद देत. नाथ पै, मधु लिमये, डॉ. राम मनोहर लोहिया यांची भाषणे ते लक्षपूर्वक ऐकत. त्यातील मुद्दे नोंदवून ठेवत. महत्त्वाचा पाहुणा भारत भेटीस आल्यावर ते त्याचा परिचय प्रथम विरोधी पक्षनेत्याशी करून देत. राजकीय वातावरण असे होते, कारण तेव्हाचे नेते सुसंस्कृत होते आणि त्यांना समाजकारणाची जाण होती. आजची परिस्थिती अतिशय विपरीत आहे. सकाळी उठल्यापासून आरडाओरडा आणि आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू होतात. शिवराळ भाषा वापरली जाते. यावर सर्वपक्षीय नेत्यांनी विचार करायला हवा. –अशोक आफळे, कोल्हापूर</strong>